२०१८ च्या पार्किन्सन्स दिनाच्या मेळाव्यातील कलाकृती.
मंडळी १३ एप्रिलला जागतिक पार्किन्सन्सदिनानिमित्त असलेला मेळावा जवळ आला.कलाकृती
तयार करण्यासाठी सज्ज आहात ना?शुभार्थी विजय देवधर यांची क्विलिंग
भेटकार्डे तयारही झाली.आपण काम सुरु केले नसेल तर अजूनही सुरु करू शकता.
कलाकृतीत
भरतकाम,विणकाम,पर्सेस,पिशव्या,चित्रकला,यात तैलरंग,जलरंग,पेन्सिल
रेखाचित्रे,कोळसाचित्रे,जलरंग असे सर्व काही येईल याशिवाय छायाचित्रे,
भेटकार्डे, तोरणे, पाककृती, आकाशकंदील,इकेबाना,स्वत: लिहिलेले पुस्तक,कविता
हेही येईल.या यादीत राहिले आणि तुम्हाला सुचले असे इतर ही असू
शकेल.स्वनिर्मिती असावी हे महत्वाचे.
आपण काय देणार आहात त्याची माहिती आणि नावे कृपया
शोभना तीर्थळी - ९६७३११४८४३/९६७५५८४१९८
अंजली महाजन - ९८२२९६४२८२
दीपा होनप - ९८२२४५८७७५ यांच्याकडे द्यावी.
No comments:
Post a Comment