Tuesday 28 December 2021

पार्किन्सन्सविषयक गप्पा - ७५

                                                   पार्किन्सन्सविषयक गप्पा -  ७५

                 गप्पा ७४ मधी चौघी बहिणींची कथा वाचून अनेक प्रतिक्रिया आल्या.काहींनी अशीच उदाहरणे आमच्याही अनुभवास आली असे सांगितले.यातली मयुर श्रोत्रीय यांची प्रतिक्रिया जशीच्या तशी द्यावी असे वाटले.त्यांच्या सर्वच प्रतिक्रिया सविस्तर,वेगळा विचार देणाऱ्या असतात..वडिलांना पार्किन्सन्स होता.ते असताना पार्किन्सन्स मित्रमंडळाची त्याना माहिती नव्हती.आत्याला पार्किन्सन्स झाला.त्या अतिशय  सकारात्मक.विचार करणाऱ्या,मानसशास्त्राच्या शिक्षिका,चांगल्या वाचक.आहेत.पण आता त्यांचा पार्किन्सनन्स वाढला आहे.मयूरच्या वाचनात 'मित्रा पार्किन्सना'  हे माझे इ प्रतीष्ठान तर्फे प्रकाशित झालेले इ पुस्तक आले. ते थेट आमच्या घरी आले.ग्रुपमध्ये सामील झाले परिवारातले महत्वाचे सदस्य बनले.whats app group  सुरु केला तेंव्हा मला तांत्रिक ज्ञान काहीच नव्हते.मयुरना मी विनंती केली आणि ते admin झाले. मला त्यांचा खूपच आधार वाटला.अतिशय संयतपणे ते ग्रुप सदस्याना हाताळतात.आत्या नगरला आणि हे पुण्याला पण त्यांचे आत्याकडे लक्ष असते.अविवाहित आत्याची काळजी त्यांची वयस्क आई घेत असते.संवेदनाशील मयूर यांची प्रतिक्रिया अतिशय बोलकी आहे.ते लिहितात,  

  • "बरोबर आहे शुभंकराची अशी परीस्थिती असू शकते.बऱ्याच वेळा यात शुभार्थीला सहन करावे लागते. मानसिक खच्चीकरण होते आणि शुभार्थी उपचारांना साथ देत नाही.
     एक दुसरीही बाजू सांगतो,
    माझी आत्या पार्किन्सन्स ची शुभार्थी. तिला आता अजिबात बोलता येत नाही. कोणाच्या आधाराशिवाय चालता येत नाही. 16 तास  2 नर्स आहेत. 8 तास घरातील माणसे काळजी घेतात.
    जेव्हा घरी जातो तेव्हा तिच्याशी नॉर्मल विषयांवर गप्पा मारतो. तब्येत वगैरे चौकशी करत नाही. एखादे पुस्तक वाचलेस का?( ती आता वाचत नाही हे माहिती असले तरीही).
    एखाद्या बातमीबद्दल चर्चा करतो. माझ्या ऑफिस विषयी, मुलीच्या शिक्षणाविषयी ,एखाद्या नवीन खाद्यपदार्थाविषयी, हॉटेल विषयी.. घरात नेहेमी बोलतो तश्या गप्पा मारतो. conscious inclusion.
    आपण आजही relevant आहोत ही भावना मोठी असते.

                        परंतु ज्या माणसांना आपण नेहेमीच ताकदीने उभे राहतात पाहिले आहे त्यांना अश्या अवस्थेत पाहताना दुःख होते. 
    शुभंकर म्हणून शुभार्थींचे आयुष्य प्रत्येक स्थितीत सुंदर करणे हे आपले कर्तव्य आहे .
    तसेच शुभार्थींने कोणताही न्यूनगंड न ठेवता, कोणतेही दडपण न ठेवता बिनधास्त जगावे. कोणीही कोणावर ओझे नाही आणि कोणीही कोणावर उपकार करत नाही. आज या वयात येताना आपणही अनेक त्याग केले आहेत आणि मुलांवर देखील अनेक उपकारच केले आहेत . कोणी आपली काळजी घेते तर आपल्यावर उपकार नाही तर आपल्या उपकारांची परतफेड करत आहेत हे लक्षात ठेवावे. बिनधास्त जगावे".याशिवाय त्यांनी मला त्या मुलींचा फोन द्या मी बोलून बघतो असेही त्यांनी मला सुचविले.
                      त्यांनी सांगितलेली दुसरी बाजुच माझ्या अनुभवाला अधिक आली. चौघी बहिणींसारखे उदाहरण अपवादात्मकच असते.कणभर आधार दिला तर मणभर आनंद देणारे जास्त आढळतात.अशा शुभंकर, शुभार्थी मुळे कामातील उत्साह वाढतो.
                       बऱ्याच वेळा पती किंवा पत्नी हे शुभंकर असतात.काही वेळा सह्चर हयात नसेल,अविवाहित व्यक्ती असेल तर अशा शुभार्थींची तरुण मुले,सुना,जावई उत्तम शुभंकर बनतात.,अविवाहित व्यक्ती असेल तर भाऊ,बहिण शुभंकर बनताना दिसतात.
                      पुढील गप्पात अशी  उदाहरणे सांगणार आहे.
     
                             
                      

Sunday 19 December 2021

पार्किन्सन्सविषयक गप्पा - ७४

                                                 पार्किन्सन्सविषयक गप्पा -  ७४

                                      माझा फोन कधी संपतो याची वाट पाहत मीरा म्हणजे आमची स्वयंपाकाची बाई  उभी होती.काय करायचे हे तिला विचारायचे होते.मी तावातावाने समोरच्या व्यक्तीशी बोलत असलेली पाहून ती गोंधळलेली होती तिला माझा हा अवतार नवीनच होता.ती मला हाताने शांत व्हा अशा खुणा करत होती.माझा राग काही कमी होत नव्हता.असमंजसपाणे वागून त्या बहिणी आपल्या आईचे नुकसान करत आहेत हे मला दिसत होते.खरे तर असे रागावण्याचा मला अधिकार नव्हता.पण समोरची व्यक्ती मी परोपरीने सांगूनही ऐकत नव्हती आणि माझा तोल गेला.

                                समोरची व्यक्ती म्हणजे त्या चौघीतील एक.ती वारंवार आमहा चौघी बहिणींच्या कडे गाडी आहे आम्ही सांगाल तो खर्च करू अशा  पैशाने आईचा आजार बरा करण्याच्या गोष्टी करत होती.शुभार्थीचे दुखणे मानसिक जास्त आहे हे मला लक्षात आले होते.मी व्यायामाबद्दल,आहाराबद्दल,तिच मन रमविण्यासाठी काय करता येईल हे सांगायचा प्रयत्न करत होते.पण हे सर्व ऐकण्यात तिला काही स्वारस्य नव्हते.मी यापूर्वी आमचे युट्युब चानल,वेबसाईट, तिच्या आईशी मिळत्याजुळत्या शुभार्थींचे सकारात्मक व्हिडीओ,तिच्या आईची मानसिक समस्या असल्याने माझा फ्लॉवररेमेडीच्या व्याख्यानाचा व्हिडिओ असे सर्व पाठवले होते. Whats app group वर यायला सुचविले होते पण यातले त्यांना काहीच करायचे नव्हते.एरवी कोणत्याही व्यक्तीला हे सर्व पाहून ऐकून Relax वाटते.येथे मात्र दगडावर डोके आपटल्यासारखे होते.त्या आईची तब्येत जास्तच बिघडत होती.तिला नैराश्याने घेरले होते.आणि आहे ते असेच चालू राहिले तर काही फरक झालाही नसता.आत्ता बोलणारी बहिण थोडी ऐकून घेईल म्हणून मी सांगायचा प्रयत्न केला होता.पहिल्या बहिणीप्रमाणे येथेही तो वाया गेला होता.तिच्या आईचा रडणारा चेहरा माझ्या डोळ्यासमोर येत होता आणि माझी चिडचिड झाली होती.आई आधीपासून अशीच आहे का असे विचारताच ती म्हणाली, 'नाही.नात्यातील काही कार्य असले की पुढे असायची.सर्वाना तिची गरज लागायची'. मी तिला म्हटले 'याचा अर्थ आजाराने तिची अशी अवस्था झाली आहे हे समजायला हवे ना तुम्हाला?'' मी तिला बरेच काही सुनावात होते. मीराच्या येण्याने मला फोन ठेवावा लागला.

                                      त्या चौघी बहिणी.वेगवेगळ्या गावात राहणाऱ्या.एक शहरात राहणारी,बाकीच्या छोट्या गावात राहणाऱ्या.आई पार्किन्सन पेशंट. आईवडील तालुक्याच्या गावात राहत होते. वडील चांगली काळजी घेत होते दोघांचे छान चालले होते.दुर्दैवाने वडिलांचा करोनाने मृत्यू झाला.आता आईचे काय करायचे? चौघींनी प्रत्येकीकडे तीन, तीन महिने ठेऊन घ्यायचे ठरवले.

                                     एका ओळखीच्या व्यक्तीने त्यांना माझे नाव सुचविले. त्यांना माझा फोन नंबर दिला.. फोनवर प्रथम बोलणे झाले तेंव्हा आईबद्दल तक्रारीच जास्त होत्या.ती अजिबात हालचाल करत नाही.हट्टीपणा करते.आपल्या घरी जायचे म्हणते.जेवायला खायला लगेच उठते.पण कधी कधी हट्टाने पाउलही टाकत नाही. अशा स्वरूपाच्या तक्रारी होत्या.तिला ऑन ऑफ ची समस्या असणार हे माझ्या लक्षात येत होते .गोळीचा असर संपला की अजिबात हालचाल करता येत नाही आणि गोळी घेतली तीचा असर सुरु झाला की हालचाल अगदी सहज होते.मी हे सांगू पाहत होते पण त्याना ते ऐकण्यात रस नव्हता.

                                    तुम्ही आईलाच सांगा काहीतरी म्हणून त्यांनी व्हिडिओ कॉल लावला.त्यांच्याशी मी बोलायला पाहिले.त्यांचे बोलणे मला समजेना मग मीच् त्याना काहीबाही सांगत राहिले.त्या रडायलाच  लागल्या.जावयांनी फोन घेतला.त्यांच्यासमोरच त्यांच्या तक्रारी सांगायला सुरुवात केली.त्यातही त्यांचे खाणे यावर जोर होता.नैराश्याने बऱ्याच वेळा सारखे खाखा होते.तसे त्यांच्याबद्दल झाले असावे.एकूण त्यांच्यासमोर जे बोलले जात होते त्यावरून त्याना आपल्या घरी जावे असे का वाटते हे लक्षात येत होते..न्यूरॉलॉजिस्टना दाखवून त्यांच्या सल्ल्याने मनोविकारतज्ज्ञ गाठणे आवश्यक होते..न्यूरॉलॉजिस्टना दाखवून बराच काळ लोटला होता.करोनामुळे त्यांच्या नेहमीच्या.न्यूरॉलॉजिस्टकडे नेणे अशक्य होते त्या आत्ता जेथे राहत होत्या तिथल्या .न्यूरॉलॉजिस्टची  नावे मी सुचविली.किंवा ऑनलाईन त्यांच्या .न्यूरॉलॉजिस्टना दाखवावे असे सुचविले.ते त्याच त्याच गोळ्या देतात अशी तक्रार ऐकून तर मी कपाळाला हात लावला.पण तरी याना आजाराबद्दल निट समजले नसेल असा विचार करून मी इमाने इतबारे आजाराबद्दल सांगायला सुरुवात केली.अगदी सोपे करून सर्व सांगितल्यावरही 'रामाची सीता कोण' अशी परिस्थिती पाहून मीच हतबल झाले.

