पार्किन्सन्स मित्रमंडळ तुमच्या दारी
आपणा सर्वांपर्यंत पोचण्यासाठी संकेतस्थळाद्वारे(वेबसाईट)येत आहोत'
.पार्किन्सन्ससह
आनंदाने जगूया' आणि यासाठी 'मदत घ्या मदत करा' हे पार्किन्सन्स
मित्रमंडळाचे. ब्रीदवाक्य आहे.हे करण्यासाठी पीडीबद्दलची भीती घालवणे आणि
पार्किन्सन्सला स्वीकारणे गरजेचे आहे. त्यासाठी,लिखित
साहित्य,प्रसारमाध्यमे,तज्ज्ञांची व्याख्याने यातून पार्किन्सन्स साक्षरता
वाढवण्याचा आम्ही प्रयत्न केला.अनुभवाच्या देवाणघेवाणीसाठी व्यासपीठ
पुरविणे;.शुभार्थीच्या जीवनशैलीचा स्तर उंचावण्यासाठी
शारीरिक,मानसिक.सामाजिक कार्यप्रवणता वाढविण्यास प्रयत्न करणे;सकारात्मक
दृष्टिकोन निर्माण करण्यास, आत्मविश्वास वाढविण्यास मदत करणे.हेही महत्वाचे
आहे.यासाठी सातत्याने आपल्यापर्यंत पोचणे गरजेचे आहे.आता pmmp.anubandh.org या एका क्लिकवर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू
यासाठी तुमची मदत हवी.
संकेतस्थळावरील बातमीपत्र नियमित तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी तुमचा इमेल हवा.
हे
व्यासपीठ तुमच्यासाठी आहे.येथे व्यक्त व्हां,मोकळे व्हां,अनुभव सांगा,
अनुभव ऐका,प्रश्न विचारा,आपली कला,पीडीवरील अनुभव सांगणारे,माहिती सांगणारे
लेख द्या.सतत संपर्कात राहा.आपण एकटे नाही आहात हे लक्षात ठेवा.मराठी,
हिंदी,इंग्रजी कोणत्याही भाषेत चालेल.
सध्या फक्त मराठीत माहिती आहे लवकरच हिंदी,इंग्रजीतही चालू होईल.
काही अडचण असल्यास आणि संपर्कासाठी
tirthalishobhana@gmail.com या मेलवर किंवा ९६७३११४८४३ या मोबाईलवर संपर्क साधा
No comments:
Post a Comment