Tuesday 5 August 2014

गोष्ट छोटीशीच


 











 पार्किन्सन्स मित्रमंडळात वाढदिवसाला पत्रे लिहिण्याचे ठरले आणि पार्किन्सन्स असलेल्या  माझ्या नवर्‍याने ही जबाबदारी स्वत:कडे घेतली.एसेमेस, इमेलच्या जमान्यात हल्ली पत्रे लिहीण दुर्मिळ झालय.हाताने लिहिलेल्या मजकुरात जो पर्सनल टच असतो तो वेगळाच आनंद देऊन जातो.यापूर्वी श्री. शेखर बर्वे यांनी हे काम केले होते.वाढदिवसाला त्यांच्या सुंदर अक्षरातल्या पत्रांनी शुभंकर शुभार्थीना आनंद दिला होता.ह्यांच सुंदर अक्षर पार्किन्सन्स मुळे थोड बारीक झाल आहे.हे एक पार्किन्सन्सचच लक्षण आहे. याला Micrographia म्हणतात.पार्किन्सन्स मधील सुक्ष्म हालचालीच्या मर्यादा( Motor Disorder)मुळे हे होत.बरेच जण माझ सुंदर अक्षर कस बिघडलं याची खंत करत बसतात.लिहीणच सोडून देतात.परंतु इतर लक्षणाप्रमाणे या मर्यादेवरही  नियंत्रण आणता येत.आमच्याकडे व्याख्यानाला आलेल्या फिजिओथेरपिस्टनी चार ओळीमध्ये मोठ्ठी अक्षरे लिहिण्याचा सराव केल्यास हळूहळू अक्षर मोठ्ठ होऊ शकत.अस सांगितलं होत.हे नाही केल तरी किमान   इतर व्यायामाप्रमाणे लेखन करत राहण आवश्यक असत.बर्‍याच जणांनी ते न केल्याने ते लिहिण्याची क्षमता गमाउन बसतात.आमचे दिवंगत कार्यकारिणी सदस्य जे. डी. कुलकर्णी यांनी सकाळच्या मुक्तपीठमध्ये लेख लिहिले आणि पार्किन्सन्स मित्रमंडळ अनेकांपर्यंत पोचविले.ते नेहमी सांगायचे 'रोज एक पानभर लिहिलेत, जस येईल तस,तरी तुम्ही वाचता येण्याजोगे लिहू शकता.माझे छापून आलेले लेख माझ्या स्वत:च्या हस्ताक्षरातले आहेत.'
                              ह्यांच अक्षर बारीक झाल असल तरी अजूनही सुवाच्य आहे.लिहायला थोडा वेळ लागतो पण ही मर्यादा स्वीकारावी लागते.हे असच टिकवायच तर लिहित राहील पाहिजे हे पटत असल तरी जमत नव्हत.पत्रे लिहिण्याच्या निमित्ताने ते आपोआपच होणार होत.
पत्रे वाढदिवसाची होती त्यामुळे थोडी रंगीबेरंगी करून भेटकार्डाच स्वरूप द्यायच ठरलं. मुलाना सुट्या होत्या.गायत्री शिंदे, मानसी शेट,गायत्री शेट यांची चित्रकला उत्तम आहे.त्याना विचारताच त्यांनी झटकन होकार दिला आणि छान भेट कार्ड बनवून दिली. (वर त्याचे फोटो दिले आहेत.)त्याच मानधन त्यांनी घटल नाही.सामजिक कामात हातभार लावल्याचा आनंद त्यांच्या चेहर्‍यावर जाणवत होता.
                              सुटी असेपर्यंत भरपूर कार्डस् करून घेऊ अस वाटलं पण पोष्टातून पोष्टकार्डस् गायबच झाली होती.आता कार्डस मिळायला लागली.पण शाळा कॉलेज सुरु झाली.अभ्यासाच्या घाण्याला जुंपलेल्या मुलीना विचारण आम्हालाच अवघड वाटलं.रंगीबेरंगी कार्ड करण सवयीच झाला होत.घरात नातू आला होता त्याच्या रंगीत पेन्सिली सापडल्या.मग मीच रेघोट्या काढल्या. ह्यांनाही स्फूर्ती आली त्यांनी तर छानच चित्र काढली.पेन्सिलीने थोड फिक वाटत म्हणून स्केचपेन आणली.
                            पत्रे लिहितानाही प्रत्येक व्यक्तीच्या ज्या आठवणी आहेत त्यानुसार हे वेगळी पत्रे लिहितात.त्यामुळे जास्त वैयक्तिक वाटतात.श्रद्धा भावेला भीती व्हीलचेअरची.तिच्या पत्रात व्हीलचेअर तिच्या आयुष्यात कधीही न येवो अशी इछ्या व्यक्त केल्याने तिला छान वाटलं.पत्र पोचल्यावर कुणी फोन करून कुणी प्रत्यक्ष भेटीत आनंद झाल्याच सांगितलं.त्यामुळे ह्यांचा पत्रे लिहिण्याचा उत्साह वाढला.
                            पत्रे लिहिल्यामुळे ह्यांचा लिहिण्याबाबताचा  आत्मविश्वास वाढला.मित्रमंडळाने संवादपत्रिका सुरु केली.३८० शुभार्थीना पोष्टाने पाठवायची होती.आम्ही काही लोकांनी हे काम वाटून घेतले.आमच्या वाटचे सर्व ६० पत्ते ह्यांनीच लिहिले.पार्किन्सन्स झालेल्या शुभार्थीसाठी ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे 
तस पाहिलं तर पत्रे लिहिणे गोष्ट छोटीशीच.पण त्यातून साध्य झाल्या अनेक गोष्टी.
                        

1 comment: