Friday 26 March 2021

पर्किन्सन्सविषयक गप्पा - ६७

                                                         पर्किन्सन्सविषयक गप्पा - ६७

                                   ११ एप्रिलचा जागतिक पार्किन्सन्स दिन मेळाव्याचा दिवस जवळ आला.यावेळी मेळावा ऑनलाईन असणार आहेत.मेळावा हॉलमध्ये प्रत्यक्ष होतो तेंव्हा डिसेंबर,जानेवारीपासून धावपळ सुरु होते.

स्मरणिकेचे काम कोणीतरी करत असते,मिटींग्ज  होतात.कामाचे वाटप होते.११ एप्रिलला दरवर्षी मदत करणारे नेहमीचे अनेक स्वयंसेवक आहेत.नावनोंदणी,पुस्तक विक्री,ईशस्तवनाची तयारी,यासाठी आमचे शुभार्थी भर मार्चच्या उन्हात  करमरकर यांच्या घराचे तीन माजले चढून जायचे.ऋषिकेशचे नृत्याची तयारी करणे सुरु असते.निमंत्रणे देणे,कोणते पेय द्यायचे,कोणी आणायचे, बैठक व्यवस्था,पाहुण्यांची विचारपूस,कलाकृतीच्या प्रदर्शनासाठी वस्तू घेणे,त्या मांडणे,सभासदाना फोन करणे,फोटो,व्हिडीओची जबाबदारी घेणे,बुके आणणे अशी कितीतरी कामे असतात. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात तर लगीन घाई असते. सर्वांच्यात एक वेगळाच उत्साह संचारलेला असतो.

२०२० साली अर्धीमुर्धी तयारी झाली होती आणि कोरोनानी एकदम Statue केले कार्यक्रम पुढे ढकलला.जून जुलै मध्ये घेऊ असे वाटले पण परिस्थिती बिघडतच गेली.तशी statue होणे पार्किन्सन्स असणार्यांना नवीन नाही थोडावेळ भांबावून जायला होते. पण त्यातून लगेच मार्गही काढला जातो.नुकताच शुभार्थी डॉ.प्रकाश जावडेकर यांनी आमच्या'भेटू आनंदे' कार्यक्रमातील गप्पात आपला अनुभव सांगितला.चालताना  रस्त्यातच पार्किन्सनन्सनी त्याना statue केले. त्यांनी ठेक्यात 'शांताबाई' गाणे म्हणायला सुरु केले.ते त्यातून बाहेर आले.आम्ही ही लगेच ऑनलाईन सभा सुरु करून त्यातून बाहेर आलो. 

यावर्षी नेहमीप्रमाणेच इशस्तवन,नृत्य, कलाकृतींचे प्रदर्शन,स्मरणिका प्रकाशन ,व्याख्यान सर्व काही होणार आहे.नेहमीइतकी धावपळ मात्र नाही.स्मरणिका शेवटच्या टप्प्यात आहे.कालाकृती जमा करण्याचे काम रमेश तिळवे करत आहेत.कार्यकारिणीचे लोक, फोन करणारे लोक,गिरीश,वैशाली  आणि आमचे होस्ट अतुल ठाकूर इतकीच मंडळी पुरेशी  आहेत. तांत्रिक काम असल्याने जास्त लोड अतुलवरच आहे.सर्व काही झाले तरी कोरोना संपून पुन्हा प्रत्यक्ष मेळाव होण्याची वाट पाहत आहोतच.

२००८ पासून च्या मेळाव्याच्या आठवणी ती धावपळ.तो ताण,सुर्हुदांच्या गाठीभेटी,शुभंकर,शुभार्थींचे खुललेले चेहरे आणि कार्यक्रम संपल्यावर तो यशस्वी झाल्याचे समाधान या सर्वांची ओढ आहेच.

तर भेटूच ११ एप्रिलला 

चार वाजता आपापल्या घरातून



No comments:

Post a Comment