आमची शुभंकर अंजली महाजन हिला दौंड येथील 'रोहिणी जाधव स्मारक
ट्रस्ट'तर्फेहमीद दाभोलकर यांच्या हस्ते 'रक्तदाता' पुरस्कार प्राप्त झाला
आहे.या ट्रस्टतर्फे दरवर्षी
रक्तमित्र,रक्तदाता,निसर्गपर्यावरण मित्र असे विविध पुरस्कार दिले
जातात.रोहिणी जाधव यांचा २७ व्या वर्षी वेळेवर रक्त न मिळाल्याने मृत्यू
झाला.त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हे पुरस्कार दिले जातात.पुरस्काराचे हे
एकविसावे वर्ष आहे.अंजलीने २१ वेळा रक्तदान केले आहे. तिचा रक्त गट ओ आरएच
निगेटिव्ह आहे.हा रक्तगट रेअर असल्याने अत्यवस्थ परिस्थितीतल्या अनेकांचे
जीव तिच्या रक्तदानामुळे वाचले आहेत.अचानक रक्त हवे असा फोन येतो आणि ती
हातातले सर्व काम टाकून तेथे हजर होते.घरी शंभर वर्षाच्या सासूबाई आणि
पार्किन्सन्स झालेले पती आहेत.या गडबडीत त्यांच्याकडे कोणीतरी
थांबण्यासाठीही तिला व्यवस्था करायची असते.साठी जवळ आली,पुढे रक्तदान करत
येणार नाही. आता जास्तीत जास्तवेळा रक्तदान करायला हवे असे तिला वाटते.
No comments:
Post a Comment