२००९ च्या पार्किन्सन दिन मेळाव्यातील मनोगत - गोपाळ तीर्थळी
उपस्थित निमंत्रित, मान्यवर आणि बंधू भगिनीनो
मी गोपाळ तीर्थळी गेली दहा वर्षे माझ्या पार्किन्सन मित्राबरोबर राहत आहे.त्यात गेली अडीच ते तीन वर्षापूर्वी मला एखादा परीस सापडावा तसे श्री शेंडे आणि श्री पटवर्धन सापडले.
त्यांच्र्बरोबर बोलून आणि त्यांनी गोळा केलेल्या पार्किन्सन डिसीज ( PD ) बद्दल माहिती,पुस्तके,सी,डी.या सार्याने माझा पार्किन्सन कडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला.आयुष्यात खूप काही केले पण स्वत:चा स्वत:वर विश्वास ठेवून आपण आपले आयुष्य खूप चांगल्या तर्हेने कसे जगायचे हा मंत्र मिळाला.
हा माझा फायदा इतराना व्हावा म्हणून मी पार्किन्सन मित्रमंडळाचा सदस्य होऊन इतर पीडी मित्राशी घरोघरी जावून गप्पा मारल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर पडलेला फरक आणि त्याना मिळालेला विश्वास,आनंद खूप काही देवून जातो.मला पार्किन्सननी खूप काही दिले.मित्र दिले,योगासने शिकवली.प्राणायाम,आयुर्वेदातील पंचकर्म,डान्स थेरपी,स्पीच थेरपी,ओंकार चैतन्य हास्यक्लब सारखा परिवार की जो तुमचे स्वास्थ्य उत्तम राखतो.
हे सगळे पहिले की वाटते जीवनात आनंद लुटायचा असेल तर तुम्ही दुसर्याला आनंदी कसे करता येईल हे पहा.म्हणजे ते पाहताना मिळणारा आनंद दुसऱ्या कुठल्याही पद्धतीने तसा मिळणार नाही.म्हणू ते करताना हुरूप येतो,तो उत्तरोत्तर वाढत जातो.जावो ही इच्छा आहे.हे करण्यासाठी
It is not to be taught
It is to be experience.
No comments:
Post a Comment