Friday 5 February 2021

वाटचाल - ठळक टप्पे

 

                                                 वाटचाल -  ठळक टप्पे

                                  

    सुरुवातीचा काळ

  • २००० -  शरच्चंद्र पटवर्धन यांनी त्यांच्या सोसायटीतील रक्तदान शिबिरात पार्किन्सन्स आजाराविषयी माहिती पत्रके वाटली.
  • ९ ऑक्टोबर २००० -  टाइम्सच्या अविनाश ठोंबरे यांनी पत्रक पाहिले आणि संपर्क साधून टाइम्समध्ये यासंबंधी निवेदन व लेख  दिला.
  • २२ ऑक्टोबर २००० -  लेख वाचून चौकशी करणाऱ्यांची शरच्चंद्र पटवर्धन यांच्या घरी सभा होऊन ‘पार्किन्सन्स रुग्ण मित्रमंडळा’ची स्थापना झाली.पुढे काही महिने घरीच भेटी झाल्या.
  • २००२ -  दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातर्फे पार्किन्सन्सवर चर्चासत्र झाले. तेथे अमेरिकन सपोर्ट ग्रुपसारखा ग्रुप करावा असा मधुसूदन शेंडे यांनी मनोदय मांडला.यानंतर शरच्चंद्र पटवर्धन व मधुसूदन शेंडे या दोन पूर्वीच्या सहकारी मित्रांनी एकत्र काम सुरु केले.घरी, बागेत,शाळेत अशा ९/१० सभा झाल्या.
  • ३१ जानेवारी २००३ ते २५ मे २००४ – दीनानाथ हॉस्पिटल येथे दर महिन्याला सभा झाल्या.
  • १२ फेब्रुवारी २००४ – वाडेश्वर हॉटेल येथे डॉ.राहुल कुलकर्णी आणि डॉ.चित्रे यांच्याबरोबर मीटिंग झाली.
  • सप्टेंबर/ऑक्टोबर २००६ - मधुसूदन शेंडे यांनी पार्किन्सन्स सपोर्ट ग्रुप स्थापन झाल्याची पत्रके काढून ज्येष्ठ नागरिक संघांना वाटली.यातून काही कार्यकर्ते मिळाले.
  • २००७ -  शरच्चंद्र पटवर्धन, मधुसूदन शेंडे यांनी अनेक सपोर्ट ग्रुप्सना एकत्र करणाऱ्या ‘सेतू’ गटात सहभाग घेतला.पार्किन्सन्स सपोर्ट ग्रुप त्याचा सदस्य गट झाला.
  • ० एप्रिल २००८ - दीनानाथ हॉस्पिटलच्या सहकार्याने मेळाव्याचे आयोजन केले.सुमारे ३०० जणांची उपस्थिती होती. न्यूरॉलॉजिस्ट डॉ. राहुल कुलकर्णी, आहारतज्ज्ञ मालविका करकरे, फिजिओथेरपिस्ट अर्चना फणसळकर, स्पीचथेरपिस्ट डॉ.लेहनाझ उम्रीगर यांची व्याख्याने झाली.
  • जून २००८ -  दीनानाथ हॉस्पिटलमध्ये उपस्थित असणाऱ्यांची पूना हॉस्पिटल येथे गटवार सभा झाली. त्यातून अनेक कार्यकर्ते सामील झाले.कामाला गती आली.पुण्यातील शहर ,सहकार नगर,डेक्कन,औंध,सिंहगड रोड,कोथरूड अ, आणि कोथरूड ब असे विभाग ठरवले. विभागवार गटप्रमुख, कार्यकर्ते निश्चित केले.पुढील काही काळात  उपस्थित सदस्यांची संख्या लक्षात घेऊन सहकारनगर, कोथरूड आणि शहर हे तीन विभाग राहिले.

