११ एप्रिल २०१४
"मित्रा पर्किन्सना,
मित्रा म्हटल म्हणुन दचकलास? साहजिकच आहे म्हणा तुझ दचकण ! तू चोर पावलानी आमच्या घरात प्रवेश केलास. कपाळावर बारीकशी अठी उमटली. तू आमच्या आवडत्या पु.लं.च्या घरी पाहुणचार घेणारा. त्यांच्या पंगतीत आम्हाला बसवलस म्हणुन थोडं मनाचं समाधान करुन घेण्याचा प्रयत्न केला. पण तु तर अरबाच्या उंटासारखा आतआतच येत गेलास.
किती राग राग केला तुझा. अतिथी देवो भव ऐवजी नको असलेला पाहुणा वाटायला लागलास. मग पदर खोचुन तुला हाकलण्याचे आमचे प्रयत्न सुरु झाले. तुला हाकलण्याचा हमखास उपाय अस सांगणारे आणि अॅलोपाथीच्या नादाला अजिबात जाउ नका अस सांगणारेही अनेक भेटले.
काय केल नाही? प्रथम योगासनाचा आधार घेतला.आयुर्वेदिक पंचकर्म, अॅक्युपंक्चरच्या सुया टोचुन घेण, हाताला धान्य चिकटवण, रेकी, प्राणिक हिलींग, सुज्योक्, निसर्गोपचार अगदी भोंदु वैदुही !
प्रत्येक उपचारानंतर तु थोडा घाबरतोस अस वाटायच.आणि अचानक भॉक करुन खदखदा हसत समोर यायचास.कशी फजिति केली म्हणुन घाबरवायचास. माझ्या नवर्याची तर बोलतीच बंद करायचा प्रयत्न केलास.
तुला हकलायला आता अॅलोपॅथीचा तगडा उपायच हवा होता. यातच ज्याच्या घरी पाहुणा होतास. अशा श्री. मधुसुदन शेंडे आणि श्री. शरदच्चंद्र पटवर्धन यानी सुरु केलेल्या पार्किन्सन मित्रमंडळाची ओळख झाली. इथ तुला हाकलण्याचा प्रयत्न नव्हता; तर तु आता कायमचा पाहुणा आहेस हा स्विकार होता. तुझ्यासह आनंदी राहता येत हा विचार होता. आम्हीही त्यांच्यात सामिल झालो. पुण्यात विविध ठिकाणी गट करुन सभा घेण सुरु झाल. तुझ्याबद्दलच अज्ञान दूर करण्यासाठी न्युरॉलॉजिस्टची व्याख्यान, मानसोपचार तज्ज्ञ, ड्रम थेरपी, नृत्य उपचार, सहली, एकमेकांची दु:ख शेअर करण.
तु जिथजिथ गेलास तिथ तुझ्यामागुन जाउन त्या लोकांच्या मनातले तुझ्याबद्दलचे गैरसमज दूर करण अशा अनेक गोष्टी सुरु झाल्या. तुला हाकलण्यासाठी योगासने प्राणायाम ओंकार आयुर्वेद इत्यादी गोष्टींचा वापर करण्याचा प्रयत्न केला होता आता त्याच गोष्टी तुझ्यासह आनंदी राहण्यासाठी वापरण सुरु झाल.
या लोकांच्या सहवासात आणि त्यांच्याबरोबर काम करताना तुला आम्ही कधी स्विकारल समजलच नाही. तुझ्याबरोबरचा शत्रु ते मित्र प्रवास तुलाच सांगतीय.
११ एप्रिल हा तुझा दिवस म्हणुन जगभर साजरा केला जातो, त्यानिमित्त तुला समजण्यात आमच्यासारखी इतरांनी चूक करु नये म्हणुन हा पत्रप्रपंच.
