पार्किन्सन्स शुभार्थींच्या( Patient ) कलाकृती - एक उपचार
जागतिक पार्किन्सन्स दिनाच्या मेळाव्यात आत्तापर्यंत शुभार्थींचा नृत्याविष्कार हे आकर्षण
असायचे.गेल्या काही कार्यक्रमात शुभार्थींच्या कलाकृतीचे प्रदर्शन हे ही आकर्षण ठरत आहे.
घरभेटीतून अनेक शुभार्थी पेंटिंग करतात,चित्रे काढतात आणि त्याचा त्यांना पीडीच्या लक्षणांवर नियंत्रण ठेवण्यास उपयोग होतो हे लक्षात आले.यातील पहिला प्रेरणादायी अनुभव डॉ. शीलाताई कुलकर्णी यांचा.तीसपस्तीस वर्षांच्यावर भारत आणि भारताबाहेर त्यानी वैद्यकीय व्यवसाय केला.अनेक रुग्णांवर उपचार करुन त्याना दिलासा दिला.पण त्यांचे पति आणि त्या स्वतः या दोघानाही पार्किन्सन्स झाल्यावर मात्र नैराश्येनी घेरले.पण त्यात गुंतून न राहता त्यातून बाहेर पडण्याचे विविध मार्ग शोधले.ताठरणार्या बोटाना वठणीवर आणण्यासाठी कॅरम वीणकाम,चित्रकला यांचा आधार घेतला.२००९ मध्ये जवळच राहणार्या सोनाली राणेकडून चित्रकलेचे धडे घेण्यास सुरुवात केली.आठवड्यातून पाच दिवस रोज एक तास शिकणे चालू झाले.शालेय जीवनात एक अनिवार्य विषय म्हणून आणि वैद्यकीय शिक्षणात आकृत्या काढण्यापुरताच चित्रकलेशी संबंध होता आता अडुसष्टाव्या वर्षी पेन्सिल हातात धरली होती.आडव्या उभ्या तिरक्या रेषा काढण्यापासून सुरुवात केली.शिक्षक आलेल्यावेळी ऑफ पिरिएड असला तर उठून बसताही यायचे नाही.सुरुवातीला लगेच हात दमायचे.सारखे खोडरबर लागायचे.रेषांच्या फटकार्यातून हाताची असमर्थता जाणवायची.पण मनाचा निर्धार आणि सतत सराव यानी रेषा स्थिर होऊ लागल्या.प्रमाणबद्धता जमू लागली.त्रिमितीची जाण आली.एकाच पेन्सिलिने कमी जास्त दाब देत शेडींग करणे जमू लागले.निसर्ग चित्र, वस्तुचित्र,व्यक्तिचित्र सगळे सराइतासारखे जमू लागले.
या सर्वांपेक्षा महत्वाचे म्हणजे सलग एक तास बसूनही शरीर कुरबुर करेनासे झाले.औषधांची आठवण येईनाशी झाली.नैराश्य दूर होऊन उत्साह, आत्मविश्वास वाढला.
त्यांची शिक्षिका सोनाली राणेनी सांगितले ‘चित्रकलेत त्यांनी प्रगती केलीच पण चित्रकला शिकताना आणि चित्रे काढताना त्यांच्या शारीरिक, मानसिक,अवस्थेत झालेले स्थित्यंतर अधिक आनंदाचे होते.’
चित्रकलेची ही किमया थक्क करणारी होती. २०१० सालच्या स्मरणिकेचे मुखपृष्ट त्यांच्याच चित्राने सजले.
चित्रकलेने पिडीच्या लक्षणावर मात करणारे दुसरे उदाहरणं विद्याधर पटवर्धन यांचे. बँकेतून निवृत्त झाल्यावर त्यांनी चित्रकलेचा छंद जोपासला.७५व्या वर्षी पिडी झाला तरी त्यानी चित्रकला सोडली नाही.मी त्याना भेटले तेंव्हा ते ८० वर्षाचे होते...शीलाताईना कंपाची समस्या नव्हती.पटवर्धनाना मात्र ताठरते बरोबरच कंपाचीही समस्या होती..त्यामुळे त्यानी पीडी झाल्यावर केलेली मोठमोठी पेंटींग्ज पाहून त्यांच्या जिद्दीला हॅट्स ऑफ म्हणावेसे वाटले.चित्रे काढताना त्यांची समाधी अवस्था असायची.. कंप, ताठरता जवळही फिरकत नव्हते.