    ‘पार्किन्सन्स मित्रमंडळ’ नावाने कामास सुरुवात

  • जुलै २००८ -  रचना व उद्दिष्टानुसार आराखडा तयार करून त्यानुसार विभागवार सभा आणि इतर कार्यवाहीस सुरुवात झाली. ‘पार्किन्सन्स मित्रमंडळ’ नावाने काम चालू झाले.व्याख्याने, सदस्यांचे शेअरिंग,कार्यशाळा असे विविध उपक्रम चालू झाले. अनुभवाने मध्यवर्ती ठिकाणी येणे सर्वांना सोयीचे होते हे लक्षात घेऊन अश्विनी लॉज,नवी पेठ येथे सभा सुरु झाल्या.
  • २००८ - प्रसिद्ध भरतनाट्यम नर्तिका सुचित्रा दाते यांच्या 'नृत्यप्रेरणाया संस्थेद्वारे दर शुक्रवारी  पार्किन्सन्स शुभंकर, शुभार्थींसाठी नृत्योपचार वर्ग सुरु झाला.
  • ११ एप्रिल २००९ -  लोकमान्य सभागृह केसरीवाडा येथे पार्किन्सन्स दिनानिमित्त प्रसिद्ध अभिनेत्री लालन सारंग यांच्या अध्यक्षतेखाली मेळावा झाला.न्यूरॉलॉजिस्ट डॉ. प्रदीप दिवटे,मनोविकारतज्ज्ञ डॉ.उल्हास लुकतुके यांची व्याख्याने झाली.
  • २००९  - ‘सेतू’ या संस्थेबरोबर सकाळ आरोग्य प्रदर्शनात सहभाग घेतला. सहभागी गट म्हणून ‘फॅमिली डॉक्टर’ या सकाळच्या पुरवणीमध्ये शरच्चंद्र पटवर्धन यांनी लेख लिहिला. आकाशवाणीवर शुभार्थी अनिल कुलकर्णी आणि न्यूरॉलॉजिस्ट डॉ.सुधीर कोठारी यांची मुलाखत विनया मेहेंदळे यांनी घेतली.
  • २००९ - पूना हॉस्पिटलने रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त महिन्यातून एकदा त्यांचे सुसज्ज सभागृह वर्षभरासाठी उपलब्ध करून दिले.
  • ११ जुलै २००९ - सर्व सदस्यांची माहिती घेण्यासाठी सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले.
  • ३० सप्टेंबर २००९ – पानशेत,वरसगाव येथे सदस्यांच्या क्षमतेचा अंदाज घेण्यासाठी कार्यकर्त्यांची सहल काढण्यात आली.
  • ८ नोव्हेंबर २००९ – सुस बाणेर रोडवरील अनिल कुलकर्णी यांच्या फार्म हाऊसवर अर्ध्या दिवसाची पहिली सहल गेली.
  • ११ एप्रिल २०१० -  लोकमान्य सभागृह केसरीवाडा येथे पार्किन्सन्स दिनानिमित्त मेळावा झाला.डॉ.अनिल अवचट प्रमुख पाहुणे होते.पहिल्या स्मरणिकेचे प्रकाशन व शुभार्थींच्या कलाकृतींचे प्रदर्शन झाले.
  • २०१० - झुबीन बलसारा आणि कविता नायर यांनी आर्टबेस्ड थेरपीचा प्रयोग आठवड्यातून एकदा दोन तास घेण्यास  ड्रम थेरपीने सुरुवात केली.चार महिने हा प्रयोग चालला.
  • जुलै २०१० - खडीवाले वैद्य यांच्या औषध निर्मिती कारखान्यास भेट दिली.
  • १० ऑगस्ट २०१० - संचेती हॉस्पिटलच्या सहकार्याने हृषीकेश पवार यांनी पार्किन्सन्स नृत्योपचार सुरु केला.
  • ऑक्टोबर २०१० - लोकमान्य हॉस्पिटल चिंचवड येथे सभांना सुरुवात झाली.सलग तीन महिने सभा झाल्या. जागतिक वृद्ध दिनानिमित्त इंग्लंड येथील पिअर वॉलीस यांची भेट हा विशेष कार्यक्रम झाला.त्यांनी  इंग्लंड येथील पार्किन्सन्स सेवेची माहिती सांगितली. चिंचवड येथील उपगट अल्प उपस्थितीमुळे बंद करावा लागला.
  • एप्रिल २०११  - लोकमान्य सभागृह केसरीवाडा येथे पार्किन्सन्स दिनानिमित्त मनोविकारतज्ज्ञ डॉ. उल्हास लुकतुके यांच्या अध्यक्षतेखाली मेळावा आणि स्मरणिका प्रकाशन झाले.