                               आत्ता फोनवर माझी चिडचिड होण्यात हा पहिला अनुभव होताच.एकूण सर्व परिस्थिती पाहता कोणत्याही बहिणीकडे तिची निट देखभाल होत् नव्हती. होणारही नव्हती..सारखे सारखे ठिकाण बदलल्यानेही शुभार्थीला जुळवून घेणे कठीण होत असावे.मी त्याना खास पार्किन्सन्स आणि अल्झायमर च्या पेशंटसाठी  असलेले 'तपस' या संस्थेचे नाव सुचविले.तेथे तिला बरोबरीची माणसे भेटली असती योग्य उपचार झाले असते.तिथल्या उपक्रमात मन रमले असते.पण चौघींचे यावर एकमत होणे आवश्यक होते.ते होत नव्हते.. लोक काय म्हणतील नातेवायिक काय म्हणतील हा मोठ्ठा प्रश्न होता.

                             आत्तपर्यंत मी इतक्या शुभंकर, शुभार्थीशी बोलले आहे.तुमच्याशी बोलून खूप छान वाटले अशा तऱ्हेची प्रतिक्रिया असते.हतबलतेचा अनुभव मी प्रथमच घेत होते..शुभार्थीचा रडणारा चेहरा डोळ्यासमोर येत होता.तिच्यासाठी मी काहीच करू शकले नव्हते..सर्वांचे सर्व प्रश्न मी सोडवू शकत नाही हे  स्वीकारणे गरजेचे होते.

'मज काय शक्य आहे आहे अशक्य काय माझे मला कळाया दे बुद्धी देवराया.' हेच फक्त मी म्हणू शकत होते.




                                                                           

Wednesday 8 December 2021

पार्किन्सन्सविषयक गप्पा - ७३

                                                     पार्किन्सन्सविषयक गप्पा -  ७३

           मला एका शुभंकर कन्येचा मेसेज आला.बाबांचा आजार वाढतो आहे. ब्युरोचा माणूस २४ तास ठेवणे परवडत नाही.ते ऐकत नाहीत.  सारखे पडतात.हॉस्पिटलमध्ये नेणे आईला झेपत नाही. आईला त्यांना सांभाळणे कठिण होत आहे.त्यामुळे  डेकेअर सेंटर मध्ये ठेवत आहे.

          आईबाबा दोघच पुण्यात राहतात. दोन मुली विवाहित दुसऱ्या गावाला राहणाऱ्या. तरी आळीपाळीने दोघीही येऊन जात. मला मेसेज पाठवणारी सातत्याने माझ्या संपर्कात आहे. सल्ला घेणे आणि फीडबॅक देणे दोन्ही करते.बाबाना न्यूरॉलॉजिस्टकडे न्यायचे असले तर मुंबईहून आवर्जून पुण्याला येते.तिच्या परीने जास्तीजास्त मदत करते.शुभार्थी पडल्यावर ब्युरोचा माणूस ठेवला पण कायम माणूस ठेवणे परवडणारे नव्हते. आईला एकटीने सांभाळणे झेपत नव्हते. मग आईची चिडचिड व्हायची, तब्येत बिघडायची.करोना मुळे लोकांचे येणे जाणे बंद् झालेले. बाबांशी चर्चा करून त्याना पटल्यावरच  डेकेअर सेंटरचा निर्णय घेतला.तिने व आईने बरीच शोधाशोध केली.बर्याच ठिकाणी ३०/३५ हजार खर्च होता.शेवटी आई अधूनमधून जाऊन येऊ शकेल असा जवळचा आर्थिक दृष्ट्या परवडणारी,जेथे योग्य काळजी घेतली जाते अशी संस्था सापडली. तेथे व्यवस्थित औषधोपचार,बरोबरीची माणसे, लाक्ष द्यायला  केअरटेकर असे सर्वच असणार होते आयोजक स्वत: डॉक्टर आहेत.

            तिथला अनुभव पाहून बाबा रमले तर ठीक नाहीतर परत घरी यायचा पर्याय आहेच.वेगळा, सर्वाना सुखकारक अशा पर्यायाचा प्रयोग तरी करून पाहायला हवा.हा पर्याय तिच्या सख्या बहिणीला, नातेवायीकाना फारसा पटणारा नाही पण लोक काय म्हणतील यापेक्षा आई बाबांसाठी काय योग्य हे ते तीने व्यवहार आणि भावना यांचा योग्य ताळमेळ राखत पाहिले. स्वत:ची जबादारी झटकणे असा विचार येथे अजिबातच नव्हता. मला तिचे कौतुक वाटले.

             मी तिच्या आईशीही बोलले अशा वेळी इतर लोक काही बोलत राहिले तर आपण ठेऊन चूक तर केली नाही ना असे गिल्ट फिलिंग येते. कोणाशी तरी बोलून चांगले वाटते.त्यांच्याशी खूप वेळ बोलणे झाले त्या नुकत्याच शुभार्थीला  भेटून आल्या होत्या.तेथे तीन तास घालवून सर्व व्यस्थ पहिली.त्यांचा अनुभव आशादायी होता.सकाळी चहा,बिस्किटे नंतर नाश्ता,दात घासायला, अंघोळ घालायला,त्यांचा माणूस बरोबर असतो.दोन्हीवेळ्चे जेवण,दुपारी चहा असतो.सकाळी १० ते १२ सर्वाना हॉलमध्ये आणले जाते.विविध खेळ,टीव्ही पाहणे,रेडीओ ऐकणे जे आवडेल ते करु शकतात.शुभंकर तेथले डॉक्टर त्याना म्हणाले तुम्हाला येथे काही गैरव्यवस्था वाटल्यास सांगा आम्ही सुधारणा करू.या

                 तेथे गेल्यावर ते पडले भूवयीच्या वर चार टाके पडले.त्यांच्याकडे Ambulance आहे. स्वत:चे हॉस्पिटल आहे. लगेच उपचार केले जातात. त्यांनी फोन करून सांगितले. शुभंकर पत्नीला लगेच जाणे शक्य नव्हते. तेथल्या संयोजकांनी सांगितले आज्जी तुम्ही यायची गरज नाही. माहिती असावी म्हणून सांगितले.९०० रुपये खर्च आला होता.तो देण्यासाठी येते असे शुभांकाराने ने सांगताच ते म्हणाले घाई नाही.पुढच्या महिन्याचे पैसे भरताना द्या.हे सर्व दिलासादायक होते यापूर्वी शुभार्थी दोनदा पडले होते.त्या घाबरून गेल्या होत्या.हॉस्पिटलमध्ये नेणे त्रासदायक झाले होते.मुलीला फोन केला ती आली आणि खर्च एकदा ३०००रु. तर एकदा ९००० रु. आला.

              .या सगळ्यामुळे शुभंकराच्या डोक्यावरचे खूप मोठे ओझे उतरले होते. इतर लोकानाही याबद्दल माहिती सांगा असे त्या सांगत होत्या.मला शुभंकर मुलीने आई आणि वडिलाना पटवून Out of the box जाऊन असा निर्णय घेतला याचे पुन्हा कौतुक वाटले.

                   आर्थिक परिस्थिती उत्तम असणाऱ्या आणि आईची तीन तीन महिने राहण्यासाठी वाटणी करणाऱ्या चौघी बहिणींच्या पार्श्वभूमीवर तर मला तिचा लोक काय म्हणतील याकडे लक्ष न देता घेतलेला निर्णय अगदी पटला.

पुढच्या गप्पात त्या चौघीं आणि त्यांच्या शुभार्थी आईबद्दल.


Tuesday 23 November 2021

२००९ च्या पार्किन्सन दिन मेळाव्यातील मनोगत


                                           २००९ च्या पार्किन्सन दिन मेळाव्यातील मनोगत   -  गोपाळ तीर्थळी

                                  

                                      उपस्थित निमंत्रित, मान्यवर आणि बंधू भगिनीनो

             


  मी गोपाळ तीर्थळी गेली दहा वर्षे माझ्या पार्किन्सन मित्राबरोबर राहत आहे.त्यात गेली अडीच ते तीन वर्षापूर्वी मला एखादा परीस सापडावा तसे श्री शेंडे आणि श्री पटवर्धन सापडले.

                त्यांच्र्बरोबर बोलून आणि त्यांनी गोळा केलेल्या पार्किन्सन डिसीज ( PD ) बद्दल माहिती,पुस्तके,सी,डी.या सार्याने माझा पार्किन्सन कडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला.आयुष्यात खूप काही केले पण स्वत:चा स्वत:वर विश्वास ठेवून आपण आपले आयुष्य खूप चांगल्या तर्हेने कसे जगायचे हा मंत्र मिळाला.

                    हा माझा फायदा इतराना व्हावा म्हणून मी पार्किन्सन मित्रमंडळाचा सदस्य होऊन इतर पीडी मित्राशी घरोघरी जावून गप्पा मारल्यावर  त्यांच्या चेहऱ्यावर पडलेला फरक आणि त्याना मिळालेला विश्वास,आनंद खूप काही देवून जातो.मला पार्किन्सननी खूप काही दिले.मित्र दिले,योगासने शिकवली.प्राणायाम,आयुर्वेदातील पंचकर्म,डान्स थेरपी,स्पीच थेरपी,ओंकार चैतन्य हास्यक्लब सारखा परिवार की जो तुमचे स्वास्थ्य उत्तम राखतो.

                         हे सगळे पहिले की वाटते जीवनात आनंद लुटायचा असेल तर तुम्ही दुसर्याला आनंदी कसे करता येईल हे पहा.म्हणजे ते पाहताना मिळणारा आनंद दुसऱ्या कुठल्याही पद्धतीने तसा मिळणार नाही.म्हणू ते करताना हुरूप येतो,तो उत्तरोत्तर वाढत जातो.जावो ही इच्छा आहे.हे करण्यासाठी    

                          It is not to be taught

                          It is to be experience. 

 

Friday 19 November 2021

क्षण भारावलेले - १९

                                         क्षण भारावलेले - १९

                                  गेली दीड पावणेदोन वर्षे करोनाने घातलेल्या थैमानामुळे प्रत्यक्ष भेटी केंव्हा सुरु होतील? होतील की नाही? झाल्या तरी त्यावेळी आपण असू की नाही.असे अनेक प्रश्न पडत होते.हळूहळू करोनाचे रौद्र रूप सौम्य होत आहे. आणि प्रत्यक्ष भेटीगाठी सुरु झाल्या आहेत.फोनवर ऑनलाईन कितीही भेटी झाल्या तरी प्रत्यक्ष भेटीचा आनंद वेगळाच.ज्यांच्या भेटीची ओढ आहे पण भेटीची शक्यता कमी अशा अनपेक्षित भेटी झाल्या तर परमानंदाच. १४ नोव्हेंबरचा रविवार असाच परमानंद आणि भारवलेले क्षण देऊन गेला.  

