१. आमच्या आधारस्तंभ श्यामलाताई शेंडे
श्यामलाताई मंडळाच्या ट्रस्टच्या अध्यक्ष आहेत.जेंव्हा ट्रस्ट झाला
तेंव्हा अध्यक्ष म्हणून सर्वानुमते पहिले नाव पुढे आले ते
श्यामलाताईंचे.त्या नेहमी म्हणतात मी नामधारी आहे.पण आम्हाला कोणालाच हे
मान्य नाही.मंडळाची स्थापना २००० साली झाली तेंव्हापासून त्या मंडळात
घडलेल्या प्रत्येक घटनेच्या साक्षीदार आहेत.२००७ मध्ये आम्ही सामील
झाल्यापासून शेंडे साहेबांच्या स्वप्नांचे त्या हात बनल्या आहेत हे
जाणवले.प्रथमदर्शनीच कोणावरही प्रभाव पाडणारे असे त्यांचे व्यक्तिमत्व
आहे.शेंडे साहेबांसारख्या थोड्या हट्टी,महत्वाकांक्षी, काळाच्या पुढची
स्वप्ने पाहणाऱ्या आणि ती सत्यात उतरवण्यासाठी वाढलेल्या पार्किन्सन्सची
पर्वा न करणाऱ्या साथीदाराची सहचारिणी होणे सोपी गोष्ट नव्हती.पण त्यांनी
ते काम चोखपणे पार पडले आणि आताही तितक्याच निष्ठेने काम करत आहेत.स्वप्ने
पाहताना त्यांना वास्तवाचेही भान असते.परखडपणे त्या आपले मत मांडतात.ते
पटणारेही असते.
त्या काही काळ अमेरिकेत तर काही दिवस भारतात असतात.पण घार हिंडते आकाशी चित्त तिचे पिलापाशी असे त्यांचे असते.ऑनलाइन सभा सुरु झाल्यापासून त्या भारतात असो की अमेरिकेत असो हजर राहतात. आमच्या कार्यकारिणीच्या सभाही ऑनलाइन होतात.त्यांचा सभेत सहभाग असल्यावर निश्चिंतता असते.आमची कामाची घाई चाललेली असली की आपण भारतात नाही याची त्यांना हळहळ वाटत असते. पण तेथे राहूनही त्यांनी कामाची जबाबदारी उचललेली असते.यावर्षीच्या स्मरणिकेतील चारुलता सांखला यांच्या व्याख्यानावरील लेख सर्वाना उपयुक्त ठरला आहे श्यामला ताईंनी व्याख्यानाच व्हिडीओ ऐकून अमेरिकेत बसून हे किचकट काम केले.जागतिक पार्किन्सन्स दिन मेळाव्यातील भाषणाच्या आत्तापर्यंतच्या व्हिडिओचे शब्दांकन त्या करत आहेत..स्मरणिकेच्या प्रूफ रिडींगच्या कामाठी त्यांनी तेथे राहून मदत केली.
मेळाव्यासाठी हॉल घेतला त्याचे भाडे शेंडे साहेब असल्यापासून ते द्यायचे.ते आजतागायत सुरु आहे.या पतीपत्नीचा लोकसंग्रह मोठ्ठा आहे.श्यामलाताईंची अमेरिकास्थित मैत्रीण सुधा कुलकर्णी या गेली अनेक वर्षे भारतात आल्या की मित्रमंडळाच्या सभेला येतात.आणि दरवर्षी स्वत:च्या वाढदिवसाला २५००० रुपये देणगी देतात.शेंडे पतीपत्नीची कामाची तळमळ आणि त्याच्याबद्दल असलेल्या विश्वासामुळेच ही लक्ष्मी मंडळाकडे येते.त्यांच्या विश्वासावर देणगी देणारे अनेक आहेत.कै.डॉ.विजय देव,डॉ.वीणा देव, डॉ. अमित करकरे ही मंडळी त्यांच्या शब्दाखातर मदतीला हजर राहणारी.वीणाती आजारी होत्या तरी श्यामलाताईच्या शब्दाखातर अभिवाचनासाठी आल्या.
अमेरिकन सपोर्ट ग्रुपकडून पीडीच्या क्षेत्रातील नेत्रदीपक कामगीरी बद्दल शेंडे पतीपत्नीना प्रशस्तीपत्र मिळाले.त्यांच्या असण्यामुळे मंडळाच्या कार्याची नौका वादळ वार्यातही सुखरूप राहिली.आणि राहील.असाआम्हाला विश्वास आहे.