  • ८ मे २०११ - नंदादीप हॉस्पिटल येथे दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी सभा सुरु झाल्या.८ मेला त्याचा शुभारंभ झाला.
  • जून २०११ - शुभार्थी अरुण जोग यांच्या घरी हृषीकेश पवार यांचा नृत्योपचार वर्ग सुरु झाला.
  • जून २०११ - आयसर्जन डॉ. टेकावडे यांच्या मोफत डोळे तपासणी शिबिराचे आयोजन केले.
  • ११ सप्टेंबर २०११ – बी.जे.मेडिकल कॉलेज येथे भारतीय पातळीवरील न्यूरॉलॉजिकल कॉन्फरन्स झाली.संध्याकाळचे सत्र सर्वसामान्यांसाठी होते. मंडळाच्या सदस्यांनी यामध्ये सहभाग घेतला.
  • २०११ - अमेरिकन पार्किन्सन्स डिसीज असोसिएशन ( APDA) कडून पार्किन्सन्सवरील पुस्तकांच्या मराठीतून भाषांतरास परवानगी मिळाली.
  • डिसेंबर २०११ – डॉ. विवेक लिमये यांच्या फार्म हाऊसवर सहल गेली.
  • एप्रिल २०१२ -  लोकमान्य सभागृह केसरीवाडा येथे पार्किन्सन्स दिनानिमित्त डॉ.ह.वि.सरदेसाई यांच्या अध्यक्षतेखाली मेळावा व स्मरणिका प्रकाशन झाले.अमेरिकास्थित सुधा कुलकर्णी यांनी दिलेल्या देणगीतून ‘चला संवाद साधूया ,आहार-कोणता, केंव्हा व किती’ या रामचंद्र करमरकर अनुवादित पुस्तकाचे प्रकाशन झाले.
  • १९ मे २०१२ - सिप्ला सेंटरने शुभंकरांसाठी कार्यशाळा आयोजित केली होती.
  • ३० ऑगस्ट २०१२ - डी.वाय.पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या डॉक्टर्सनी शिबिर आयोजित केले होते. नंतर प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी विविध गट करून व्यायाम शिकवले गेले.
  • २ जानेवारी ते ९ जानेवारी २०१३ – आनंदवन, हेमलकसा,सोमनाथ, ताडोबा सहल आयोजित केली होती.
  • १९ जानेवारी २०१३ - डॉ.अनिल अवचट यांच्या ओरिगामी प्रात्यक्षिकाचे आयोजन केले.
  • ४ फेब्रुवारी २०१३ - बागुल उद्यान,पुणे येथे सहल गेली.
  • एप्रिल २०१३ -  अमेरिकन पार्किन्सन्स डिसीज असोसिएशनने श्री. व सौ.शेंडे यांना पार्किन्सन्सविषयक कामगिरीसाठी गौरव करणारे प्रमाणपत्र  प्रदान केले.
  • एप्रिल २०१३ - लोकमान्य सभागृह केसरीवाडा येथे पार्किन्सन्स दिनानिमित्त मेळावा झाला. मनोविकारतज्ज्ञ डॉ. संजय वाटवे यांचे व्याख्यान, शुभार्थींचा नृत्याविष्कार व स्मरणिका प्रकाशन झाले.
  • १४ एप्रिल २०१३ - आकाशवाणी पुणेच्या ‘ स्नेहबंध’ कार्यक्रमात डॉ.शोभना तीर्थळी यांनी लिहिलेल्या पार्किन्सन्स मित्रमंडळाच्या कार्यावर आधारित श्रुतिका सादर झाली.
  • मे २०१३ – ‘ पार्किन्सन्सशी मैत्रीपूर्ण लढत’ या शेखर बर्वे लिखित पुस्तकाचे प्रकाशन न्यूरॉलॉजिस्ट डॉ.प्रदीप दिवटे यांच्या हस्ते व डॉ. माया तुळपुळे यांच्या अध्यक्षतेखाली झाले.
  • १७ नोव्हेंबर २०१३ - सुस बाणेर रोडवरील अनिल कुलकर्णी यांच्या फार्म हाऊसवर अर्ध्या दिवसाची पुन्हा एकदा सहल गेली. 
  • ९ फेब्रुवारी २०१४ - पार्किन्सन्स मित्रमंडळास मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रातर्फे  ‘डॉ.अनिता अवचट स्मृती संघर्ष पुरस्कारप्रदान करण्यात आला.