मित्रा तुला धन्यवाद पण द्यायचे आहेत. तुझ्यामुळे आम्हाला एक छान परिवार मिळाला. या वयात आम्ही नृत्य शिकलो. आमच्या दोघांच्या आवडीनीवडी कार्यक्षेत्र म्हणजे खरतर एकत्र न येणार्या समांतर रेषाच. पण तुझ्यामुळे आम्हाला एक लक्ष्य मिळाले. प्रतिकुलतेला अनुकुलतेत बदलता येत हे सिद्ध करता आल. आमची सेकंड इनिंग तुझ्यामुळे अर्थपूर्ण झाली. मित्रा, पुन्हा एकदा धन्यवाद ! "
सात ऑगस्ट २०१६
मित्रा पर्किन्सना,
तुला आणि तुझ्यामुळे जमा झालेल्या परिवारातील सर्व मित्रमैत्रीणीना मैत्री दिनाच्या शुभेच्छा! तू मित्र आहेस, पण कधी कधी राग येतो तुझा. हतबलही व्हायला होत.कठीण आहेस तू.थांगच लागत नाहीरे तुझा.पण लगेच लक्षात येत.तुझा राग करण,तुझ्याशी शत्रुत्व करण योग्य नाही.तुला आहे तसाच स्विकारण,समजून घेण आणि मैत्री निभावण हेच शहाणपणाच.मग मी सारखा तुझाच विचार करते,तुझ्याबद्दलच बोलते,तुझ्याबद्दलच लिहिते.तुझ्याबद्दल गैरसमज करून घेणार्याना तावातावाने तुझ खर स्वरूप सांगते.तुला माणसाळवण्याच मला उमगलेलं तंत्र सांगते.इतर अनेकांना हे तंत्र जमलय. त्यांच्या कडूनही तुला समजून घेते.या सगळ्या व्यापात जगभरच्या मित्र मैत्रिणी मिळाल्या मला.
शनीच फेरा,शनीची साडेसाती याबद्दल अनेकांच्या मनात अकारण भीती असते. पण
जाणते सांगतात,शनी वाईट नाही तो तुमचा अहंकार उतरवतो.ज्याला अहंकार नाही
त्याला तो त्रास देत नाही.तुझही असच आहे तुला समजून घेणार्यांचा तू मित्र
बनतोस. मित्रा मैत्रीदिनाच्या पुन्हा शुभेच्छा!
२३ ऑक्टोबर २०१६
मित्रा पर्किन्सना,
सॉरी,व्हेरी व्हेरी सॉरी. ऐक ना,मीच नाही तर आशा,हेमा ताई यांचाही तुझ्याबद्दल असाच गैरसमज झाला होता.तू आहेसच अनप्रेडीक्टेबल,गुंतागुंतीचा म्हणून होत अस.झाल काय,आम्ही बाहेरून आलो.आल्यावर हे झोपले.सर्व काही ठीक होत.जागे झाल्यावर तर अजिबात उठताच येईना,हालचाल करता येईना.बघता बघता काय अवस्था केलीस यांची.एकदम डोक्यातच गेलास.सारखा तुझ्या कलाकलाने घेऊनही,तू मात्र पाठीत खंजीर खुपसलास.डॉक्टरना बोलावलं.थोडा ताप होता.क्रोसिन दिली.डॉक्टर म्हणाले,'आता व्हीलचेअर आणायला हवी'.संध्याकाळपर्यंत ताप उतरला.आणि काय आश्चर्य? मघाचे हे आणि आत्ताचे हे दोघे वेगळे वाटावेत इतका फरक झाला होता.ते सहजपणे उठून टॉयलेटला गेले.म्हणजे कलप्रीट तू नव्हतासच.खर सांगू जितक्या वेगाने डोक्यात गेलास तितक्याच वेगाने अगदी मनापासून तुला सॉरी म्हटलं.तापामुळे अगदी निरोगी तरुणांचीही अशीच अवस्था होत असल्याच नंतर समजल,पण ज्यांच्या घरी तू होतास ,त्यांच्या संशयाची सुई तुझ्याकडेच वळली.
अनेकदा अनेकांकडे असं होत.शेंडे साहेबांची पंचाहत्तरी होती.ते व्हीलचेअरवर आले.तुझ्यासाठी झटणाऱ्या शेंडेसाहेबांची ही तू केलेली अवस्था पाहून डोळ्यात पाणी आले.पण तेच शेंडेसाहेब पुढच्याच महिन्यात त्यांच्या घरी झालेल्या मिटींगमध्ये हातात चहाचा ट्रे घेऊन आले.सारखे तुझ्याबद्दल संशय घेणे सोडलं पाहिजे हे समजत रे.पण अस का होत? आम्हा सर्वसामान्यांनाच नाही तर,शास्त्रज्ञांनाही अजून तू पुरता उमगला नाहीस.मायावी राक्षसासारखा तू प्रत्येकाकडे आणि वेळोवेळी रूप बदलत असतोस.आधुनिक वैद्यकानी तू बरा न होणारा आणि सतत वाढत जाणारा अस तुझ्यावर शिक्कामोर्तब केलयं ते इतक डोक्यात बसलय.
