क्रिकेट सामना एक अनुभव
आपल्या देशातील एक सर्वात लोकप्रिय खेळ. त्यातही एक दिवशी सामना जास्त प्रिय. वीस मर्यादित षटकांचा सामना म्हणजे कळस आतापर्यंत अनेक सामने दूरदर्शनवर पाहिले आहेत किंवा रेडिओवर ऐकले आहेत परंतु स्टेडियमवर जाऊन अद्याप एकही सामना बघितला नव्हता त्यामुळे 12 - 10 -13 रोजी पुण्यात होणारा ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारत हा एकदिवसीय सामना प्रत्यक्ष बघण्याची जबर इच्छा होती
परंतु माझी तब्येत रोज बघणाऱ्या घरातील लोकांना मी हे धाडस करू नये असे वाटत होते घरापासून स्टेडियमचे अंतर खूपच होते त्यातही पार्किंगची जागा मुख्य ग्राउंड पासून एक ते दीड किलोमीटर अंतरावर होती त्यामुळे एवढे अंतर चालणे तेही खूप गर्दीत शक्य होईल का नाही व त्याचबरोबर एवढा वेळ एका जागी

बसणे जमेल का नाही याची शंका सगळ्यांना होती माझ्यावर सुद्धा एक प्रकारचे
दडपण आले होते माझ्यामुळे जावयाचा सामना बघण्यातील आनंद कमी होऊ नये हा
विचार करून मी सामन्याला न जाण्याचा निर्णय घेतला परंतु जावयाने, 'जर
तुम्हाला सामना पाहण्याची जबरदस्त इच्छा असेल तर तुम्ही चला व मधून उठून
जरी यावे लागले तरी मी तुमच्याबरोबर परत येईल' असे सांगितल्याने आमचे जाणे
नक्की झाले.
आता बारा तारखेचे वेध लागले.
दीड वाजता सुरू होणाऱ्या सामन्यासाठी आम्ही घरातून साडेअकरा वाजता निघालो.
स्टेडियमच्या जवळ यायला लागल्यानंतर वाहनांची प्रचंड गर्दी दिसायला लागली गाडी पार्किंग मध्ये लावून आम्ही वीस मिनिटे शेतातील रस्त्यावरून चालत स्टेडियमच्या गेट जवळ पोहोचलो स्टेडियमच्या प्रवेशद्वाराजवळ आत मध्ये प्रवेशासाठी प्रेक्षकांची खूप गर्दी होती त्या गर्दीतून एकदाचे आम्ही पोचलो. आमच्या सीटवर पोहोचण्यासाठी आम्हाला अंदाजे सहा मजल्याच्या उंचीएवढे अंतर जाणे आवश्यक होते तेवढे चढून आम्ही आमच्या जागेवर बसलो आमच्या जागेवरून तळाशी बघताना सुरवातीला आमची छाती दडपली तेथे उभे राहण्यासाठी माझी हिम्मत होत नव्हती त्यामुळे आधारासाठी मी जवळ असलेला खांब धरून बसलो लोकांच्या झुंडीच्या झुंडी अजून येतच होत्या खाली मैदानात खेळाडू सराव करत होते बरोबर दीड वाजता सामन्याला सुरुवात झाली लोकांचा प्रचंड उत्साह दिसत होता प्रत्येक चौकार षटकार तसेच चांगली फिल्डिंग यांना दाद मिळत होती माझापण उंचीमुळे होणारा त्रास कमी झाला होता ऑस्ट्रेलियाचा डाव 245 आटोपला त्यामुळे आपण जिंकण्याची शक्यता दिसत होती मध्यंतरात स्टेडियमची रचना बघता आली रचना अशी होती की कोठूनही स्कोर बोर्ड, रिप्ले स्क्रीन दिसत होता संध्याकाळी तेथील दिव्यांच्या प्रकाशात सर्व दृश्य फारच छान दिसत होते भारतीय फलंदाजांचे प्रचंड उत्साहात स्वागत झाले परंतु जशी भारतीय फलंदाजी ढेपाळत गेली तसतसा प्रेक्षकांचा उत्साह कमी कमी होत गेला.ढोणी आऊट झाल्यावर मात्र प्रेक्षकांच्या जिंकण्याच्या आशा मावळल्या आणि तेव्हाच निम्मे अधिक स्टेडियम रिकामे झाले आम्ही पण तेव्हाच उठलो व बाहेर पडलो अशा रीतीने स्टेडियममध्ये जाऊन प्रत्यक्ष सामना बघण्याची माझी इच्छा कोणताही त्रास न होता पूर्ण झाली
सुरेश सिधये.
( हा अनुभव यापूर्वी आमच्या स्मरणिकेत छापून आला आहे. बोलून टाईप करण्याचा प्रयोग करण्यासाठी हा लेख निवडला..दोन चारच सुधारणा कराव्या लागल्या.सिधये आज आपल्यात नाहीत.तरी त्यांच्यातला उत्साह आणि जिद्द इतर शुभार्थीना प्रेरणा देईल.)

No comments:
Post a Comment