Monday 29 February 2016

पार्किन्सन्स मित्र - उल्हास गोगटे यांची कविता.

                      
                                        पार्किन्सन्स मित्र
                     एक नवखा आला  पाहुणा ,प्रेमात माझ्या पडला.
                    आगंतुक तो, हाकलूनही,तळ ठोकुनी बसला |
                    काय करावे काही सुचेना,उपाय सारे थकले
                     अस्तित्व त्याचे  हळूहळू मी,स्वीकारुनी हो बसले |
                     काळही जाता मैत्री जमली,सहजीवन जमले,
                    परका होता,घरचा झाला अखंड नाते,जडले |
                    एकत्र जगू एकत्र मरू,त्याने मजला म्हटले,
                    करेल त्याचा शब्द खरा तो हेही मजला पटले |
                    रडण्यापेक्षा मुळूमुळू हा मार्ग मैत्रीचा सुखाचा.
                    माझ्यासम जे असती त्याना हा सल्ला मोलाचा |
उल्हास गोगटे यांनी आपली ही १३५० वी कविता मेलवरून पाठवली.यासाठी त्यांनी नातीची मदत घेतली होती.पाहिली का विचारायला त्यांचा फोन आला.त्यांच्या रिपेअर होऊ न शकणार्या डोळ्याच्या समस्येमुळे हल्ली लिहिता वाचता येणे कठीण झाले आहे.यापूर्वी त्यांचे तीन कविता संग्रह प्रकाशित झाले आहेत.पार्किन्सन्समुळे अनेक वर्षे शय्याग्रस्त पत्नीचे आदर्श शुभंकर म्हणून त्यांची ओळख सांगता येईल.त्यांच्या बहुआयामी व्यक्तित्वावर  एक स्वतंत्र लेख लिहायाचा आहे.पण त्यापूर्वी त्यांचा मोलाचा सल्ला शुभार्थी पर्यंत पोचवण्यासाठी ही कविता