आता तुझ्याशी मैत्री केलेले,जगभरातील शुभंकर, शुभार्थी तंत्रज्ञानामुळे,सोशल मीडियामुळे एकत्र येत आहेत.काहीजण तर या गृहीतकावरच ऑबजेक्शन घेत आहेत.रॉबर्ट रॉजर्स यांनी 'An observation to recovery' मधून आपल्या विधानाला पुष्टी देणाऱ्या अनेकांना बोलत केल आहे.त्यांच्या विकली रेडीओ प्रोग्रॅममधून या सर्वाना पाहता ऐकता येत.हे एक उदाहरण झाल.असे अनेक आहेत.
आम्हा विज्ञानाच बोट धरून चालणाऱ्याना अस एकदम मान्य करण अशक्य आहे.पण तुझ्यासह तुला आहेस तसा स्वीकारून आनंदी कस राहायच हे दाखवून देणारेही अनेक आहेत.प्रसिद्ध बॉक्सर महमद अलीने शेवटच्या श्वासापर्यंत तुझ्याशी मैत्री निभावली.करोडो डॉलर्स तुला समजून घेण्यासाठी खर्च केले.इस्त्रायलचे डॉक्टर रफी एल्डर,रोंबा, चाचाचा शिकले.उत्तम डान्स टीचरही बनले.यातून तुझ्याशी मैत्री निभावण त्यांना सोप जातंय.
१७ व्या वर्षी ज्याला तू गाठलस त्या जॉर्डनसारख्या तरुणांनी स्वत:च्या अनुभवावरून तुझ्यावरच प्रकल्प केला.मानसशास्त्रातील पदवी मिळवली.'लीन युंग' हे प्रतिष्ठेचे पारितोषिक मिळवले.पुढच संशोधनही तुला समजून घेण्यासाठी असणार आहे.
एवढच कशाला? आमच्या पार्किन्सनन्स मित्रमंडळाचीही कितीतरी उदाहरणे आहेतच की.हृषीकेश पवारनी नृत्योपाचाराने आमच्या शुभार्थींचे आयुष्याच बदलून टाकले.त्यांचे परफॉर्मन्सेस पाहून न्युरॉलॉजीस्ट,न्यूरोसर्जन,फिजीशियन यांनीही तोंडभरून कौतुक केले.भारती विद्यापीठ आणि संजीव डोळे होमिओपॅथीच्या आधारे प्रयोग करत आहेत.तुझ्याबरोबर येणारे डिप्रेशन,चीन्तातुरता,अलिप्तता,गोंधळलेपणा अशा अनेक लक्षणांपासून मुक्त होत आहेत.डॉक्टर विद्या काकडे यांच्या सायको न्युरोबिकचा प्रयोगही चांगले रिझल्ट देत आहे.पण हे सर्व स्वतंत्रपणे वेगवेगळ्या ठिकाणी होत आहे.सात आंधळे आणि हत्तीच्या गोष्टीसारखे झाले आहे.तू सर्वांगाने कुणाला दिसतच नाही आहेस.
आधुनिक वैद्यकानेच या विविध प्रयोगांना एकत्र घेऊन सत्यापर्यंत पोचण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे.आमचे प्रत्यक्ष अनुभवही गृहीतक म्हणून नाही तरी निरीक्षण म्हणून लक्षात घ्यावयास काय हरकत आहे.
'Together we move better' आम्ही हे सर्व व्हाव म्हणून आमच्या परीन धडपडत आहोत.आमच्या हयातीत तू सर्वांगाने गवसला नाहीस तरी आमचा वसा आम्ही पुढच्या फळीकडे सोपवू.तुझ्याशी केलेली मैत्री निभाऊ.गेला ना राग आता? माफ केलस ना?

No comments:
Post a Comment