                         डॉ.क्षमाताई वळसंगकर यांचा आम्ही येऊ का असा फोन आला.त्या व डॉ.सतीश वळसंगकर एका कौटुंबिक कार्यासाठी पुण्याला आले होते त्यांचे पुण्यात अनेक नातेवायिक, स्नेही आहेत.त्यात आमच्याकडे येण्यासाठी त्या वेळ काढत होत्या याचेच मला प्रथम अप्रूप वाटले होते.ठरल्याप्रमाणे संध्याकाळी सहा वाजता दोघे आले.आल्या आल्या आम्ही फक्त गप्पा मारायला आलो आहे काही करू नका असे त्यांनी जाहीर केले. बेळगावी करदंट.आणि फराळ देत होते, काही तरी घ्याच असा आग्रह करत होते.तर त्या म्हणाल्या तुम्हाला असे वाटते तर थोडे बांधून द्या.आता औपचारिकपणा केंव्हाच गळून गेला होता.अनेक वर्षांची ओळख असल्यासारखे वाटत होते.पार्किन्सन ग्रुपमधील कोणीही भेटले की असेच होते.

                          या दोघांच्याबद्दल मी यापूर्वी लिहिले आहे मंडळाच्या ऑनलाईन  मासिक सभेतही या दोघानी हजेरी लावली आहे.तरी प्रत्यक्ष पाहताना अनेक गोष्टी नव्याने उमगत होत्या.त्या संथ वाहणाऱ्या नदीसारख्या,तर ते कोसळणाऱ्या धबधब्यासारखे.तरीही .वैयक्तिक जीवनात,कौटुंबिक जीवनात,व्यावसायिक जीवनात ते एकमेकास किती अनुरूप आहेत हे गप्पातून सतत जाणवत होते.

                         डॉक्टर सतीश यांच्यावर कंप आणि कमी झालेले वजन वगळता पार्किन्सन्सच्या कोणत्याच खुणा दिसत नव्हत्या.रीजीडीटी नाही.पार्किन्सन्सच्या वाढीची गतीही स्लो आहे.याचे श्रेय जेवढे त्याच्या सकारात्मकतेला, नवनवीन शिकत राहण्याच्या वृत्तीला,'जेजे आपणास ठावे ते ते इतरास शिकवावे शहाणे करून सोडावे सकळजन' या वृत्तीने विविध विषयावर निरपेक्षपणे  शिकवत राहण्याच्या तळमळीला,झोकून देवून काम करण्याच्या वृत्तीला आहे तसेच या वादळाचा पार्किन्सन्स समजून घेऊन अबोलपणे त्याला हाताळणाऱ्या क्षमा ताईनाही आहे.डॉक्टरना आपल्या गोळ्यांची वेळ झाली आहे ही आठवणही नव्हती.क्षमाताई मात्र आपला दुखरा पाय, रंगलेल्या गप्पा यातही ही आठवण ठेऊन होत्या.ते घरी असले की हे करता येते.पण बाहेर जाताना गोळ्या बरोबर दिल्या असल्या तरी ते विसरतील ही हमी असते मग ड्रायव्हरला सांगून ठेवावे लागते.अशी लटकी तक्रार क्षमाताई करत होत्या. आणि आपण तिचे पहिले मुल आहे हे डॉक्टर कौतुकाने सांगत होते.आणि निरागस लहान मुलाप्रमाणेच वलय विसरून त्यांच्या गप्पा चालल्या होत्या.

                            सोलापूरसारख्या छोट्या शहरात कमी साधन सामग्रीत कॉम्प्लिकेटेड केसेस यशस्वीपणे हाताळणारे पोटाच्या विकाराचे तज्ज्ञ सर्जन, सोलापूरच्या सामाजिक,सांस्कृतिक,शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रातील विविध संस्थाचे अधिकारपद भूषविणारी असामी अशा कोणत्याच झुली घेऊन ते वावरत नव्हते.क्षमाताईही एक उत्तम,अनुभवी,गोल्डमेडल मिळवणाऱ्या अनेस्थेशियालॉजिस्टस, 'इंडियन सोसायटी ऑफ अनेस्थेशियालॉजिस्टस,सोलापूर' शाखेचे अध्यक्षपद भूषविलेल्या,.राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पातळीवरील भूलात्ज्ज्ञांच्या परिषदेत अभीभाषणे केलल्या.शास्त्रीय निबंध आणि शोध निबंधासाठी प्रथम पारितोषिके मिळवणाऱ्या, एक उत्तम कवयित्री हे सर्व विसरून साधेपणाने वावरत होत्या. त्यामुळे मनमोकळ्या गप्पा झाल्या.

          डॉक्टर सतीश यांच्याकडे जेजे आपणासी ठावे हे इतके भरपूर आहे की गप्पांची गाडी नागमोडी वळणे घेत विविध विषयातून संचार करत होती.(या दोघांच्यावर लिहिलेल्या लेखाची लिंक देत असल्याने त्यांच्या बहुश्रुततेचा तपशील देत नाही) एका होमिओपथी कॉन्फरन्स मध्ये ते अध्यक्ष असताना त्यांनी होमिओपाथीचे जनक हनिमन वर स्वत: आरती तयार करून म्हणून दाखवली.उपस्थित सर्व श्रोत्यानि उभे राहून टाळ्या वाजवल्या.गीतरामायणातील गाणी त्यांनी अनेक भाषात भाषांतरित केली आहेत.गीतरामायणातील एक गाणे त्यांनी म्हणून दाखवले.मी ते लगेच रेकॉर्ड केले.पार्किन्सन्सचा त्यांनी अनकंडीशनल स्वीकार केला आहे.असे त्यांच्या वागण्यातून दिसत होते.हे सांगण्यासाठी त्यांनी  'जिना यहाँ मरना यहाँ हे गाणे म्हणून दाखवले. तेही मी रेकॉर्ड केले.खरे तर ते आल्यापासून रेकोर्डिंग चालू ठेवायला पाहिजे होते असे मला नंतर वाटत राहिले. जेंव्हा वाटेल तेंव्हा मी पेटी काढून वाजवत बसतो असे ते सांगत होते.ते सतत बोलण्याने दमतील असे मला वाटत होते.क्षमाताई म्हणाल्या, 'ते तासंतास मेडिको, नॉनमेडिको विषयावर कोणत्याही वयाच्या विध्यार्थ्यांना शिकवत असतात. शिकवणे हा त्यांचा प्राण आहे.ते माणसात रमणारे आहेत'.हे सर्व मोफत चालते.त्यांनी त्यांची डायरी दाखवली त्यांचे अक्षर पाहून मी थक्क झाले.सतत कंप पावणाऱ्या हाताने इतके सुंदर अक्षर कसे येऊ शकते याचे मला आश्चर्य वाटत होते.घरच्याना त्यांनी आता व्याप कमी करावे असे वाटत असते.पण त्याना मुळात हा व्याप वाटतच नाही.

               एका प्रतिथयश सर्जनला हाताला कंप सुरु झाल्यावर शस्त्रक्रिया बंद कराव्या लागल्या याचे मलाच वाईट वाटले होते.पण आज त्याना पाहताना, ऐकताना वाटले पार्किन्सन्सने त्यांच्या बोलण्यावर आक्रमण केले नाही हे किती चांगले झाले.त्यांच्या वाणीमुळे अनेकांच्या मनातील अज्ञानाचा अंधकार दूर करून ते प्रकाश देत आहेत.मरगळ दूर करून उर्जा देत आहेत.अनेकांचे आयुष्य मार्गी लावत आहेत.ही मनावर केलेली सर्जरीच.आणि ती करणे हे अत्यंत कठीण, ते कोणत्याही विद्यापीठात शिकवले जात नाही.हे करणारे डॉ.सतीश यांच्यासारखे विरळाच.

                            या भेटीत क्षमाताईनी त्यांचा मोती अनुभूतीचे हा काव्य संग्रह भेट दिला हे सोनेपे सुहागा असे झाले.१२० कवितांमधील कोणतीही उघडावी आणि आनंद लुटावा.यावर स्वतंत्रपणे लिहावे लागेल.क्षमा ताईनीही आता काम बंद केले आहे.आपल्या कामातून दुसर्यांच्या वेदना कमी करण्याचे काम त्यांनी आयुष्यभर केले.आता आपल्या कवितातून त्या वाचकांच्या मनावर हळुवार फुंकर घालत आहेत.

                            ते परत निघाले तेंव्हा काही राहिले नाही न असे मी म्हणत होते तर डॉक्टरनी  मी हृद्य ठेऊन चाललो आहे अशा अर्थाचा शेर सांगितला.बाहेर थांबून पुन्हा थोड्या गप्पा झाल्या.धबधब्याच्या स्वच्छ पाण्यात भिजल्यावर जसा फ्रेशनेस मिळतो तशी आमची अवस्था झाली. पार्किन्सन्स मित्रामुळे आमच्या जीवनात अशी श्रीमंत करणारी माणसे आली.धन्यवाद मित्रा.

https://www.parkinsonsmitra.org/?p=3013

https://www.parkinsonsmitra.org/?p=3010

May be an image of 3 people, people sitting and indoor

Monday 25 October 2021

मृदुला कर्णी आमच्या सख्यांमधील एक भक्कम असा मंडळाचा आधारस्तंभ !