   सोशल मिडीयाद्वारे प्रसारास सुरुवात

·                          मार्च २०१४ - श्री. अतुल ठाकूर यांनी पार्किन्सन्स मित्रमंडळाची वेबसाईट 

     तयार केली.

  • एप्रिल २०१४ -  लोकमान्य सभागृह केसरीवाडा येथे पार्किन्सन्स दिनानिमित्तच्या  मेळाव्यात न्यूरोसर्जन डॉ. सुनील पंड्या यांचे व्याख्यान, शुभार्थींचा नृत्याविष्कार व स्मरणिका प्रकाशन झाले.
  • जुलै २०१४ – ‘संचार’ या जुलै, ऑक्टोबर आणि जानेवारीमध्ये निघणार्‍या संवादपत्रिकेचा पहिला अंक निघाला.
  • ऑगस्ट २०१४ -  फेसबुकवर Parkinson’s mitramandal ही community सुरु केली.
  • १२,१३,१४ सप्टेंबर २०१४ – ‘ Artistry संस्थेतर्फे भरलेल्या ‘देणे समाजाचे’ या प्रदर्शनात सहभाग घेतला.
  • १४ सप्टेंबर २०१४ - हृषीकेश पवार यांच्या Dance for Parkinsons’ या फिल्मचे अनावरण डॉ.कांतिलाल संचेती यांच्या हस्ते झाले.सहभागी शुभार्थींनी आपली मनोगते व्यक्त केली.
  • ११ डिसेंबर २०१४ - सन वर्ल्ड खानापूर येथे सहल गेली.

·         एप्रिल २०१५  - लोकमान्य सभागृह केसरीवाडा येथे पार्किन्सन्स दिनानिमित्तच्या  मेळाव्यात डॉ.अरविंद फडके यांचे व्याख्यान, शुभार्थींचा नृत्याविष्कार, शुभार्थींच्या कलाकृतींचे प्रदर्शन  व स्मरणिका प्रकाशन झाले.

·         २ जुलै २०१५ -  न्यूरॉलॉजिस्ट डॉक्टर  राहुल कुलकर्णी यांचे  पार्किन्सन्स आजारावरील अद्ययावत माहिती' या विषयावर व्याख्यान झाले.पार्किन्सनन्स मित्रमंडळाचे संस्थापक मधुसूदन शेंडे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

·            १० सप्टेंबर २०१५ – ‘मित्रा पार्किन्सना' या डॉ. शोभना तीर्थळी लिखित, संकलित  आणि ई प्रतिष्ठानने प्रकाशित केलेल्या ई पुस्तकाचे श्री.शरच्चंद्र पटवर्धन यांच्या हस्ते प्रकाशन  झाले.

·              ,१०,११ ऑक्टोबर २०१५ - रोजी ‘Artistry’ संस्थेच्या 'देणे समाजाचे' या प्रदर्शनात पार्किन्सन्स मित्रमंडळानी सहभाग घेतला.

