वसुधा बर्वे
श्रीपाद कुलकर्णी यांचा मेसेज आला काळ मी शेखर बर्वे यांच्या घरी जाऊन भेटलो.अर्धा तास गप्प झाल्या.सौ.बर्वे मात्र बेडवरच आहेत.हे ऐकल्यावर भेटून यायला हवे असे वाटले मी आणि अशा कितीतरी दिवस त्यांच्याकडे जाऊ असे म्हण त होतो काहीना काही कारणाने जाणे होत नव्हते.काही दिवसातच वसुधा ताईंचे दु;खद निधन झाले.आपले जाणे राहिले याची खूप हळहळ वाटली.१५/१६वर्षाचे ऋणानुबंध होते.
शेखर बर्वे आणि शुभार्थी वसुधा बर्वे ही २००८ ला झालेल्या पार्किन्सन्स मेळाव्यात जे अनेक कार्यकर्ते मंडळात सामील झाले त्यातील महत्वाची जोडी.
शेखर बर्वे यांचे "पार्किन्सनन्सशी मैत्रीपूर्ण
लढत" हे पुस्तक आपल्या सर्वांपाशी आहे.हे पुस्तक त्यांच्या घरात पार्किन्सन्स आला नसता तर झालेच नसते. वसुधा ताईना २००७ मध्ये पार्कीन्सन्स डिसिज झाला आणि ही लढत चालू झाली.पार्किन्सन्स बद्दलच अज्ञान, अपुरे ज्ञान आणि चुकीच ज्ञान यामुळे पीडी झाल्यावर रुग्ण आणि कुटुंबीय घाबरतात,खचतात,निराश होतात.शेखर बर्वेनी मात्र आजाराविषयी सुयोग्य ज्ञान मिळवण्याची खटपट केली.स्वतःच्या
पत्नीच्या आजाराच निरिक्षण,अनुभव,पार्किन्सन्स मित्रमंडळाच्या
कामातील सहभागातून विकसित झालेल ज्ञान, इतर शुभंकर,शुभार्थींचे केलेले निरिक्षण आणि अनुभव यातून पिडिला स्विकारले,लढत मैत्रीपूर्ण
केली.यातून त्याना
पिडिसह जगण्याचा मूलमंत्र सापडला.हे अनुभवाधिष्ठीत ज्ञान मूलमंत्रासह यच्च्ययावत
मराठी भाषिक पिडी ग्रस्तांपर्यंत
पोचवावे या तळमळीतून, सहानुभावातून या
पुस्तकाची निर्मिती झाली.वसुधा ताईना पतीच्या या कामाचा रास्त अभिमान होता. यासाठी त्यांनी किती कष्ट घेतलेत हे त्या सांगायच्या.
वसुधा ताई स्वत:ही उत्साही होत्या. आम्ही वसुधाताईना भेटलो तेंव्हा त्या वधूवर सूचक मंडळ चालवत. चौदा मंडळाच्या संघाचे काम पाहात.त्यांचे मेळावे असले तर वसुधाताई यांचा पुढाकार असे.त्या सूत्र संचालन ही करत.
गाणे म्हणणे आणि ऐकणे हा त्यांचा छंद होता.त्या गाणे शिकत होत्या. त्या.. गाणे छान म्हणत.श्री.विठ्ठल काटे यांच्या हास्यक्लबमध्ये एका संघाच्या त्या शिक्षिकाही होत्या.
गाणे म्हणणे आणि ऐकणे हा त्यांचा आवडता छंद होता.मंडळाच्या पार्किन्सन्स दिन मेळाव्यात त्या हौसेने इशस्तवन म्हणण्यात सहभागी होत.यासाठी अनुपमा करंदीकर गाणे बसवत त्यांच्या घरी तीन जिने चढून जावे लागे भर उन्हात बर्वे त्यांना करमरकर यांच्या घरापर्यंत सोडत.परत येताना त्य एकट्या येत.
