पर्किन्सन्स मित्रमंडळाची स्त्रीशक्ती
पार्किन्सन्स मित्रमंडळाचा सर्व कारभार सध्या स्त्रीयांच्याकडे आहे.११ एप्रिल जागतिक पार्किन्सन्स दिनाच्या मेळाव्यातील एका फोटोत आम्ही सर्व एका रांगेत होतो.शुभार्थी अविनाश धर्माधिकारी यांनी खाली लिहिले पार्किन्सन्स मित्रमंडळाची स्त्री शक्ती.त्यावेळी आपल्यातल्या सुप्त शक्तीची प्रथम जाणीव झाली.कितीही समस्या येवोत मंडळाचे कार्य पुढे न्यायचे हे नकळत आमच्या सर्वांच्या मनात पक्के झाले.मंडळाचा पाया मधुसुद शेंडे,शरच्चंद्र पटवर्धन यांनी रोवला. रामचंद्र करमरकर,जे.डी.कुलकर्णी, अनिल कुलकर्णी,शेखर बर्वे, चंद्रकांत दिवाणे, राजीव ढमढेरे, व्ही.बी.जोशी अशी पुरुष मंडळी कार्यकारिणीत होती.करमरकर ,बर्वे,जोशी वगळता एकेक पान गळाले., बर्वे, जोशी वय, प्रकृती या कारणाने प्रत्यक्ष कार्यकारिणीतून बाजूला झाले.करमरकर तब्येतीमुळे कार्यरत नसले तरी मी बरा होणार आणि रोज काही वेळ ऑफिसमध्ये बसणार असे स्वप्न बाळगून आहेत.ते बरोबर आहेत.ही भावनाच आम्हाला बळ देते. औरंगाबादहून रमेश तिळवे यांचाही आधार आहे.
आता नवीन जागेत मंडळाचे ऑफिस हलले.अंजली म्हणाली आपण स्त्र्शक्तिनी मिळून नवरात्रात ऑफिसचे उद्घाटन करू.आम्ही सर्व सामान्य स्त्रिया आहोत.पार्किन्सन्सने आम्हाला एकत्र आणले.अंगावर पडलेली,शुभार्थीची जबाबदारी असो किंवा मंडळाची आम्ही आपली शक्ती पणाला लावायचा प्रयत्न करत आहोत.झपाटल्यासारखे काम करत आहोत.आमच्या धुरिणांनी पाहिलेली स्वप्ने पूर्ण करण्याचा वसा घेतला आहे.'की घेतले व्रत न हे आम्ही अंधतेने' म्हणत प्रकाशाकडे वाटचाल करत आहोत.दसऱ्याला सीमोल्लंघन करून मंडळाला नव्या पर्वत नेऊ.आपल्या सर्वांची साथ, शुभेच्छा बरोबर आहेतच.
नवरात्रात आमच्यातील दशभुजांच्या मंडळातील कामाशी संबंधित कार्याची ओळख करून देत आहे.हे करताना आत्मप्रौढी अजिबात नाही तर आमच्यापर्यंत पोचलेले स्फुल्लिंग मंडळातील सर्व स्त्रीशक्तीपर्यंत पोचवण्याचे काडीचे माध्यम आहोत ही भावना आहे.स्त्रियांनी आपल्यातील शक्ती जागवून मंडळाच्या कार्यात सामील होऊन ही शक्ती सहस्त्रभुजा करावी ही मनीषा आहे.
No comments:
Post a Comment