 

मृदुला कर्णी आमच्या सख्यांमधील एक भक्कम असा मंडळाचा आधारस्तंभ !
विल्यम शेक्सपियर ने म्हटलंय नावात काय आहे ?पण आमच्या या सखीच्या नावात मृदूता आहे,तिच्या वाणीत मृदूता आहे,आचरणात मृदूता आणि तिच्या सर्व कृतीत मृदूता भरलेली असते.
अश्विन महिन्याचा प्रारंभ शक्तीरुपाच्या उपासनेत होतो, म्हणून मंडळाने "स्त्री शक्तीचा जागर "हा उपक्रम राबविला आहे आणि मला सांगायला आनंद होतो की,मला मृदुला ताई बद्दल लिहिण्याची खूप छान संधी मिळाली आहे.
खरं सांगू तिचं कौतुक करायला शब्द कमी पडतील इतके तिच्या मध्ये उत्तम गुण आहेत पहिला गुण म्हणजे ती उच्च शिक्षित असूनही अतिशय विनम्रपणे वागते.मंडळाच्या कोणत्याही कामात ती लगेच सहभागी होते. मला एकदा शोभना ताईंचा फोन आला "अंजली संस्थेचे कागद पत्रांचे कपाट आवरायला तू येऊ शकतील का " त्यावेळी मृदुला मंडळात नुकतीच येऊ लागली होती ,माझा तिचा कोणत्या तरी कारणाने फोन झाला व माझ्याकडून तिला कपाट आवरायला मी शोभना ताईंकडे जाणार सांगितले गेले त्यावर तिने ही माझ्या बरोबर येण्याची स़ंमती दर्शवली आणि इतकं वर्षांचं कागदपत्रांच रेकाॅडॆ कसं लावायच ? हा माझा प्रश्न चुटकीसरशी सोडवला सुंदर हस्ताक्षरात कागद पत्रांवर नावे घालून कपाट उत्तम लावून दिले.
या शिवाय तिचा आणखी गुण म्हणजे ती उत्तम सूत्रसंचलन करते त्याची प्रचिती पार्किन्सन्स मित्रमंडळ घ्या वार्षिक मेळाव्यात आणि निपूण धर्माधिकारी यांच्या मुलाखती वेळी घेतलेली आहे.
मृदुला ची सहकार्य करण्याची भूमिका जबरदस्त आहे .नर्मदा मध्ये सभा असायची त्यावेळी ती मला एवढ्या लांब स्कूटी वर जाऊ नकोस माझ्या येथे गाडी लाव आपण दोघी माझ्या कार मधून जाऊ यात . त्यावेळी आमच्या अधिकाधिक गप्पा व्हायच्या त्या गप्पांमध्ये मला समजले "मृदुला ही व्यक्ती साधी नाही ती प्रचंड हुशार आहे तिला विविध विषयांचे ज्ञान आहे आणि तितकेच अनुभव ही आहेत याची प्रचिती मंडळाला तिचा मंडळात जसजसा सहभाग वाढू लागला तेव्हा आली.
साधी राहणी उच्च विचारसरणी या तत्वानुसार ती राहते ती फार डामडौल करीत नाही.ती एक उत्तम गृहिणी ही आहे खूप छान स्वयंपाक करते एक-दोन वेळा तिच्या घरी तिच्या हातचे पदार्थ सेवन करण्याचा योग आला आणि मी खरचं तिच्या गुणांच्या प्रेमात पडले .
प्रत्येक गुण तिच्यामध्ये वास करतो आहे उत्तम हस्ताक्षर,निटनेटकेपणा, उत्तम संभाषण कौशल्य, सहकार्य वृत्ती वगैरे अशी गुणांची भलीमोठी यादीच तयार होईल .
मला तिच्याकडे पाहिलं की, एकप्रकारची प्रेरणा मिळते, ऊर्जा मिळत रहाते ‌तिच्याकडून काही जीवन मूल्ये शिकायला मिळाली आहेत आलेला वाईट प्रसंग कसा हळुवार हाताळायचा ? त्यातून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न कसे ?कोणते करायचे ?हे सारं मृदुला कडून शिकण्यासारखे आहे.रयत शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत असताना मिस्टरांची आबाळ होऊ नये म्हणून तिने केलेली उपाययोजना खरचं वाखाणण्याजोगी आहे.हे करत असताना स्वतःचे अध्यापनाचे कामही तिचे अतिशय उत्तम होते.
जिद्द , परिश्रम, आणि त्याच बरोबर आत्मविश्वास यांच्या साथीने जीवन आनंदी कसे जगावे याचे उदाहरण म्हणजे मृदुला !
मृदुलाचे मातृछत्र ज्यादिवशी हरपले त्यांच्या दोन दिवसांनी पार्किन्सन्स मित्रमंडळ च्या एका मोठ्या कार्यक्रमाची जबाबदारी मृदुला वर होती आम्हाला तिच्या आईच्या निधनाची बातमी जेव्हा समजली तेव्हा आता "कसे होणार म्हणून पर्याय शोधू लागलो पण तेवढ्यात मृदुलानेच आम्हाला धिर देऊन सांगितले काळजी करू नका मी कार्यक्रम सादर करीन.केवढी ही कामाबद्दल निष्ठा स्वतः चे दु:ख बाजूला ठेवून कर्तव्यदक्ष रहाणारी हीच खरी नवदुर्गा होय.
मृदुला ला साहित्य,संगीत यामध्ये ही खूप रुची आहे तिनं आणि मी शिक्षण क्षेत्रात काम केलेले असल्याने आमचे एकमेकींशी सूर जुळायला अजिबात वेळ लागला नाही.तिच्या आईची मैत्रीण ज्येष्ठ कवयित्री शांताबाई शेळके या होत्या.त्यांच्या सर्वांगसुंदर गीतरचनांना अनुरूप असे संगीत अनेक संगीतकारांनी दिले या बद्दल ती बोलायला लागली की भरभरून आठवणी सांगते.
मृदुलाचे भाषाविषयक ज्ञान खूप छान आहे स्मरणिका चे काम सुरू झाल्यावर तिने प्रुफरिडींगचे काम खूप वेळ देऊन उत्तम प्रकारे पार पाडले . या शिवाय स्मरणिका प्रकाशन झाल्यावर त्या परगावच्या लोकांना पाठविण्यासाठी ही पाकिटांवर सुंदर, वळणावर अक्षरात पत्ते लिहिण्याचे काम ही अतिशय उत्साहात केले त्याबद्दल ही कितीतरी शुभार्थी शुभंकर हितचिंतक यांचेकडून ग्रुपवर अभिप्राय आले ही तिच्या उत्कृष्ट कामगिरी ची पावतीच नव्हे का !
मला आठवतंय एकदा मी सभेस उपस्थित राहू शकणार नव्हते त्यामुळे वाढदिवसाची भेटकार्ड कशी सभेत पोहोचतील या विचारात मी होते आणि अचानक मृदुला ने फोन करून सांगितले तू भेटकार्ड तयार ठेव मी घेऊन जाईल मला खूप आनंद झाला.तात्पर्य कोणाच्याही मदतीला धावून जाणे , कोणाचीही गैरसोय होऊ नये यासाठी मृदुला खूप दक्ष असते.
मंडळाच्या सभांवेळी मृदुला ने अनेक वक्त्यांची ओळख ओघवत्या वाणीत खूप छान करून दिलेली आहे व आभारही मोजक्या शब्दात छान मानलेले आहेत.
असा आमचा मंडळाचा हा आधार स्तंभ खूप भक्कम आहे कोणत्या ही प्रकारची जबाबदारी, मृदुला अगदी हसत हसत स्वीकारते, आणि अगदी उत्तम प्रकारे सहज पणे पेलते.कोणतेही काम फत्ते करूनच मग मृदुला बाजूला होणार हे तिचे वैशिष्ट्य लक्षात राहण्याजोगेच आहे.
पती व आईचे निधना नंतर लगेचच आपले दु:ख कवटाळीत न बसता मृदुला ने पूर्णपणे मंडळाच्या कामात जी मदत केली आहे त्याला तोड नाही.
अशा माझ्या दिलदार ,कामसू, अभ्यासू वृत्ती असलेल्या सखीला पुढील वाटचालीसाठी आणि मंडळाच्या कामांसाठी ईश्वर अखंड यश देवो,व तिला चांगले आरोग्य लाभो ही जगदंबे चरणी प्रार्थना 
शब्दांकन
अंजली महाजन
 

*रिसोर्सफुल पर्सन - अरुंधती जोशी*

 

*रिसोर्सफुल पर्सन - अरुंधती जोशी*
' पार्किन्सन्स मित्रमंडळाची स्त्रीशक्ती ' या नवरात्रीनिमित्तच्या लेखमालेत आज आपण ओळख करून घेणार आहोत ती अरुंधती जोशी हिची. अरुंधती खरंतर माझ्या मावशीची मैत्रीण. म्हणून माझी पण मैत्रीण. 5- 6 वर्षांपूर्वी सहज आम्ही गप्पा मारताना मी पार्किन्सन्स मित्रमंडळाबद्दल बोलत असताना ती म्हणाली- " मलाही आवडेल असं काही काम करायला " मग काय पुढच्याच आमच्या कार्यकारिणी सभेला ती आली आणि तेव्हापासून कार्यकारिणी सदस्य म्हणून मनापासून कामही करू लागली.
अरुंधती खरोखरच एक रिसोर्सफुल पर्सन आहे. कोणतं काम कुठं आणि कोण चांगलं करू शकतो, एखादी गोष्ट कुठे चांगली मिळते याबाबतची अद्ययावत माहिती तिच्याकडे नेहमी तयार असते. आमच्या वार्षिक सहलींसाठी तिने सुचविलेली अनेक ठिकाणे - मनाली फार्मस्, अभिरुची फार्मस्, फुलगाव- तुळापूर या ठिकाणी ती स्वतः आधी जाऊन आलेली असल्यामुळे पीडी पेशंट्सना घेऊन जाण्यासाठी या जागा सोईस्कर आहेत हे तिला माहित होते. सहलीआधी तिथल्या लोकांशी फोनवर बोलून ती बारीक-सारीक, पण आमच्यासाठी महत्त्वाच्या गोष्टींची पुन्हा पुन्हा खात्री करून घ्यायची. फुलगाव - तुळापूरला प्रथमच पूर्ण दिवसाची सहल गेली होती. ते धाडस अरुंधतीला खात्री होती म्हणूनच शक्य झाले. त्यासाठी आधी ती, तिचे दीर, शोभनाताई, करमरकरकाका हे सगळेजण तिथे जाऊन पाहणी करून आले होते.
आमच्या वार्षिक मेळाव्यात येणाऱ्या लोकांची नोंद ठेवणे, त्यांना स्मरणिका देऊन त्याचीही नोंद ठेवणे, अभिप्राय नोंदवून घेणे अशी कामेही तिने उत्तमप्रकारे केली आहेत. मासिक सभेच्यावेळी चहावाटपाचे काम, सह्या घेण्याचे काम, आयत्यावेळी लागणारी मदत (कारण आधी कितीही परफेक्ट प्लॅनिंग केले तरी ती लागते) हे सर्व ती उत्साहाने करत असते.
' देणे समाजाचे ' या प्रदर्शनात संस्थेने भाग घेतला होता तेव्हा ती तिथे येणाऱ्यांना आमच्या संस्थेबद्दलची माहिती मनापासून सांगायची.
एरवी कधी तिच्या वैयक्तिक अडचणीमुळे तिला एखादे काम जमणार नसेल तर जसे ती स्पष्टपणे- "नाही जमणार "असे सांगते, तसेच अचानक इतर कुणाला काही अडचणीमुळे नेमून दिलेले काम जमत नाहीये असे लक्षात आल्यावर तेही काम आयत्यावेळी करायला ती तत्परतेने पुढे येते हे तिचे विशेष आहे.
आमच्या एका मासिक सभेच्या आदल्या दिवशी कार्यकारिणीची सभा चालू असताना अचानक कुणाच्यातरी लक्षात आले - उद्या मासिक सभेच्या दिवशीच कोजागिरी पौर्णिमा आहे तर आपण सगळ्यांना चहाच्याऐवजी मसाला दूध द्यायचे का? इतक्या ऐनवेळी सुचलेली ही कल्पना तिने उचलून धरली आणि सगळ्यांसाठी घरी स्वतः मसाला दूध तयार करून आणले. सगळेजण या सुखद आणि अनपेक्षित धक्क्यामुळे खुश झाले होते. मसाला दूध भरपूर आहे म्हटल्यावर दोन- दोन कप दुधाचा आस्वाद घेतला होता.
तिच्या नात्यातील एका प्रिंटरने आम्हाला अत्यंत माफक दरात आमची ब्रोशर्स तयार करून दिली होती. हे सगळं ठरवताना ती स्वतः त्यांच्या ऑफिसमध्ये 1- 2 वेळा आलीही होती.
गंमत म्हणजे तिच्या खात्रीच्या एका दुकानातून आम्ही एकदा आमच्या ट्रीपच्यावेळी ओल्या नारळाच्या करंज्या बसमध्ये नाश्त्यासाठी आणल्या होत्या. त्या इतक्या सुरेख, अगदी तोंडात विरघळतील अशा होत्या की सर्वांनी पुन्हा पुन्हा मागून घेत सगळ्या फस्त केल्या होत्या. मला खात्री आहे यानंतर त्या दुकानाचा खप नक्कीच वाढला असणार.
तर अशी ही आमची अरुंधती - स्पष्टवक्ती, ठाम विचारांची, मदतीला सदैव तयार, सगळ्यांना कौतुकाने खाऊ घालणारी. तिच्या हया स्त्रीशक्तीला मनापासून सलाम !
शब्दांकन : दीपा होनप






