पुस्तक प्रकाशन
रविवार दि.५ सप्टेंबर रोजी शेखर बर्वे यांच्या 'पार्किन्सन्सशी मैत्रीपूर्ण लढतया पुस्तकाच्या सुधारित दुसऱ्या आवृत्तीचे ऑनलाईन प्रकाशन दिनानाथ मंगेशकर हास्पीटलच्या न्युरॉलॉजी विभागाचे प्रमुखन्युरॉलॉजिस्ट डॉक्टर राहुल कुलकर्णी यांच्या हस्ते झाले.
या पुस्तकाची पहिली आवृत्ती १३ मे २०१३ साली प्रकाशित झाली.ती संपल्यामुळे ३१ मार्च १५ ला पुनर्मुद्रण करण्यात आले. दरम्यानच्या काळात नवनवीन माहिती येत होती अभ्यासू वृत्तीच्या लेखक शेखर बर्वे यांना या सुधारणा करण्याचा ध्यास लागला.८० वर्षे ओलांडलेल्या शेकर बर्वे यांनी झापाटल्यासारखे हे काम केले.जुनेजाणते न्युंरॉलॉजिस्ट प्रदीप दिवटे यांनी ते बारकाईने तपासून पाहून सूचना केल्या.पहिल्या आवृत्तीला त्यांनी प्रस्तावना दिली होती.या आवृत्तीला मात्र तरुण न्युरॉलॉजिस्टकडून प्रस्तावना घेण्यास सुचविले त्यानुसार बर्वेनी न्युरॉलॉजिस्ट डॉक्टर राहुल कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला.
डॉक्टर राहुल कुलकर्णी पार्किन्सन्स मित्रामंडळाशी सुरुवातीपासून निगडीत आहेत.२००८ ला पहिला जागतिक पार्किन्सन्सदिनानिमित्ताचा मेळावा त्यांच्या सहकार्याने दीनानाथ हॉस्पिटल मध्ये झाला.यानंतर अनेकवेळा ते व्याख्यान देण्यासाठी आले. स्मरणिकेत लेख लिहिले.महत्वाचे म्हणजे शेखर बर्वे यांचे पुस्तक त्याना उपयुक्त वाटल्याने त्यांनी स्वत:कडे विक्रीसाठी ठेवले.त्यांच्यामार्फत अनेक पेशंटना ते पोचले विशेषत: ग्रामीण भागातील रुग्णांना याचा उपयोग झाला.त्यामुळे डॉक्टर राहुल कुलकर्णी यांच्याकडे जाणे साहजिक होते.त्यांनीही उत्तम प्रस्तावना लिहून दिली आणि आपल्या कार्यबाहुल्यातून प्रकाशनासाठी वेळ काढला.
प्रकाशन सोहळा अत्यंत सुटसुटीत झाला.
सुरेश फडणीस यांच्या 'तू बुद्धी दे तू तेज दे' या सुरेल स्वरात गायलेल्या प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली.संस्थेची कार्यवाह आशा रेवणकरनी सूत्रसंचालन केले.
त्यांनी प्रास्ताविकात पुस्तक प्रकाशनाची पार्श्वभूमी,मंडळाच्या वाटचालीतील सध्याच्या महत्वाच्या घटना सांगितल्या.सध्या कार्यरत असलेली नारीशक्ती नेटाने काम करत आहे असे सांगत भविष्यातील योजनांसाठी आशावाद व्यक्त केला.
लेखक शेखर बर्वे आणि डॉक्टर राहुल कुलकर्णी यांची ओळख करून दिली.महत्वाचे म्हणजे त्यांच्यातील माणूसपण उलगडून दाखवले.
यानंतर राहुल कुलकर्णी यांनी प्रकाशन केले. शेखर बर्वे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.करोना काळात आलेल्या अनेक अडचणीवर मात करत पुस्तक निर्मिती करण्याची जिद्द त्यांनी बाळगली.
डॉक्टर राहुल कुलकर्णी यांनी झोप,वेदना आणि विस्मरण या पार्किन्सन्ससाठी दिल्या जाणाऱ्या औषधाने बऱ्या न होणाऱ्या आणि शुभार्थीसाठी त्रासदायक असणाऱ्या लक्षणाबद्दल आणि त्यावरील उपयाबद्दल उपयुक्त माहिती दिली.
ऑनलाईन कार्यक्रम झुमवर दाखवणारे होस्ट अतुल ठाकूर आणि को होस्ट गिरीश कुलकर्णी यांच्या मदतीशिवाय हा नेटका कार्यक्रम होणे शक्य नव्हते.
No comments:
Post a Comment