Monday 14 January 2019

ब्लॉगने १००००चा टप्पा ओलांडला.

                                       ब्लॉगने १००००चा टप्पा ओलांडला.
  http://parkinson-diary.blogspot.in/
              या माझ्या ब्लॉगने Page Views चा १०००० चा टप्पा ओलांडला.यात
India
7196
United States
1459
France
353
Russia
213
Unknown Region
152
Germany
95
United Arab Emirates
73
Portugal
64
Poland
62
United Kingdom
14
अशी संख्या दिसते.मराठीत असलेल्या आणि एकाच विषयला वाहिलेल्या माझ्या लिखाणाला इतका प्रतिसाद दिल्याबद्दल मन:पूर्वक आभार.आम्ही पार्किन्सन्स निरक्षर असताना अनेक चुका केल्या त्या इतरांनी करू नये म्हणून हा पार्किन्सन्स विषयक साक्षरतेचा वसा घेतला.आपल्या प्रतिसादामुळे हे कार्य चालू ठेवण्याचा उत्साह वाढला.
मी फ्लॉवर रेमेडी शिकवल्यावर गुरुदक्षिणा म्हणून माझी सखी आरती खोपकरने बाखबाबा असा ब्लॉग तयार करून दिला.देवनागरीत टाईप करायलाही शिकवले.ब्लॉगवर वेगवेगळी पेज करून दिली.पण माझा गोंधळ उडत होता.म्हुणुन फ्लॉवर रेमेडी,पार्किन्सन्स आणि इतर लिखाणासाठी असे तीन स्वतंत्र ब्लॉग करून दिले.माझ्याकडून पार्किन्सन्सला झुकते माप दिले गेले.आरतीलाआभार मानलेले आवडणार नाहीत.पण मी ब्लॉगवर लिहिताना तिच्याबद्द्लच्या कृतज्ञतेची तार अखंड झंकारत असते.
मंडळी असाच लोभ असू द्या.

No comments:

Post a Comment