कमलाकर झेंडे, कल्पना शिरनामे हेही छंद म्हणून चित्रकला जोपासणारे शुभार्थी.झेडे व्यवसायाने अभियांत्रिकी कॉलेजमधे गणिताचे प्राध्यापक तर कल्पना खेळाडू होत्या.अशा अनुभवातून
जागतिक पार्किन्सन्स दिनाच्या मेळाव्यात शुभार्थीच्या कलाकृतीचे प्रदर्शन ठेवायचे ठरले.२००९/१० हे वर्ष कलोपचार या विषयालाच वाहिलेले होते.नृत्योपचार,संगीतोपचार,ड्रम थेरपी अशा विविध कार्यशाळा आयोजित केल्या होत्या.अनिल अवचट यांच्यासारखे कलाकार अध्यक्ष होते. त्यामुळे असे प्रदर्शन संयुक्तिकही होते..त्यानंतर २०१५ मध्ये असे प्रदर्शन भरले.शुभार्थी विजय राजपाठक यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी माधवी यांनी राजपाठकांचे एक पेंटिंग मला भेट दिले.त्यांची अशी अनेक पेंटीग्ज असल्याचे त्यांनी सांगितले.ती सर्व अप्रतिम होती.वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तासनतास काम करून त्यांनी ती काढली होती.ते सलग इतके तास काम करतात याचे न्यूरॉलॉजिस्टनाही आश्चर्य वाटायचे.शुभार्थीना त्यामुळे प्रेरणा मिळावी म्हणून प्रदर्शन मांडायचे ठरले..यावेळीही भरभरून प्रतिसाद मिळाला.
२०१७ मध्ये तिसऱ्यांदा असे प्रदर्शन आयोजित केले गेले.शांतीवन सहलीत ओरोगामीसाठी सर्वाना कागद दिले होते. शुभार्थी विजय ममदापूरकर यांनी त्या कागदावर चालत्या बस मध्ये अर्कचित्रे काढली.ती पाहून शीलाताई कुलकर्णीना चित्रे काढण्याची प्रेरणा मिळाली.अनिल कुलकर्णी यांच्या आजारपणात त्यांचे चित्रे काढणे थांबलेच होते.ममदापूरकर यांच्या उत्साहाची लागण अनेकांना झाली आणि यावर्षी प्रदर्शन ठेऊया असे ठरले. मेळाव्याच्या अनेक दिवस आधीपासून वेळोवेळी प्रदर्शनाची माहिती दिली जात होती पण कितपत प्रतिसाद मिळतो याबाबत शंका होती.शुभार्थिंनी शंका फोल ठरवली.अनेकांनी कलाकृती आणल्या, त्यात विविधताही होती.या सर्वांनी घेतलेले कष्ट,कल्पकता आणि यातून आजाराचा विसर पडणे,काही लक्षणे कमी होणे हे सर्व पाहून आता कलाकृतीचे प्रदर्शन हा अनिवार्य भाग झालाआहे.
विजय देवधर यांनी २०१७ साली रंगीबेरंगी कागदाच्या ओरिगामीने.फुलपाखरू,बदक, अनेक प्राणी पक्षी,फुले अशा विविध वस्तू केल्या होत्या.ओरिगामी ही अक्षरेही ओरिगामीतच तयार केलेली.विशेष म्हणजे पीडी झाल्यावर पुस्तकात पाहून त्यांनी ही कला आत्मसात केली.तासनतास मी हे करत राहतो. मला खूप आनंद मिळतो असे ते सांगत होते.२०१८ च्या प्रदर्शनात त्यांनी मन वेधून घेणारी.क्विलिंगची भेटकार्डे केली.ही नाजूक कला आत्मसात करण्यास त्यांना कष्ट घ्यावे लागले.पण त्यात त्यांचे भान हरपून जाई मला रंग बोलावतात असा अनुभव त्यांनी सांगितला.
पंचाहत्तरी ओलांडलेल्या पद्मजा ताम्हणकर यांच्या उत्साहाला कोणताही उपक्रम असला तरी उधाण येते..त्यांनी कागदी फुले,पिस्त्याच्या कव्हरची फ्रेम,ग्रीटिंग्ज अशा विविध वस्तू प्रत्येक प्रदर्शनात असतात.
प्रदर्शनात पाककृती ठेवल्या तरी चालतील असे सांगितले होते.यात महिला वर्ग सहभागी होईल असे वाटले होते परंतु उमेश सलगर यांनी एक वर्षी भरली मिरची ठेवली आणि ही मक्तेदारी स्त्रियांची नाही हे दाखवून दिले.आणलेल्या मिरच्या त्यांनी तेथेच वाटून टाकल्या.प्रमुख पाहुण्यांना देण्यासाठीही त्यांनी मिरच्यांचे स्वतंत्र पाकीट आणले होते.एका शुभार्थीला लांबट मिरचीत मसाला भरण्याचे कौशल्याचे काम थरथरत्या हाताने करणे कसे जमले असेल? दुसर्या वर्षी त्यांनी खारी चंपाकळी करून आणली होती. सकाळच्या वार्ताहरालाही आपल्या वृत्तात त्याचा उल्लेख करावासा वाटला.
