Saturday 1 April 2017

पार्किन्सन्सचे मराठीकरण

पार्किन्सन्सचे कंपवात असे मराठीकरण काही ज करतात.मला हे पटत नाही.एक तर या आजाराची लक्षणे प्रथम सांगणाऱ्या जेम्स पार्किन्सन्स या व्यक्तीवरून हे नाव दिले गेले.या आजारात कंप हे प्रमुख लक्षण असले तरी सर्वा रूग्णाना ते असतेच असे नाही.सुरुवातीला मलाही हे माहित नव्हते.
  मित्रमंडळात कंप नसलेले शुभार्थी पाहिल्यावर हे समजले कंपवात हा शब्द आयुर्वेदात वापरला जाणारा आहे. आयुर्वेदानुसार कंप असणारे पीडी रुग्णच कंपवातात मोडतात.पीडिचे कंप नसलेले  रुग्ण इतर वातविकारात मोडतात.पण त्याना कंपवात म्हणत नाहीत.या दोन्ही शास्त्राचा पाया आणि विचारपद्धती हे पूर्णपणे वेगळे असल्याने पीडी(पार्किन्सन्स डीसिज)हा शब्द वापरणे मला तरी योग्य वाटते.काही रूढ झालेले शब्द मराठीत जसेच्या तसे वापरायला काय हरकत आहे.
हे इतके विस्तारानी द्यायचे कारण एका वृत्तपत्रात आणि एका मासिकात पार्किन्सन्स मित्रमंडळावर लेख दिला असता संपादकीय संस्करण करुन पार्किन्सन्स शब्द बदलून कंपवात शब्द घालण्यात आला.
एका परगावच्या व्यक्तीचा फोन आला. सूर भांडण्याचाच होता.त्यांच्या मते मराठीतील कंपवात शब्द न वापरता पार्किन्सन्स मित्रमंडळ का म्हणता?त्याना समजावून  सांगण्याचा प्रयत्न केला पण ते आपला हेका सोडायला तयार नव्हते.

No comments:

Post a Comment