वसुधाताईनी पार्किन्सन्स झाल्यावर मन रमविण्यासाठी संगीत क्लास सुरु केला.संगीताच्या दोन परीक्षाही दिल्या.त्यात प्रथम श्रेणी मिळवली...
सुरुवातीच्या सर्व सह्लीलना त्या हजर राहिल्या.सहल .पूर्ण दिवसाची झाली आणि त्यांचा कौटुंबिक जबाबदार्यामुळे सहभाग कमी झाला.मासिक सभेला . हजर राहून शेअरिंगमध्ये सहभागी होत
.कुटुंबातील सर्वांचे सहकार्यमिळते पण आनंदी राहण्यासात्हो पीडीला स्वीकारण्यासाठी स्वत:च्या मनाची तयारी आणि प्रयत्न सर्वात महत्वाचे इतरांचा प्रतिसाद त्यानुसार मिळतोच असे त्यांचे म्हणणे असे. शेखर बर्वे यांच्यासारखा शुभंकर असल्याने पार्किन्सन्सने कितीही हल्ले केले तरी मैत्रीपूर्ण लढत होते.पुस्तकाला हे नाव वसुधाताईंनी सुचविले हे येथे नमूद करायला हवे.
' पार्किन्सन्सचे आत्मविश्लेषण' या विषयावर शेखर बर्वे यांचे एकदा व्याख्यान झाले.आपल्या व्याख्यानातील' मन रमविण्यासाठी विविध कलांचा उपयोग' हा धागा पकडत शेखर बर्वे यांनी सौ वसुधाताईना गीत म्हणण्याची विनंती केली.त्यांनी 'केशवा माधवा' हे भक्तीगीत सुरेल आवाजात म्हटले.त्या गात आहेत,शेखर बर्वे यांनी हातात माईक धरला आहे, पत्नीकडे कौतुकाने पाहत आहेत हे दृश्य शुभंकर शुभार्थी यांच्यातल्या सुसंवादाचे प्रात्यक्षिकच होते.ते दृश्य माझ्या मनावर कोरलेले आहे.
करोना काळात प्रत्यक्ष सभा कमी झाल्या.. झूम मिटिंग त्यांना फारशा भावल्या नाहीत.२०२२ साली जागतिक पार्किन्सन्स दिन मेळावा ऑनलाईन झाला त्याना तो प्रत्यक्ष घ्यावा असे वाटत होते.बहुसंख्य सभासद जेष्ठ नागरिक असल्याने रिस्क घेण्याचे धाडस आमच्यात नव्हते. प्रत्यक्ष सभा चालू झाल्या.प्रत्येक वेळी मी त्याना फोन करत असे. त्यांचा पार्किन्सन वाढल्याने त्या येऊ शकत नव्हत्या
त्यांचा ..Landline फोन बंद केला. मोबाइल त्या उचलत नसत. संपर्क होईनासा झाला
त्या गेल्या हे समजल्यावर आम्हीत्यांच्या घरी गेलो.लिफ्ट मधून चढताना त्यांच्या घरी अनेक वेळा गेलेल्या आठवणी जाग्या झाल्या.आता त्या हसतमुखाने स्वागत करायला असणार नाहीत या विचाराने डोळ्यात पाणी आले.
घरात बर्वे,त्यांचा नातू आणि नातसून होती. सर्वच कुटुंबीयांनी शेवटच्या काळात त्यांची काळजी घेतली सेवा केली.त्यांचा मृत्यू विवेकाने स्वीकारला होता.बर्वेनी शेवटच्या क्षणापर्यंत त्यांचा पार्किन्सन्स तटस्थपणे निरीक्षिला होता.घरी परततताना सह्च्राचे नसणे कसे स्वीकारायचे याचा वस्तुपाठ मिळाला होता.
वसुधाताई तुमच्या आठवणी सदैव बरोबर असतील आणि तुम्हाला न भेटल्याची खंतही.
No comments:
Post a Comment