*उषाताई कुलकर्णी - आपल्या मंडळाचा एक भक्कम आधारस्तंभ*

 

*उषाताई कुलकर्णी - आपल्या मंडळाचा एक भक्कम आधारस्तंभ*
उषाताई, शांत, प्रसन्न, हसतमुख चेहरा. प्रथम पाहिल्यावर थोड्याशा अबोल वाटतात, पण एकदा का गट्टी जमली की मग भरपूर गप्पा मारतात. त्या माझी मुलगी योगिताच्या मराठी विषयाच्या शिक्षिका वाडीकरबाई. लग्नानंतर सौ. उषा कुलकर्णी झाल्या. त्या आपल्या मंडळात इतक्या एकरूप होऊन गेल्या आहेत की कोणतेही काम करायला अगदी मनापासून तयारी असते. त्यांना सहलीला जायलाही आवडते. त्या आपल्या मंडळाच्या सहलींना अगदी आवर्जून येतात, त्यावेळीही अगदी पैसे गोळा करणे, नाव नोंदणी करणे, किंवा बसमध्ये सभासदांची हजेरी घेणे इत्यादी कामे त्या आनंदाने करतात. त्यांना प्रसिद्धीची अजिबात आवड नाही. तसेच पुढे पुढे करायलाही त्यांना आवडत नाही.
उषाताईंच्या रूपात आपल्या मंडळात लक्ष्मी अवतरली असे म्हटले तर ते अजिबात वावगे होणार नाही. त्यांनी आजपर्यंत मंडळाला खूप मोठी आर्थिक मदत देणगी रुपात केली आहे. या गोष्टींचा कोठेही उल्लेख करायचा नाही या अटीवर त्यांनी मदत दिली आहे. या गोष्टीचा कोणत्याही प्रकारे उल्लेख स्वतःही करणार नाहीत किंवा कोणी केला तरी त्या जाणवू देणार नाहीत की हे आपल्याबद्दलच चालले आहे.' संघर्ष सन्मान ' पुरस्कार आपल्या मंडळाला मिळाला, तेव्हा उषाताईंनी स्वतः 'मुक्तांगण' संस्थेला मोठी देणगी दिली. तीसुद्धा त्यांनी स्वतः उजेडात न येता शोभनाताईंकडून देवविली. अर्थात शोभनाताईनी जबरदस्तीने त्यांना मुक्तांगणच्या मुक्ता पुण तांबेकर यांना भेटवले. ह्या गोष्टीचा उल्लेख केलेला त्यांना आवडणार नाही हे माहित असूनही आम्हा सर्वांना त्यांचा खूप अभिमान वाटतो हे प्रामुख्याने नमूद करावेसे वाटते. आनंदवनच्या सहलीला त्या गेल्या असतानाही तिथेही त्यांनी बरीच घसघशीत मोठी देणगी दिली होती. असे हे त्यांचे दातृत्व.
उषाताईंनी शुभंकराची भूमिकाही खूप उत्तम प्रकारे पार पाडली आहे. त्यांच्या यजमानांच्या आजारपणात त्या स्वतः जातीने व एकटीनेच त्यांची सेवा शुश्रुषा करीत असत.
त्यांच्याकडे माणसे जोडण्याची कला उत्तम प्रकारे आहे. त्यांचे यजमान आजारी होते तेव्हा ते प्रयाग हॉस्पिटलमध्ये बरेच दिवस होते. तेव्हा तेथील डॉक्टर आणि कर्मचारी वर्गाशी त्यांचे चांगले घरच्यासारखे संबंध तयार झाले होते. जेव्हा आनंदवनची सहल गेली होती त्यावेळी उषाताईंच्या यजमानांची तब्येत इतक्या लांबच्या प्रवासास योग्य नव्हती. पण आपल्या उषाताईंनी धाडस करून त्यांना आनंदवनला नेले, तसेच हम्पी व बदामीलाही त्या त्यांना घेऊन गेल्या होत्या.
आपल्या मित्रमंडळाच्या वार्षिक स्मरणिका आणि संचार त्रैमासिक प्रत्येक सभासदाला निश्चित कोणत्या मार्गाने मिळतील असा विषय सभेत निघाला तेव्हा उषाताईंनी मी पोस्टात व कुरियरकडे चौकशी करते आणि कळवते असे आपण होऊन सांगितले. त्याप्रमाणे त्यांनी पोस्ट ऑफिसमध्ये व कुरियर ऑफिसमध्ये चौकशी करून सर्व माहिती अगदी सविस्तरपणे आशाताईंना कळवली.
आपल्या मित्रमंडळाबद्दल त्यांना खूपच आपुलकी वाटते. त्यांच्या यजमानांच्या पुण्यतिथीनिमित्ताने अकरा एप्रिलच्या कार्यक्रमाच्या खर्चाचा वाटा उचलण्यात त्यांचाही सहभाग असतो.
 
 
*उषाताई कुलकर्णी - आपल्या मंडळाचा एक भक्कम आधारस्तंभ*
उषाताई, शांत, प्रसन्न, हसतमुख चेहरा. प्रथम पाहिल्यावर थोड्याशा अबोल वाटतात, पण एकदा का गट्टी जमली की मग भरपूर गप्पा मारतात. त्या माझी मुलगी योगिताच्या मराठी विषयाच्या शिक्षिका वाडीकरबाई. लग्नानंतर सौ. उषा कुलकर्णी झाल्या. त्या आपल्या मंडळात इतक्या एकरूप होऊन गेल्या आहेत की कोणतेही काम करायला अगदी मनापासून तयारी असते. त्यांना सहलीला जायलाही आवडते. त्या आपल्या मंडळाच्या सहलींना अगदी आवर्जून येतात, त्यावेळीही अगदी पैसे गोळा करणे, नाव नोंदणी करणे, किंवा बसमध्ये सभासदांची हजेरी घेणे इत्यादी कामे त्या आनंदाने करतात. त्यांना प्रसिद्धीची अजिबात आवड नाही. तसेच पुढे पुढे करायलाही त्यांना आवडत नाही.
उषाताईंच्या रूपात आपल्या मंडळात लक्ष्मी अवतरली असे म्हटले तर ते अजिबात वावगे होणार नाही. त्यांनी आजपर्यंत मंडळाला खूप मोठी आर्थिक मदत देणगी रुपात केली आहे. या गोष्टींचा कोठेही उल्लेख करायचा नाही या अटीवर त्यांनी मदत दिली आहे. या गोष्टीचा कोणत्याही प्रकारे उल्लेख स्वतःही करणार नाहीत किंवा कोणी केला तरी त्या जाणवू देणार नाहीत की हे आपल्याबद्दलच चालले आहे.' संघर्ष सन्मान ' पुरस्कार आपल्या मंडळाला मिळाला, तेव्हा उषाताईंनी स्वतः 'मुक्तांगण' संस्थेला मोठी देणगी दिली. तीसुद्धा त्यांनी स्वतः उजेडात न येता शोभनाताईंकडून देवविली. अर्थात शोभनाताईनी जबरदस्तीने त्यांना मुक्तांगणच्या मुक्ता पुण तांबेकर यांना भेटवले. ह्या गोष्टीचा उल्लेख केलेला त्यांना आवडणार नाही हे माहित असूनही आम्हा सर्वांना त्यांचा खूप अभिमान वाटतो हे प्रामुख्याने नमूद करावेसे वाटते. आनंदवनच्या सहलीला त्या गेल्या असतानाही तिथेही त्यांनी बरीच घसघशीत मोठी देणगी दिली होती. असे हे त्यांचे दातृत्व.
उषाताईंनी शुभंकराची भूमिकाही खूप उत्तम प्रकारे पार पाडली आहे. त्यांच्या यजमानांच्या आजारपणात त्या स्वतः जातीने व एकटीनेच त्यांची सेवा शुश्रुषा करीत असत.
त्यांच्याकडे माणसे जोडण्याची कला उत्तम प्रकारे आहे. त्यांचे यजमान आजारी होते तेव्हा ते प्रयाग हॉस्पिटलमध्ये बरेच दिवस होते. तेव्हा तेथील डॉक्टर आणि कर्मचारी वर्गाशी त्यांचे चांगले घरच्यासारखे संबंध तयार झाले होते. जेव्हा आनंदवनची सहल गेली होती त्यावेळी उषाताईंच्या यजमानांची तब्येत इतक्या लांबच्या प्रवासास योग्य नव्हती. पण आपल्या उषाताईंनी धाडस करून त्यांना आनंदवनला नेले, तसेच हम्पी व बदामीलाही त्या त्यांना घेऊन गेल्या होत्या.
आपल्या मित्रमंडळाच्या वार्षिक स्मरणिका आणि संचार त्रैमासिक प्रत्येक सभासदाला निश्चित कोणत्या मार्गाने मिळतील असा विषय सभेत निघाला तेव्हा उषाताईंनी मी पोस्टात व कुरियरकडे चौकशी करते आणि कळवते असे आपण होऊन सांगितले. त्याप्रमाणे त्यांनी पोस्ट ऑफिसमध्ये व कुरियर ऑफिसमध्ये चौकशी करून सर्व माहिती अगदी सविस्तरपणे आशाताईंना कळवली.
आपल्या मित्रमंडळाबद्दल त्यांना खूपच आपुलकी वाटते. त्यांच्या यजमानांच्या पुण्यतिथीनिमित्ताने अकरा एप्रिलच्या कार्यक्रमाच्या खर्चाचा वाटा उचलण्यात त्यांचाही सहभाग असतो.
शब्दांकन : वसुमती देसाई
 
 
 
