Saturday 4 August 2018

पार्किन्सन्स विषयक गप्पा - २०

                            जुन्नरच्या शुभंकर वंदना नानावटी पुण्यात आल्या की वेळात वेळ काढून ५ मिनिटे तरी भेटून जातात.कधी स्मरणिका पोचली सांगायला,कधी देणगी द्यायला,कधी शंका विचारायला कधी मन मोकळे करायलाही.मला त्यांचे नेहमीच कौतुक वाटते.काही उच्च शिक्षित शुभंकरांच्या पार्श्वभूमीवर जास्तीच.एक अति उच्चशिक्षित शुभंकर आणि शुभार्थी.दोघे निवृत्त,भरपूर पेन्शन,मुलगा अमेरिकेत.इंटरनेटवरून पीडीबाबत अत्याधुनिक सर्व माहिती असलेला.घरात सकाळी दिवसभरासाठी एक नोकर रात्रीसाठी दुसरा.बसल्या जागी सर्व गोष्टी हातात मिळण्याची सोय केलेली.फिजिओथेरपिस्ट आठवड्यातून तीनदा येतो.शेजाऱ्यांशी फारसा संबध नाही. परस्पर संवादही कमीच.एकुणात पीडिला विकत घ्यायचा प्रयत्न.आणि याला दाद न देणारा नाठाळ पीडी.दुसऱ्या एक तथाकथित समाजसेविका एकटाच घरी असलेल्या पतीला औदासिन्याने  ( apathy ) ग्रासलेले.आत्मविश्वास गमावलेला.घरभेटीला आमचे शेंडे साहेब गेले होते. समाजसेविका  म्हणाल्या,हे जागेवरून उठू शकत नाहीत.शेंडेनी थोडा वेळ गपा मारल्यावर त्यांच्या लक्षात आल.त्याचं मानसिक बळ वाढवल्यास ते चालू शकतील.त्यांनी स्वत: तसा प्रयत्न केला आणि शुभार्थी चालू लागले.मग त्या तथाकथीत शुभंकराला सुनवल्याशिवाय शेंडेसाहेब  थोडेच गप्प बसणार होते.आम्हाला हे सुनावणे जमत नाही.एका ओळखीच्या घरी मात्र आम्ही हे केले. आणि शुभंकरानीही समजून घेतले सभांना यावयास सुरुवात केली.
शुभार्थित झालेला बदल त्यांनाही जाणवला.                            

                    येथे मला आवर्जून सांगावेसे वाटते,कोणताही आजार पूर्ण बरा होण्यासाठी,आटोक्यात ठेवण्यासाठी औषधोपचाराबरोबर भोवतालचे वातावरण,शुश्रुषा,रुग्णाचा सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे.यांचा मोलाचा वाटा असतो.पीडीसारख्या कायमच्या चिकटलेल्या गुंतागुंतीच्या आजारात तर या सर्वांचे महत्व अधिकच वाढते.यासाठी काळजीवाहक म्हणजेच शुभंकर हा बिन्नीचा शिलेदार असतो.पार्किन्सन्सचे शिक्कामोर्तब झाल्यापासुनच त्याच्या अवघड कामगिरीला सुरुवात होते.पार्किन्सन्समुळे फक्त शारीरिकच नव्हे तर भावनिक मानसिक सामाजिक सर्वच आघाड्यावर समस्याना सुरुवात होते.औषधोपचाराबाबत आपण न्युरॉलॉजिस्टचा आधार घेऊ शकतो पण इतर पातळ्यांवर मात्र शुभंकराचा भक्कम आधार लागतो.तसा मिळाला की या समस्या, समस्या रहात नाहीत.
                         हे समजलेल्या  वासंती ताई आणि इतर काही शुभंकरांबद्दल पुढच्या गप्पात.
अधिक माहितीसाठी हा ब्लॉगही पहा :
http://parkinson-diary.blogspot.in/
www.parkinsonsmitra.org ही वेबसाईटही पहा.
Parkinson's Mitramandal, Pune( https://www.youtube.com/playlist?list=PLfigPhBt8dAjA7e6-IeeVFfV2fgqSFyS7 ) हा युट्युब channel पहा

                                  

No comments:

Post a Comment