जगायचं कस?रडत कण्हत, की गाण म्हणत? आमची उत्साही शुभंकर अंजली महाजन ही समस्यांवर मात करत गाण म्हणत कस जगायचं याच मूर्तिमंत उदाहरण आहे.१०० वर्षाची सासू आणि पार्किन्सन्स झालेला नवरा यांना सांभाळत ती असंख्य उद्योग करत असते.तिच्या सहज जगण्याचा ते भाग असल्याने मुद्दाम आम्हाला सांगावे असे तिच्या दृष्टीने ते नसते. बोलता बोलता काहीकाही समजते.यातूनच ११ दिवाळी अंकात तिचे लेख आणि कविता आल्याचे समजले.खरे तर दिवाळी अंकाबद्दल इतक्या उशिरा लिहिणे अप्रस्तुत वाटेल पण छोट्या छोट्या गोष्टींचा बाऊ करणाऱ्यांना यातून प्रेरणा मिळेल असे वाटल्याने लिहित आहे.लिहिण्यासाठी लागणारा निवांतपणा या दोघांना सांभाळत दिवसा मिळणे कठीणच. सर्व लिखाण ती रात्रीच जागून करते.तिने लिहिलेल्या अंकांची यादी पुढे देत आहे.
१) कऱ्हाड वैभव -' शतायुषी इंदिरा' हा स्वत:च्या सासूबाईंवरचा लेख.
२)शब्द गांधार - 'संस्कारशी जडले नाते' हा लेख
३) रंगतरंग -' एकीचे बळ मिळते फळ' - लेख
४) भाविया -' मी सबला' - कविता
५) वेदांतश्री - धार्मिक विविधता तरी एकता - कविता
६) भन्नाट -' देव आहे सत्तेवर' आणि' कविराज' अशा दोन कविता.भन्नाटच्या हास्य कवी संमेलनाच अध्यक्षपदही तिने भूषविले.
७) शरयू -' खेद ' कविता.
८) शिवस्पर्श - 'उध्वस्त मन' - कविता
९) गोदाभूमी -' दिवाळीनंतरचे चार दिवस' - लेख
१०) कुंभश्री - लेख
११ ) मातृवंदना -' आई' -कविता
No comments:
Post a Comment