१० डिसेंबर २०१५ रोजी पार्किन्सन्स मित्रमंडळाची सहल,फुलगाव येथील' इन्व्हेस्टमेंट इन मॅन ट्रस्ट'येथे गेली होती.४० वर्षापासून ते ८२ वर्षापर्यंतच्या .३६ शुभंकर शुभार्थिनी सहलीत सहभाग घेतला यावर्षी प्रथमच दिवसभराची सहल होती.अश्विनी हॉटेलमध्ये नऊ वाजताच मंडळी जमायला सुरुवात झाली.श्री दत्तात्रय जोशी यांनी सोनचाफ्याच्या फुलापासून तयार केलेले खास नैसर्गिक अत्तर सर्वाना लावले आणि वातावरण सुगंधित केले.अरुंधती जोशी,अंजली महाजन. सर्वाना बिल्ले देण्याचे काम करीत होत्या. प्रफुल्ल उपलप अंजली उपासनी या नव्याने सामील झालेल्या स्वयंसेवकानी. अगदी वेळेत आलेल्या व्यक्तीना बसमध्येच बसवले आणि त्यांच्यापर्यंत बिल्ले पोचवले.
बसमध्ये माईक असल्याने सूचना देणे सोपे गेले. दिवसभराच्या कार्यक्रमाची रूपरेषा रामचंद्र करमरकर यांनी सांगितली.सुरुवातीला आणि प्रत्येक थांब्यावर हजेरी घेण्याचे काम अंजली करत होती.वय आणि पार्किन्सन्स विसरून सर्वांनी सहलीचा आनंद लुटा.हे अंजलीचे आवाहन सर्वांनी मनावर घेतेले.अंत्याक्षरी खेळता खेळता कधी फुलगाव आले समजलेच नाही.
तेथे चहाची व्यवस्था केलेली होती.शुभार्थी सुशील श्रॉफ यांच्या पत्नी प्रथमच मंडळाच्या उपक्रमात सामील झाल्या होत्या.त्यांनी ढोकळा करून आणला होता.सर्वाना देण्यासाठी द्रोणही चहापान करून लगेचच तुळापुर येथील संगमेश्वर मंदिर आणि संभाजीची समाधी पाहण्यासाठी सर्व रवाना झाले.केशव महाजन हे फुलगाव येथेच थांबले. त्यांच्या बरोबर प्रफुल्ल उपलप थांबल्याने अंजली महाजन तुळापुरला येऊ शकल्या.भीमा भामा आणि इंद्रायणीच्या संगमावर असल्याने येथील शिवमंदिराला संगमेश्वर मंदिर नाव पडले.देऊळ प्राचीन आणि हेमाडपंती शैलीतील आहे.परिसर सुंदर आहे.नव्वद सालानंतर निरगुडकर फौंडेशनने मंदिराचा जीर्णोद्धार केला.संभाजीमहाराजांची समाधी त्या भोवती ऐतिहासिक दृश्ये दाखवणारी पेंटिंग होती.खाली पायर्या उतरून गेल्यावर नदीचा संगम आहे.ज्याना शक्य आहे ते सर्व तेथे जाऊन आले.परिसरात ताक,ताज्या भाज्या विकावयास बसले होते. स्वस्त ताज्या भाज्या अनेकांनी घेतल्या.
जेवणासाठी सर्व मुळ मुक्कामी आले.पाने वाढून तयारच होती.भाकरी,पोळ्या,भरल वांग,झुणका,शेवग्याच्या शेंगा घातलेली आमटी,भाजलेला पापड,दाण्याची चटणी आणि गुलाबजाम असा बेत होता.गरम गरम चुलीवरून ताटात भाकर्या येत होत्या.प्रेमाने आग्रहाने वाढले जात होते.
जेवणानंतर हॉलमध्ये खेळ आणि करमणुकीच्या कार्यक्रमासाठी व्यवस्था केलेली होती.गाडीनेच तेथे सर्वाना सोडण्यात आले.जेवणाच्या ठिकाणी आणि या हॉलमध्येही शुभार्थीसाठी आमच्या मागणीनुसार संस्थेने चार कॉट तयार ठेवल्या होत्या.अनेकाना अशी गरज लागेल असे वाटले होते. परंतु केशव महाजन आणि डीबीएस सर्जरी झालेले सुरेश सिधये वगळता कोणाला आडवे पडण्याची गरज वाटली नाही.
खेळण्यास सुरुवात झाली.शुभार्थी श्री. चंद्रकांत दिवाणे आणि विजया दिवाणे यांनी लेखक ,कलाकार ओळखा असा खेळ तयार करून आणला होता.कागदावर उत्तरे लिहायची होती.सर्वांनी उत्साहाने भाग घेतला.शरच्चंद्र पटवर्धन याना प्रथम आणि शोभना तीर्थळीयाना द्वितीय क्रमांक मिळाला.
स्वत:च्या हस्ताक्षरात खेळ तयर केल्याने प्रथम द्वितीय क्रमांकाच्या विजेत्यांबरोबर दिवाणेनाही बक्षीस देण्यात आले.यानंतर मोडक यांनी रिंग टाकण्याचा खेळ आणला होता पाच बक्षिसेही आणली होती.त्यातही सर्व शुभार्थिनी सहभाग घेतला.महेंद्र शेंडे प्रथम,शिल्पा कुलकर्णी द्वितीय,shri गायाल तृतीय,यशवंत एकबोटे आणि विजया मोघे याना उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली.शरच्चंद्र पटवर्धन यांनी यानंतर ओरीगामिसाठी तयार करून आणलेले कागद देण्यात आले.शैलजा कुलकर्णी आणि विजया दिवाणे यांचा पहिला आणि दुसरा क्रमांक आला.
अंजली महाजनने काही शुभंकर शुभार्थीवर कविता करून आणल्या होत्या.त्या व्यक्ती ओळखायच्या होत्या.या खेळानेही गंमत आणली.आता चहा आला होता.चहा घेता घेतां करमणुकीचे कार्यक्रम करण्यात आले.
विजया मोडक यांनी भक्तीगीत,अंजली महाजनने विडंबन गीत,श्रद्धा भावे आणि आशा रेवणकर,रमेश घुमटकर यांनीही विनोदी कविता चुटके सांगितले.अंजली उपासनी यांनी केळीच्या पानात जेवण्याचे विशेषत: पीडी पेशंटना होणारे फायदे सांगितले नोव्हेंबर महिन्यातील मंडळाच्या कार्यक्रमासाठी विठ्ठलाची गाणी कार्यक्रम सादर केलेले महेंद्र शेंडे सहलीस आवर्जून आले होते.त्यांच्या महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. गीताला सर्वांनी साथ दिली.
परतीची वेळ झाली होती. वाटेत स्वरूपानंद यांचा आश्रम आहे.तो पाहून बस पुण्याकडे परतली.परतताना अंत्याक्षरीऐवजी श्री. मोडक यांनी जुनी हिंदी गाणी आणली होती.ती लावली.ठेका धरायला लावणाऱ्या त्या गाण्यावर अंजली महाजन आणि अंजली उपासनी यांची पावले चालत्या बसमध्येच थिरकायला लागली.सहल संपत आली तरी मने अजून मागेच रेंगाळत होती.अनेक दिवसांसाठी उर्जा घेऊन मावळतीच्या आतच सर्व पुण्यात पोहोचले.
तस
लतर

No comments:
Post a Comment