*उषाताई कुलकर्णी - आपल्या मंडळाचा एक भक्कम आधारस्तंभ*
उषाताई, शांत, प्रसन्न, हसतमुख चेहरा. प्रथम पाहिल्यावर थोड्याशा अबोल वाटतात, पण एकदा का गट्टी जमली की मग भरपूर गप्पा मारतात. त्या माझी मुलगी योगिताच्या मराठी विषयाच्या शिक्षिका वाडीकरबाई. लग्नानंतर सौ. उषा कुलकर्णी झाल्या. त्या आपल्या मंडळात इतक्या एकरूप होऊन गेल्या आहेत की कोणतेही काम करायला अगदी मनापासून तयारी असते. त्यांना सहलीला जायलाही आवडते. त्या आपल्या मंडळाच्या सहलींना अगदी आवर्जून येतात, त्यावेळीही अगदी पैसे गोळा करणे, नाव नोंदणी करणे, किंवा बसमध्ये सभासदांची हजेरी घेणे इत्यादी कामे त्या आनंदाने करतात. त्यांना प्रसिद्धीची अजिबात आवड नाही. तसेच पुढे पुढे करायलाही त्यांना आवडत नाही.
उषाताईंच्या रूपात आपल्या मंडळात लक्ष्मी अवतरली असे म्हटले तर ते अजिबात वावगे होणार नाही. त्यांनी आजपर्यंत मंडळाला खूप मोठी आर्थिक मदत देणगी रुपात केली आहे. या गोष्टींचा कोठेही उल्लेख करायचा नाही या अटीवर त्यांनी मदत दिली आहे. या गोष्टीचा कोणत्याही प्रकारे उल्लेख स्वतःही करणार नाहीत किंवा कोणी केला तरी त्या जाणवू देणार नाहीत की हे आपल्याबद्दलच चालले आहे.' संघर्ष सन्मान ' पुरस्कार आपल्या मंडळाला मिळाला, तेव्हा उषाताईंनी स्वतः 'मुक्तांगण' संस्थेला मोठी देणगी दिली. तीसुद्धा त्यांनी स्वतः उजेडात न येता शोभनाताईंकडून देवविली. अर्थात शोभनाताईनी जबरदस्तीने त्यांना मुक्तांगणच्या मुक्ता पुण तांबेकर यांना भेटवले. ह्या गोष्टीचा उल्लेख केलेला त्यांना आवडणार नाही हे माहित असूनही आम्हा सर्वांना त्यांचा खूप अभिमान वाटतो हे प्रामुख्याने नमूद करावेसे वाटते. आनंदवनच्या सहलीला त्या गेल्या असतानाही तिथेही त्यांनी बरीच घसघशीत मोठी देणगी दिली होती. असे हे त्यांचे दातृत्व.
उषाताईंनी शुभंकराची भूमिकाही खूप उत्तम प्रकारे पार पाडली आहे. त्यांच्या यजमानांच्या आजारपणात त्या स्वतः जातीने व एकटीनेच त्यांची सेवा शुश्रुषा करीत असत.
त्यांच्याकडे माणसे जोडण्याची कला उत्तम प्रकारे आहे. त्यांचे यजमान आजारी होते तेव्हा ते प्रयाग हॉस्पिटलमध्ये बरेच दिवस होते. तेव्हा तेथील डॉक्टर आणि कर्मचारी वर्गाशी त्यांचे चांगले घरच्यासारखे संबंध तयार झाले होते. जेव्हा आनंदवनची सहल गेली होती त्यावेळी उषाताईंच्या यजमानांची तब्येत इतक्या लांबच्या प्रवासास योग्य नव्हती. पण आपल्या उषाताईंनी धाडस करून त्यांना आनंदवनला नेले, तसेच हम्पी व बदामीलाही त्या त्यांना घेऊन गेल्या होत्या.
आपल्या मित्रमंडळाच्या वार्षिक स्मरणिका आणि संचार त्रैमासिक प्रत्येक सभासदाला निश्चित कोणत्या मार्गाने मिळतील असा विषय सभेत निघाला तेव्हा उषाताईंनी मी पोस्टात व कुरियरकडे चौकशी करते आणि कळवते असे आपण होऊन सांगितले. त्याप्रमाणे त्यांनी पोस्ट ऑफिसमध्ये व कुरियर ऑफिसमध्ये चौकशी करून सर्व माहिती अगदी सविस्तरपणे आशाताईंना कळवली.
आपल्या मित्रमंडळाबद्दल त्यांना खूपच आपुलकी वाटते. त्यांच्या यजमानांच्या पुण्यतिथीनिमित्ताने अकरा एप्रिलच्या कार्यक्रमाच्या खर्चाचा वाटा उचलण्यात त्यांचाही सहभाग असतो.
शब्दांकन : वसुमती देसाई
 
  
 
 
 

Sunday 17 October 2021

*स्थिर मती - वसुमती*

 


*स्थिर मती - वसुमती*
सहावा आधारस्तंभ
' पार्किन्सन्स मित्रमंडळाची स्त्रीशक्ती ' या नवरात्रीनिमित्तच्या लेखमालेत आज आपण ओळख करून घेणार आहोत ती आमच्या मित्रमंडळाच्या ट्रस्टची खजिनदार वसुमती देसाईमधील स्त्रीशक्तीची.
वसू म्हटलं की डोळ्यांसमोर येते ती तिची सदैव हसतमुख मुद्रा. ती खूप प्रेमळ आहे. सगळ्यांशी आपलेपणाने बोलते आणि वागते. कुणाच्याही मदतीला सदैव तत्पर असते. कोणतेही छोटे- मोठे काम उत्साहाने, व्यवस्थितपणे पार पाडते.मग ते मासिक सभेच्यावेळी पेशंट्सच्या सह्या घेण्याचे काम असो, चहावाटपाचे काम असो, सहलीच्यावेळी करमणुकीचे खेळ घेण्याचे काम असो, स्मरणिकेसाठी लेख लिहिण्याचे काम असो, इतरांच्या लेखांचे proof reading चे काम असो, phone callers ना वेळोवेळी सभेसाठी सर्व पेशंट्सना फोन करण्याची आठवण करणे असो, त्याच्या नोंदी ठेवणे असो, पेशंट्सच्या list updating साठी मदत करणे असो, ट्रस्टची खजिनदार म्हणून काम करणे असो, तिने ही अशी सगळी कामे अत्यंत जबाबदारीने पार पाडलेली आहेत.
तशी ती खूप शांत आणि adjustable स्वभावाची आहे खरी, पण कधीकधी तिच्या मतांबद्दल ती आग्रही असते, स्पष्टपणे बोलते. तिचे घर मोठे असल्यामुळे कित्येकदा आमच्या कार्यकारिणीच्या सभा, वार्षिक मेळाव्यानंतर श्रमपरिहाराची सभा तिच्याकडे होते. अशावेळी ती सगळ्यांना खास पदार्थ करून खाऊ घालते. सर्वांना आपल्याबरोबर घेऊन वाटचाल करणे, आपल्याला दिलेले कोणतेही काम चोखपणे पार पाडणे, सगळ्यांची आत्मीयतेने चौकशी करणे, स्वतःला माहित असलेल्या छोट्या छोट्या टिप्स् इतरांबरोबर शेअर करणे, हे तिचे गुण प्रकर्षाने अनुभवास आले आहेत. पार्किन्सन्स मित्रमंडळाशी सुरुवातीला एक शुभंकर म्हणून जोडलेले नाते तिने नंतर हळूहळू अनेक जबाबदारीची कामे - " हो मी करेन की " असे आनंदाने म्हणत म्हणत केली आहेत. कार्यकारिणी सदस्य ते ट्रस्टची खजिनदार या पदापर्यंत तिने केलेला प्रवास म्हणूनच कौतुकास्पद आहे.
इतरांप्रमाणे तिलाही एक स्त्री म्हणून घरच्या पातळीवरही अनेक जबाबदाऱ्या पेलाव्या लागतात आणि त्याही ती समर्थपणे निभावत असते.
तिच्या मिस्टरांना म्हणजे शशिकांत देसाई यांना गेली 15 -16 वर्षे पीडीचा त्रास आहे. त्यांची शुभंकर म्हणून वावरताना वेळोवेळी देवाने तिच्या सहनशीलतेची परीक्षाच पाहिली आहे. अडचणी तरी किती वेगवेगळ्या प्रकारच्या याव्यात! भास होणे, अचानक पडणे, पडल्यामुळे झालेल्या जखमांवर टाके घालणे, असे अनेकदा घडत असते. या सगळ्या प्रसंगांना ती शांतपणे, विचारपूर्वक, योग्य तो निर्णय घेत तोंड देत असते.
जवळ जवळ गेली 5 - 6 वर्षे स्मरणिकेत लेख लिहून आपले अनुभव काही उपयुक्त सूचनांसह तिने इतरांपर्यंत पोचविले आहेत. विविध प्रकारचे भास होणाऱ्या व्यक्तीला त्या त्या वेळी समजून घेऊन, शांतपणे परिस्थिती हँडल करणे किती अवघड असते, हे ज्यांना त्याचा अनुभव आहे त्यांनाच समजेल. पण वसूने हेही शिवधनुष्य वेळोवेळी मोठ्या हिमतीने पेलले आहे. मिस्टरांचे मन गुंतून रहावे यासाठी त्यांना काही कलाकुसरीच्या वस्तू बनवायला ती प्रोत्साहन द्यायची. CD's चे वॉल हँगिंग, आरसे वगैरे लावून केलेली wooden pattern ची रांगोळी, इत्यादी त्यांनी केलेल्या वस्तू आमच्या वार्षिक मेळाव्यातील कला प्रदर्शनात ठेवल्या होत्या.
मिस्टरांच्या बाबतीतला तिचा एक निर्णय तसा धाडसी म्हणावा लागेल. त्या काळात मिस्टर देसाई खूप गप्प गप्प असायचे, नुसते बसून रहायचे. टीव्ही नाही, वाचन नाही, काही नाही. अशावेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने तिने काही काळ त्यांना एका डे केअर सेंटरमध्ये ठेवले होते. तिथे ते चांगले रमलेही होते. समवयस्कांबरोबर तिथल्या ऍक्टिव्हिटीजमध्ये भागही घ्यायचे. आपल्या माणसाच्या भल्यासाठी तिने घेतलेला हा निर्णय बरोबर ठरला होता.
एक शुभंकर म्हणून वसूचा रोल आदर्श म्हणावा लागेल. वेळोवेळी बद्दलत्या परिस्थितीनुसार तिने विचारपूर्वक निर्णय घेतला. गरज पडली तेव्हा 24 तास मदतनीस ठेवला. मिस्टरांच्या रोजच्या व्यायामाकडे, संध्याकाळच्या फिरण्याकडे, त्यांना आवडणारे पदार्थ करून कौतुकाने खाऊ घालण्याकडे ती विशेष लक्ष देत असते. एकंदरीत मित्रमंडळ आणि आपले घर या दोन्ही ठिकाणच्या जबाबदाऱ्या व्यवस्थितपणे पार पाडणाऱ्या वसूमधील स्त्रीशक्तीला म्हणूनच मनापासून सलाम!
 