·          २९ ऑक्टोबर २०१५ – महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक सभे’तर्फे विविध विषयात दिल्या जाणार्‍या पारितोषिकांचा वितरण समारंभ झाला. आरोग्य विभागात पार्किन्सन्स मित्रमंडळाचे कार्यकारिणी सदस्य,शुभंकर शेखर बर्वे लिखित 'पार्किन्सन्सशी मैत्रीपूर्ण लढत ' या पुस्तकास प्रसिद्ध पत्रकार  किरण ठाकूर यांच्या हस्ते पारितोषिक दिले गेले.

·         २२ नोव्हेंबर २०१५ -  PMMP GAPPA हा  Whats App group तयार केला.

·         १० डिसेंबर २०१५ - प्रथमच पूर्ण दिवसाची सहल पुण्याहून ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या फुलगाव येथील ‘इन्व्हेस्टमेंट इन मॅन ट्रस्ट’ आणि तुळापुर येथील संभाजी महाराजांची समाधी येथे गेली.

·          १२ जानेवारी २०१६ - दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल आणि पार्किन्सन्स मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने न्यूरॉलॉजिस्ट डॉ. मंदार जोग ( कॅनडा ) यांचे  व्याख्यान  झाले.

·         ११ फेब्रुवारी २०१६ End of life care या विषयावर भारती हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरच्या  सेमिनारमध्ये मित्रमंडळाने सहभाग घेतला.

·            ३ मार्च २०१६ -  सैलानी  परिवार, सांगवीच्या अरविंद काशिनाथ भागवत आणि सहकारी यांच्यामार्फत  त्यांचे गुरु सैलानी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी वृत्तीने काम करणारी  संस्था म्हणून सत्कार झाला आणि ११,१११ रुपये देणगी देण्यात आली.

·          0  एप्रिल २०१६ -  लोकमान्य सभागृह  केसरी वाडा येथे जागतिक पार्किन्सन्स दिनानिमित्त मेळाव्यात मनोविकारतज्ज्ञ डॉ. विद्याधर वाटवे यांचे व्याख्यान, शुभार्थींचा नृत्याविष्कार, स्मरणिका प्रकाशनशुभार्थींच्या कलाकृतींचे प्रदर्शन झाले.

·          जून २०१६ - कमिन्स इंजिनिअरिंग कॉलेजच्या  विद्यार्थिनींनी मंडळाच्या सहकार्याने कंप मोजण्याचे App तयार करण्याचा प्रकल्प हाती घेतला.

·           १ सप्टेंबर २०१६ -  लोणी येथील प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या न्यूरोफिजिओथेरपिस्ट नेहा सिंग आणि सहकारी विद्यार्थिनींनी फिजिओथेरपी कार्यशाळा  आयोजित केली.

·          १८ नोव्हेंबर २०१६ - शांतीवन येथे पूर्ण वेळची सहल गेली.

·           ९ एप्रिल २०१७ - लोकमान्य सभागृह केसरी वाडा येथे जागतिक पार्किन्सन्स दिनानिमित्त मेळाव्यात न्यूरॉलॉजिस्ट डॉ. राजस देशपांडे यांचे व्याख्यान, शुभार्थींचा नृत्याविष्कार, स्मरणिका प्रकाशन व शुभार्थींच्या कलाकृतींचे प्रदर्शन झाले.

 

'पार्किन्सन्स मित्रमंडळ' नावाने ट्रस्टची सुरुवात.

·         १६ सप्टेंबर २०१७ - ‘पार्किन्सन्स मित्रमंडळ’ या नावाने न्यासाची ( ट्रस्ट ) सुरुवात झाली.

·            ११ ऑक्टोबर २०१७ -  PARKINSON INFO & SHARING हा  Whats App group तयार केला.

·         ऑक्टोबर २०१७ – शरच्चंद्र पटवर्धन यांनी प्रामुख्याने शय्याग्रस्त शुभार्थींसाठी श्रवणोपचार प्रयोगासाठी छोटे एमपी ३ प्लेअर शुभंकर, शुभार्थींना मोफत दिले.