श्यामलाताई मंडळाच्या ट्रस्टच्या अध्यक्ष आहेत.जेंव्हा ट्रस्ट झाला
तेंव्हा अध्यक्ष म्हणून सर्वानुमते पहिले नाव पुढे आले ते
श्यामलाताईंचे.त्या नेहमी म्हणतात मी नामधारी आहे.पण आम्हाला कोणालाच हे
मान्य नाही.मंडळाची स्थापना २००० साली झाली तेंव्हापासून त्या मंडळात
घडलेल्या प्रत्येक घटनेच्या साक्षीदार आहेत.२००७ मध्ये आम्ही सामील
झाल्यापासून शेंडे साहेबांच्या स्वप्नांचे त्या हात बनल्या आहेत हे
जाणवले.प्रथमदर्शनीच कोणावरही प्रभाव पाडणारे असे त्यांचे व्यक्तिमत्व
आहे.शेंडे साहेबांसारख्या थोड्या हट्टी,महत्वाकांक्षी, काळाच्या पुढची
स्वप्ने पाहणाऱ्या आणि ती सत्यात उतरवण्यासाठी वाढलेल्या पार्किन्सन्सची
पर्वा न करणाऱ्या साथीदाराची सहचारिणी होणे सोपी गोष्ट नव्हती.पण त्यांनी
ते काम चोखपणे पार पडले आणि आताही तितक्याच निष्ठेने काम करत आहेत.स्वप्ने
पाहताना त्यांना वास्तवाचेही भान असते.परखडपणे त्या आपले मत मांडतात.ते
पटणारेही असते.
त्या काही काळ अमेरिकेत तर काही दिवस भारतात असतात.पण घार हिंडते आकाशी चित्त तिचे पिलापाशी असे त्यांचे असते.ऑनलाइन सभा सुरु झाल्यापासून त्या भारतात असो की अमेरिकेत असो हजर राहतात. आमच्या कार्यकारिणीच्या सभाही ऑनलाइन होतात.त्यांचा सभेत सहभाग असल्यावर निश्चिंतता असते.आमची कामाची घाई चाललेली असली की आपण भारतात नाही याची त्यांना हळहळ वाटत असते. पण तेथे राहूनही त्यांनी कामाची जबाबदारी उचललेली असते.यावर्षीच्या स्मरणिकेतील चारुलता सांखला यांच्या व्याख्यानावरील लेख सर्वाना उपयुक्त ठरला आहे श्यामला ताईंनी व्याख्यानाच व्हिडीओ ऐकून अमेरिकेत बसून हे किचकट काम केले.जागतिक पार्किन्सन्स दिन मेळाव्यातील भाषणाच्या आत्तापर्यंतच्या व्हिडिओचे शब्दांकन त्या करत आहेत..स्मरणिकेच्या प्रूफ रिडींगच्या कामाठी त्यांनी तेथे राहून मदत केली.
मेळाव्यासाठी हॉल घेतला त्याचे भाडे शेंडे साहेब असल्यापासून ते द्यायचे.ते आजतागायत सुरु आहे.या पतीपत्नीचा लोकसंग्रह मोठ्ठा आहे.श्यामलाताईंची अमेरिकास्थित मैत्रीण सुधा कुलकर्णी या गेली अनेक वर्षे भारतात आल्या की मित्रमंडळाच्या सभेला येतात.आणि दरवर्षी स्वत:च्या वाढदिवसाला २५००० रुपये देणगी देतात.शेंडे पतीपत्नीची कामाची तळमळ आणि त्याच्याबद्दल असलेल्या विश्वासामुळेच ही लक्ष्मी मंडळाकडे येते.त्यांच्या विश्वासावर देणगी देणारे अनेक आहेत.कै.डॉ.विजय देव,डॉ.वीणा देव, डॉ. अमित करकरे ही मंडळी त्यांच्या शब्दाखातर मदतीला हजर राहणारी.वीणाती आजारी होत्या तरी श्यामलाताईच्या शब्दाखातर अभिवाचनासाठी आल्या.
अमेरिकन सपोर्ट ग्रुपकडून पीडीच्या क्षेत्रातील नेत्रदीपक कामगीरी बद्दल शेंडे पतीपात्नीना प्रशस्तीपत्र मिळाले.त्यांच्या असण्यामुळे मंडळाच्या कार्याची नौका वादळ वार्यातही सुखरूप राहिली.आणि राहील.असाआम्हाला विश्वास आहे.
No comments:
Post a Comment