 

 

*स्थिर मती - वसुमती*
 
 
शब्दांकन - दीपा होनप.

समारोप

                                                             समारोप

                            नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मी क्षमाताईंच्यावर लिहिलेला लेख आला. मृदुला म्हणाली, पहिल्या दिवशी अष्टभुजेवर लेख आला.त्याक्षणी मंडळाच्या कार्यकारिणीच्या सर्व स्त्रियांवर लिहावे अशी कल्पना सुचली. मी आमच्या ग्रुप मध्ये मांडताच सर्वांनी उचलून धरली.आशानी कोणी कोणावर लिहायचे ठरवून टाकले.क्षणार्धात सर्व कोणतीही अडचण न सांगता तयार झाल्या..खरे पाहता नवरात्र असल्याने सर्वांच्याकडे काही न काही अडचणी होत्या. तरी बघता बघता दशभूजांवर लिहूनही झाले आमच्या 'पोरींची' हीच खाशियत आहे.मेळावा, सहल,स्मरणिका काही असो सर्वांच्या अंगात उत्साह संचारतो तन अनेक मन एक असे होऊन जाते आणि ही एकत्रित शक्ती कामाचे सोने करते.मृदुलानी एक बाब लक्षत आणून दिली ती म्हणजे आपण लिहिणाऱ्या सगळ्या शिक्षिका आहोत.माईक हातात आला की बोलायला सुरु आणि लेखणी हातात आली की लिहायला सुरु.आम्ही सर्व तशा फार ग्रेट काही करत आहोत असे नाही. समान वेदनेने एकत्र आलो आणि तीच वेदना असलेल्यांसमोर व्यक्त झालो..आपल्या सर्वांनी कौतुक केले भरभरून प्रतिसाद दिले.आणि या छोट्याशा कृतीला उंचीवर नेले..मला मात्र.प्रत्येकाना प्रतिसाद देता आला नाही समारोपातून सर्वाना धन्यवाद देत आहे..

                           मंडळाची स्थापना झाली तेंव्हा आपले संस्थापक शरच्चंद्र पटवर्धन म्हणाले होते हा जगन्नथाचा रथ आहे याला पुढे न्यायचे तर अनेकांचे हात लागायला हवे.आत्तपर्यंत जे काम झाले ते असे अनेकांचे हात लागल्यानेच झाले.स्मरणिकेतील माझ्या उबंटू या लेखात मी म्हटले होते,' I am because we are'. पर्किन्सन्स मित्र मंडळ या 'I' च्या बाबतही हेच म्हणता येईल.

                           सुरुवातीच्या काळात शेंडे,अनिल आणि शीला कुलकर्णी, तीर्थळी, जे.डी, राजीव ढमढेरे,दिवाणे,व्ही.बी.जोशी,प्रज्ञा जोशी अशी कार्यकारिणीती शुभार्थींची संख्या जास्त होती.श्यामाताई ,मी, करमरकर,बर्वे एवढेच शुभंकर होतो.वेगवेगळ्या कारणाने. आता फक्त शुभंकर राहिले.

                         आत्ताही स्त्रियांच असलो तरी अनेक पुरुषांचे हातभार लागत आहेतच. अतुल ठाकूर बद्दल मृदुलाने लिहिलेच आहे तो आमच्यासाठी द्र्यव्हिंग फोर्स आहे..विलास गिजरे पायलट सहलीसाठी स्वत:ची गाडी घेऊन आले.रमेश तिळवे यादी अपडेट करायचे किचकट काम करतात.whats app ग्रुप पाहतात. वाढदिवस लक्षात ठेऊन मंडळातर्फे शुभेच्छा देतात.आम्हाला त्यांचा खूप आधार वाटतो.शरच्चंद्र पटवर्धन वयामुळे त्याना काम शक्य नसले तरी कार्यक्रम पाहतात व्हाईस मेसेज करून पाठ थोपटतात.कामाचा उत्साह त्यामुळे वाढतो.करमरकर पार्किन्सन्स मित्रमंडळाचे सर्वेसर्व होते. आतापर्यंतच्या मंडळाच्या प्रगतीत त्यांचा मोठ्ठा वाट आहे.प्रकृती अस्वास्थ्यामुळे. ते काम करू शकत नाहीत. पण मी लवकर बरा होऊन ऑफिसमध्ये बसेन अशी मनीषा ठेवून आहेत आणि या कल्पनेनेच आमचे बळ वाढते.

                      ११ एप्रिलच्या मेळाव्यासाठी सुरुवातीपासून मदतीला येणारी सावरकर, हर्डीकर, पुजारी, सोनाली, मोडक,जोशी ही मंडळी आणि महत्वाचे म्हणजे दर महिन्याच्या मीटिंगसाठी फोन करणारे आमचे Phone callers  याना कसे विसरता येइल.Phone callers मध्येही रमेश तिळवे वगळता सर्व स्त्रियाच आहेत.कार्यकारिणीतील स्त्रियांबरोबर इंदू  लोहार,सरोजिनी कुर्तकोटी,जोत्स्ना पुजारी,शैलजा कुलकर्णी,विजया दीवाणे या अनेक वर्षे हे काम करत आहेत.आम्ही न मागताही अनेकजण देणग्या देतात.सगळी सोंगे आणता येतात पण पैशाचे आणता येत नाहीत हे खरेच आहे.गिरीश आणि वैशाली यांचा मासिक सभा यशस्वी करण्यात वाटा आहे गिरीश आता ऑनलाईन सभानाही मदत करतो.विनय छपाईच्या कामाबरोबर त्याची नसलेली कामेही प्रेमाने करतो.यांच्या सर्वांच्या सहकार्यामुळे आमचे हात बळकट होतात.तरीही जितके हात वाढतील तितके हा जगन्नाथाचा रथ सहजपणे ओढता येईल. भविष्यकालीन योजना प्रत्यक्षात आणण्याचा वेग वाढेल.



                     

                 

                    

             

Saturday 16 October 2021

८. भक्कम आधारस्तंभ - परफेक्शनीस्ट दीपा होनप

 

                       ८. भक्कम आधारस्तंभ - परफेक्शनीस्ट दीपा होनप

                            ती आली,ती रमली,ती आमच्यातलीच झाली.अस दीपा बद्दल म्हणता येईल.ऑगस्ट १४ मध्ये ती प्रथम अश्विनी येथल्या मासिक सभेस आली. पार्किन्सन्स पेशंट असलेल्या आपल्या वडिलांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त काही तरी स्पॉन्सर करायच, या हेतूनी ती आली होती.पण तिला आम्ही सगळीच्या सगळी आमच्यात सामील करून घेण्यात यशस्वी झालो. मंडळासाठी ती अ‍ॅसेट आहे.वर्षानुवर्षे एकमेकाना ओळखतो असे आम्हा सर्वांनाच वाटते.प्रेम, विश्वास,आदर, कौतुक,आधार अशा सर्व भावना आम्हाला तिच्याबद्दल वाटतात.तिच्या येण्याने कार्यकारिणीत वेगळच चैतन्य आल.एक ताजातवाना दृष्टीकोन आला.कोणत्याही विषयावर अदबीने पण ठामपणे ती आपली मते मांडते.शुभार्थीना फोन करणे ,सभांचे फोटो काढणे,त्यात साफसफाई करून ते लगेच संगणकावर पाठवणे,सह्लीचे पूर्व नियोजन,सहलीत बक्षीस देण्यासाठी वस्तू निवडून आणणे,सहलीच्या ठिकाणी अनेक जबाबदाऱ्या उचलणे,व्याख्याते सुचवणे,त्यांची ओळख करून देणे,आभार मानणे, स्मरणिकेसाठी लेख देणे,मुद्रित शोधन,संचार आणि स्मरणिकेवर  पत्ते टाकणे,शुभार्थीच्या घरी भेटीस जाणे,यादी अजून बरीच लांबलचक आहे.आमची दीपा अशी  'ऑल इन वन' आहे. हे सर्व करताना तीची  इनव्हाल्व्हमेंट १०० टक्के असते.तरी कोणताही आव नसतो.हे महत्वाचे.

                           समाजमनात  मंडळाची प्रतिमा आदराची असावी,मंडळाचा कारभार स्वच्छ असावा यासाठी तिचा आटापिटा असतो. मंडळाची वेबसाईट असो व्हिडिओ असो की लिखित साहित्य ते उत्तम असावे यासाठी ती अनेक सूचना करत असते.संपादन करताना शुद्धलेखन असो की माहिती त्याची अचूकता तिच्यासाठी अत्यंत महत्वाची असते.तिचे समाधान होईपर्यंत ती तिचे विविध सोअर्स वापरते .वैद्यकीयदृष्ट्या माहितीच्या अचूकतेसाठी डॉक्टर होनप हे घरचाच सोअर्स आहेत.गुगलबाबाही असतातच.सहल,मेळावा,मासिक सभा सर्व  ठिकाणी तिच्यावर सोपवलेल्या कामाबरोबरच तो इव्हेंट सर्वांगाने चांगला होण्यासाठी तिची धडपड असते.तिचे शिक्कामोर्तब झाले की आय.एस.ओ. प्रमाणपत्र मिळाल्यासारखे वाटते.  
                         शासकीय तंत्र निकेतन,पुणे येथे अधिव्याख्याता विद्युत अभियांत्रिकी या पदावरून तिने २००९ मध्ये स्वेच्छया निवृत्ती घेतली.तिथला तिचा़ अनुभव सहली, कार्यशाळा,सभात उपयोगी पडतो.निवृत्तीनंतर वडिलांच्या निधनापर्यंत तिने त्यांची सेवा केली.एक आदर्श शुभंकर असल्याने मंडळातही सहजपणे ती सर्वांची शुभंकर झाली.
                         तिच्याबाबत एकच तक्रार आहे.ती ट्रस्ट सदस्य व्हायला अजिबात तयार नाही.मी सांगाल ती सर्व कामे ट्रस्ट बाहेर राहून करते असे ती म्हणते.आम्हाला हा अति भक्कम खांब सोडून तर जाणार नाही ना अशी असुरक्षितता नेहमी वाटत राहते.दीपा तुला जाहीर विनंती आहे आमची साथ सोडू नकोस.
         