·           १ नोव्हेंबर २०१७ - अभिरुची फार्म हाऊस येथे सहल गेली.

·            ११ डिसेंबर २०१७ - या महिन्यापासून  नर्मदा हॉल, प्रभात रोड येथे दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी मासिक सभा सुरु झाल्या.

·             ९ एप्रिल २०१८ -  एस.एम.जोशी सभागृह येथे  जागतिक पार्किन्सन्स दिनानिमित्त मेळाव्यात मनोविकारतज्ज्ञ डॉ.उल्हास लुकतुके यांचे व्याख्यान, शुभार्थींचा नृत्याविष्कार, स्मरणिका प्रकाशन व शुभार्थींच्या कलाकृतींचे प्रदर्शन झाले.

·          २३ एप्रिल,२८ मे, २५ जून २०१८ -  ठाणे येथील प्रसिध्द आय.पी.एच. मानसिक आरोग्य संस्थेच्या पुणे येथिल शाखेत सभा झाल्या.        

·           १ नोव्हेंबर २०१८ -  घाडगे फार्म हाऊस येथे सहल गेली.

·           १३  एप्रिल २०१९  -  एस.एम.जोशी सभागृह येथे  जागतिक पार्किन्सन्स दिनानिमित्त मेळाव्यात न्यूरॉलॉजिस्ट डॉ.चारुशीला सांखला यांचे व्याख्यान, शुभार्थींचा नृत्याविष्कार, स्मरणिका प्रकाशन व शुभार्थींच्या कलाकृतींचे प्रदर्शन झाले.

·           २६ नोव्हेंबर २०१९ - मनाली रिसॉर्ट आणि कृषी पर्यटनकेंद्र ,नायगाव येथे सहल गेली.

·            ९ जानेवारी २०२० – ‘नातू ट्रस्ट’ कडून समाजोपयोगी कामासाठी  रु.२५,००० ची देणगी मिळाली.

                      

कोरोना काळ

·         ४ एप्रिल २०२० - जागतिक पार्किन्सन्स दिनानिमित्त मेळावा आयोजित केला होता. कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर झाल्याने मेळावा घेता आला नाही.             

·           एप्रिल २०२० लॉकडाऊनमुळे मासिक सभा होणे शक्य नसल्याने अतुल ठाकूर यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सचा पर्याय सुचविला. त्याद्वारे नेहमीच्या मासिक सभेप्रमाणे दुसऱ्या सोमवारी व्याख्याने,शेअरिंग इत्यादी करायचे ठरले.पहिली ट्रायल मीटिंग झाली.

·         एप्रिल २०२० – हृषीकेश पवार यांचा नृत्योपचार वर्ग ऑनलाईन सुरु झाला.

·          १३ जुलै २०२० आय.एम.ए.चे अध्यक्ष डॉ.अविनाश भोंडवे यांच्या हस्ते ऑनलाईन ‘स्मरणिका २०२०’ चे प्रकाशन आणि त्यांचे व्याख्यान झाले.

·         २ नोव्हेंबर २०२० - 'भेटू आनंदेहा शुभंकर, शुभार्थींच्या अनौपचारिक भेटीचा उपक्रम व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारा सुरु झाला.

  १२ जानेवारी २०२१ - आयकर विभागाच्या Section 80 G Income tax Act 1961 नुसार पार्किन्सन्स मित्रमंडळास देणगीत सवलत मिळण्यास सुरुवात झाली. 

 ११ एप्रिल २०२१ -  जागतिक पार्किन्सन्स दिनानिमित्त दुरदृष्यप्रणालीद्वारे मेळावा आयोजित करण्यात आला.क्रिटिकलकेअर स्पेशालिस्ट डॉ.शिरीष प्रयाग आणि कन्सल्टंट पॅथालॉजिस्ट डॉ.आरती प्रयाग यांनी 'दोन ध्रुव' (स्व.पु.ल.देशपांडे आणि स्व.विजय तेंडूलकर यांच्या प्रयाग हॉस्पिटलमधील उपचारा दरम्यानचे अनुभव) या विषयावर व्याख्यान झाले.या प्रसंगी स्मरणिका २०२० आणि २०२१ या दोन्ही वर्षातील जोड स्मरणिकेचे प्रकाशन झाले. याशिवाय शुभार्थींचा नृत्याविष्कार व शुभार्थींच्या कलाकृतींचे प्रदर्शन झाले. 

   सोमवार २१ जून २०२१ - लाईफस्पार्क टेक्नोलॉजी - साईन आयआयटी मुंबईचे अमेय देसाई यांचे 'Sensory cuing to improve gait and reduce falls'  यासाठी device करण्याच्या त्यांच्या प्रयोगाबद्दल बोलणे झाले.

    शुक्रवार २५ जून २०२१ - अमेय देसाई यांच्या प्रयोगात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांची झूम मिटिंग झाली.यानंतर अमेय देसाई यांनी पुण्यात प्रत्यक्ष येऊन प्रत्येकाची चाचणी घेतली आणि प्रयोगाचा पहिला टप्पा झाला..

   ५ सप्टेंबर २०२१ - शेखर बर्वे यांच्या 'पार्किन्सन्सशी मैत्रीपूर्ण लढत' या पुस्तकाच्या सुधारित दुसऱ्या आवृत्तीचे ऑनलाईन प्रकाशन दिनानाथ मंगेशकर हास्पीटलच्या न्युरॉलॉजी विभागाचे प्रमुख न्युरॉलॉजिस्ट डॉक्टर राहुल कुलकर्णी यांच्या हस्ते झाले.

   १०  एप्रिल २०२२ - जागतिक पार्किन्सन्स दिनानिमित्त दुरदृष्यप्रणालीद्वारे मेळावा आयोजित करण्यात आला. मनोविकास तज्ज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी  यांचे "मजेत कसे जगावे" या विषयावर व्याख्यान झाले.स्मरणिका २०२२ चे आणि प्रकाशन झाले. याशिवाय शुभार्थींचा नृत्याविष्कार व शुभार्थींच्या कलाकृतींचे प्रदर्शन झाले.

   २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर २२ - "जागर नऊ दिवसांचा" ही  नवरात्रानिमित्त लेख मालिका प्रसिद्ध झाली.आजार,अपघात होऊनही आपले स्वप्न,कार्य,आयुष्य यशस्वीपणे पुढे नेणाऱ्या विरांगनांवर ही मालिका होती.

   १  डिसेंबर २०२२ - शुभार्थी आणणा गोरडे यांचे मोराची चिचोली येथील कृषीपर्यटन केंद्र येथे पूर्ण दिवसाची सहल गेली ७० शुभंकर,शुभार्थी सहभागी झाले. 

    जानेवारी २०२३ - गोवा येथील दिव्यांगांच्या राष्ट्रीय स्तरावरील "पर्पल फेस्टिवल २०२३" या परिषदेस शुभार्थी उमेश सलगर हे  संस्थेचे दूत म्हणून सहभागी झाले.

  ९ एप्रिल २०२३ - जागतिक पार्किन्सन्स दिनानिमित्त तीन वर्षानंतर प्रत्यक्ष मेळावा घेण्यात आला. क्रीडा वैद्यक तज्ज् डॉक्टर हिमांशू वझे यांच 'स्वास्थ्य संयोजन' या विषयावर व्याख्यान झाले.२०२३ ची स्मरणिका,'चला संवाद साधूया ...' या भाषांतरीत पुस्तकाच्या द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन झाले, कलाकृतीचे प्रदर्शन हे ही आकर्षण होते.

 १६ एप्रिल २०२३ - डॉ.अतुल ठाकूर आणि शुभार्थी मोहन पोटे हे पार्किन्सन मित्रमंडळाचे प्रतिनिधी म्हणून 'Public Forum on Neurorehabilitation Flo For 16th April 2023' या बांद्रा येथील सेमिनारसाठी उपस्थित राहिले.मंडळाची माहिती आणि अनुभव सांगितले.


.