Monday 11 October 2021

2. आधार स्तंभ दुसरा. डाॅ.शोभना तीर्थळी

 

2.
आधार स्तंभ दुसरा.
डाॅ.शोभना तीर्थळी,
उपाध्यक्ष,पार्किन्सन्स मित्रमंडळ.
हा,आधारस्तंभ, आम्हा सर्वांचा श्वास, मार्गदर्शक व आमची माता.
हो, माता कारण त्या आम्हाला 'माझ्या पोरी ' म्हणतात,आणि सर्वांची माऊलीसारखीच काळजी घेतात.
त्यांच्या प्रयत्ना मुळेच, आज आपली संस्था सात समुद्रापार पोचली, आता जगभर युट्यूब, फेसबुक वर आहोत. आपली वेबसाईट तयार झाली . शोभना ताईंनी या सर्वांचा विचार केला तेंव्हा त्यांना अतुल ठाकूर सारखं सोनं सापडलं.
सामाजिक शास्त्राचा गाढा अभ्यास, दूरशिक्षण देण्याचा कार्यानुभव, शिवाय प्रत्येक गोष्टी मधे, व्यक्तीमध्ये सकारात्मकता शोधून, त्याच्यातील चांगुलपणाला वाव देऊन स्वतःचे नाव कुठेही न आणता त्या गोष्टीला व व्यक्तीला क्रेडिट देणे हे त्यांनाच जमते.
प्रत्येकाला, त्याच्यातील कला, त्याच्यातील ज्ञान, त्याची कुवत पाहून तो/ती कोणत काम चांगलं करेल या बद्दल पटवून देतात.
स्वतः आजारी असतानाही ध्यास मंडळाचाच असे, मुलींनी काही महिने त्यांना थोडे दूर ठेवले होते पण त्यांच्या लक्षात आले की त्यांचं अन्न, पाणी व श्वास सारे काही Parkinson's Mitra Mandal च आहे तेंव्हा त्यांनी हत्यारे ठेवली.
मंडळाची सहल असो, वार्षिक मेळावा असो की वर्षाच्या पहिल्या महिन्याचा मनोरंजनाचा व तिळगुळाचा कार्यक्रम असो त्यासाठीची तयारी सर्वानुमते, सर्व सभासदांवर विश्वास ठेऊन freehand देतात.
श्री. तीर्थळी बरे नसताना मनात दडपण असतानाही, मुलींबरोबर दवाखान्याच्या खेपा करत असतानाही पार्किन्सन्सच्या इतर पेशंटनी कोविड पासून स्वतःला कसं दूर ठेवावं या बद्दल
डॉ. भोंडवे यांचं ऑनलाईन भाषण ठेवण्याचं आयोजन करत होत्या.
एक व्यक्ती इतकी selfless असते हे मी माझ्या आयुष्यात प्रथमच पहिलं आहे.
त्यांच्या मार्गदर्शन, प्रोत्साहनाने अष्टभुजाच बळ लाभतं.
निवेदन लिहिणे,
स्मरणिकेेतील लेख, लेखा नंतर उरलेली जागा भरण्यासाठी अर्थपूर्ण लिखाण निवडणे, फोटो पाठवणे अशी बरेच काम न कंटाळता करणे त्यांनाच जमते. जुने लेख, जुने फोटो शोधून काढण्याचा कंटाळा कधीच नाही करत.
सहलीच्या वेळी कोण पैसे भरूनही आलं नाही याच्यावर त्यांची नजर असते. ते निघालेत का, कुठे पोहोचले याची फोन करून खत्री करून घेतल्याशिवाय त्यांच्या जीवाला चैन पडत नाही.
सुरुवातीला ते व त्यांचे पती दोघेही घरभेटी देत असत. आजही त्या लोकांविषयी विचारले तर कुणाला काय प्रोब्लेम होते, कुणाला घरात काय अडचणी होत्या, कुणाचे कुटुंबीय किती प्रेमाने शुभार्थीची काळजी घेत असत सगळं सांगतात. काही शुभार्थी तर त्यांना देव पद देतात कारण त्यांच्यामुळे त्यांचं जीवन पूर्णपणे बदलल, त्यांची आपली माणसं त्यांना समजून घेऊ लागली.
ही आमची अष्टभुजा.
आशा रेवणकर

3. पार्किन्सन्स मित्रमंडळाचा अजून एक आधारस्तंभ " झाकल माणिक " - - आशाताई उर्फ विजयालक्ष्मी रेवणकर

 

3.
पार्किन्सन्स मित्रमंडळाचा अजून एक आधारस्तंभ
" झाकल माणिक " - - आशाताई उर्फ विजयालक्ष्मी रेवणकर
कार्यवाह, पार्किन्सन्स मित्रमंडळ.
मित्रहो,नवरात्राच्या निमित्ताने मंडळाच्या कार्यकारिणीतील एकेकीच्या कामाची आणि थोडीशी व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देण्याची कल्पना शोभनाताईंना सुचली.आज,तिसरी माळ. आज आपण ओळख करुन घेणार आहोत ती आशाताई रेवणकर यांची. खर तर अगदी नुकतेच सप्टेंबर अखेरीस, आपण त्यांच मनोगत ऐकले. आशाताईंची ताकद,धैर्य, प्रसंगावधान, संयम, मनोबल हे सारं आपण पाहिलं.शोभनाताईंनी त्यांची ओळख करुन देताना
त्यांना "झाकल माणिक " म्हटलं ते अगदी खर आहे.
अभिमानाने मिरवावे असे अनेक गुण अंगी असताना, त्या कुणाला त्याची कल्पनासुद्धा येऊ देत नाहीत. एका संपन्न सुशिक्षित कुटुंबात जन्म, तश्याच कुटुंबात विवाह ,अस सारं असतानाच रेवणकर काकांचा पार्किन्सन्स पाहुणा म्हणून कायमचाच त्यांच्या घरात आला.याबाबतीत आपण सारेच सहप्रवासी आहोत!! आशाताई, रेवणकर काकांच्या तब्येतीच्या चढऊतारांचा कसा सामना करतात हे साक्षात त्यांच्याकडून आपण ऐकलेच आहे.त्या पार्किन्सन्स मित्रमंडळात कामसुध्दा त्याच तडफेने करतात. तितकेच बारकाईने आणि काळजीपूर्वक करतात. एखाद्या ठिकाणी आमच्यासारख्या नवख्यां बरोबर आशाताई आहेत म्हटल्यावर श्यामलाताई आणि शोभनाताई निश्चिंत होतात.
याचे कारण,संस्था म्हटल्यावर सारासार विचार, संयम, ठेवून सेफ निर्णय घ्यावे लागतात. ते कसब त्यांच्याकडे आहे. भावना आणि कर्तव्याचा सुंदर मिलाफ, त्याला त्यांच्या बहुभाषिकतेची मिळालेली जोड
यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वामधे असलेला ठामपणा आपल्या मित्रमंडळाच्या वाढीसाठी पोषक आहे.
2008,सालापासून, आपल्या मंडळाबरोबर जोडलेले त्यांचे नाते,उत्तरोत्तर इतके द्रुढ होत चालले आहे, की पुण्यातील अनेक नामांकित डाॅक्टर्स त्यांना सपोर्ट ग्रुप च्या धडाडीच्या कार्यकर्त्या म्हणून आदराने ओळखतात. आणि ही सारी डाॅक्टर मंडळी आशाताईंच्या शब्दावर आपल्यासाठी उपलब्ध होतात.डाॅ.प्रयाग,डाॅ.राहुल कुलकर्णी,डाॅ.अमोल रेगे,डाॅ. अमोल तळवलीकर ,डाॅ. फडके ,डाॅ.पराग ठुसे हे सारे आशाताईंचे, कार्यकर्त्यां म्हणून डाॅक्टरांशी असणार्या ओळखीचे फलित आहे.
सपोर्ट ग्रुप मधे,आशाताई अक्षरशः Jack of All आहेत . बँकेचे व्यवहार, स्मरणिका निर्मिती,लेखांचे अनुवाद,कार्यक्रमांचे सूत्र संचालन,शुभार्थींचा विचार करून नियोजन करणे मग ते वार्षिक सहल असो वा जागतिक पार्किन्सन्स दिनाचा कार्यक्रम असो त्यासाठी सोईचे ठिकाण ठरविणे ,प्रमुख वक्त्यांची ऊठबस.,ऐनवेळी उद्भवणारे प्रसंग हाताळणे.....आणि घरामधे रेवणकर काकांसारखे शुभार्थी! हे सारे सांभाळणारी ही बुध्दीवादी सखी ,मंडळाची शान आणि प्रेरणा आहे...तिला मनःपूर्वक सलाम!
शब्दांकन : मृदुला कर्णी

सविता ढमढेरे मंडळाचा आणखी एक भक्कम आधार स्तम्भ.

 

सविता ढमढेरे
मंडळाचा आणखी एक भक्कम आधार स्तम्भ.
आमच्या कडे तिची एन्ट्री हळूवार झाली. अगदी तिच्या शांत व नाजूक स्वभावा प्रमाणे. सावकाश आमच्यात मिसळू लागली. मंद , हलका , सुखद वारा असतो ना तशी.
आमच्या बहुतेक मीटिंग तिच्याकडे होऊ लागल्या. खाऊ घालण्यात अतिशय उत्साही असल्याने ते ही ती आगत्याने करू लागली.
Dr. डोळे यांनी आमच्या पेशंट साठी होमिपॅथी औषधांचा experiment करण्याची तयारी दाखवली तेव्हा वसुमती देसाई सह तिनेही आपला बंगला पेशंट तपासण्यासाठी दिला.
सहलीच्या वेळी खाण्याची पाकिटे व लागणारे इतर साहित्य तयार ठेवण्याचे काम अगदी हसत मुखाने करते.
वार्षिक मेळाव्या नंतर, पुढील सुधारणा, झालेल्या चुका, प्रगती साठी अजून काय करावे हे गप्पा मारत, खाऊ खात, चहा व कॉफी पीत श्रम परिहार करण्यासाठी सविताने तिच्या आईचे बंद असलेले घर स्वच्छ करून , तयारी करून मंडळासाठी सुसज्ज करून ठेवले होते. तो बंगला मध्यवर्ती ठिकाणी असल्याने सर्वांना सोईचे होईल हा तिचा हेतू होता.
सर्वात महत्वाचे म्हणजे मंडळाला तिच्या यजमानांचे खास मित्र श्री. येरवडेकर हे चार्टर्ड अकाऊंटंट म्हणून लाभले. त्यांनी तर मंडळा कडून आज तागायत एक पैसा घेतला नाही . कर्मण्ये वाधिकरस्ते ..... असे त्यांचे काम चालले आहे. त्यासाठी आम्ही त्यांचे ऋणी आहोत व सविताला किती धन्यवाद द्यावे ते समजत नाही.
आणखी एक तेवढंच मोलाचं काम तिने आपल्यासाठी केलं आहे, ते म्हणजे, तिच्या मालकीच्या एका इमारतीत एक खोली नाममात्र भाड्याने (ते ही सरकारी नियम म्हणून) तिने मंडळाच्या ऑफिस साठी दिली आहे.
मंडळ इतकं मोठं व्हावं की त्याने पार्किन्सन्सच्या शुभार्थीसाठी एक डे केर सेंटर काढावं, त्यांच्या शुश्रुषा साठी नर्सेस ना स्पेशल ट्रेनिंग द्यावं वगैरे तिची स्वप्न आहेत. देव नेहमी तथास्तु म्हणत असतो म्हणे, आम्ही तिच्या जागेच्या मंडळाच्या ऑफिस मध्ये बसून तिची स्वप्ने साकार होउदेत म्हणू, मग तो तथास्तु म्हणेल.. नक्की.
विजयालक्ष्मी (आशा) रेवणकर