पूर्वी दिवाळीला आकाश कंदील घरी केले जायचे. आता कोणी फारसे करताना दिसत नाही आमचे शुभार्थी रमेश रेवणकर मात्र आकाश कंदील घरीच करतात.त्यांचा आकाशकंदील आम्ही प्रदर्शनात ठेवतो.
डॉक्टर जावडेकर आपल्या कलाकृतीना खूप जपतात. आपली पेंटींग स्वत:कडे ठेवून त्यांनी ती प्रेक्षकांना दाखवली.
ही काही मोजकी उदाहरणे सांगितली.
. या सर्वांचे थरथरणारे हात,ताठरलेले स्नायू,काहीना होणारा फ्रीजिंगचा त्रास या सर्वावर मात करत जिद्दीने त्यांनी हे केले. सर्वसामान्यांपेक्षा त्यांना यासाठी कितीतरी जास्त वेळ लागला असणार हेही समजू शकणारे आहे.पीडिला विसरून आनंदी राहण्यासाठी त्यांनी शोधलेले हे मार्ग नकळत लक्षणांवर मात करतात हेही आता लक्षात आले आहे.इतर शुभार्थींसाठी हे प्रेरणादायी आहे.
२०१८ च्या मेळाव्याला अध्यक्ष म्हणून आलेले मानसोपचार तज्ज्ञ डॉ.लुकतुके प्रदर्शन पाहून खूपच प्रभावित झाले.त्यांनी शुभार्थींचे भरभरून कौतुक केले आणि हे कसे साध्य होते हे शास्त्रीय दृष्ट्या समजावून ही सांगितले.त्यांच्या सांगण्याचा थोडक्यात आशय पुढे देत आहे.
मेळाव्यातील ईशस्तवन,नृत्य, कलाकृती या सर्वांचा आधार घेत त्यांनी त्यामागचे विज्ञान समजावून सांगितले.नृत्य करणाऱ्या शुभार्थींची नृत्य करताना पार्किन्सन्सची लक्षणे थांबलेली सर्वांनी पाहिली..तादात्म्य,सापडलेली लय यामुळे ती थांबली .जेंव्हा लय बिघडते तेंव्हा रोग होतो.कलाकृतीतही .क्विलिंग हे अत्यंत नाजूक काम Movement Disorder असणारी व्यक्ती करु शकते कारण ते काम करताना त्यांचे मन रमते,छान वाटते.या छान वाटण्यात लय असते.मी माझा स्वामी हा भाव असतो.अशी लय सापडणे महत्वाचे.ती मनाची असते तशी शारीरिक वर्तनाची असते.ही सापडवायची कशी?
होकारार्थी मानसशास्त्रात त्याचे उत्तर सापडते.. होकारार्थी मानसशास्त्र हे जगण्याचे शास्त्र आहे. तसेच त्यात सूत्रे असतात, ती लक्षात ठेवायची आणि ती जगण्याचा प्रयत्न करायचा.Four A हे सूत्र यासाठी डॉक्टरांनी सांगितले
.१)Adapt - जुळवून घेणे.यामुळे साधनसामग्रीची शक्ती वाढते,नकार असेल तर जुळवून घेणे कठीण होते.
२) Adopt - दत्तक घेणे. आजाराशी भांडू नये.भोवतालच्या परिस्थितीवर आपला ताबा नसतो, आपल्यावर असू शकतो.
३) Alter - मुळ डिझाईन कायम ठेवून् दृष्य सोयी बदललणे.आपल्या अपेक्षा,भावना ,वर्तन,सकारात्मक रीतीने अल्टर करणे.
४) Accept - नाईलाजाने नाही तर स्वेच्छेने स्वीकार करणे.आपल्याला यापेक्षा बदलणे शक्य नाही या पातळीवर आणणे .आणि हे म्हणताना पूर्ण प्रयत्न केला आहे का? हा प्रश्न स्वत:ला विचारणे
स्वमदत गटात आपल्याप्रमाणे इतर असल्याने स्वीकाराची प्रक्रिया सोपी होते.
आता whatsapp,फेसबुकसारख्या साधनामुळे कलाकृती लागलीच इतरांच्यापार्यंत पोचवता येतात.डॉक्टर जावडेकर भूषणा भिसे यांची पेंटींग्ज,नागपूरच्या सौ.पाटणकर यांच्या कलाकृती आणि कपड्यावरील रंगकाम,विजया प्रभू यांचा कर्नाटकी कशिदा असे काहीना काही येतच राहते.यातून होणाऱ्या कौतुकामुळे शुभार्थीचा आत्मविश्वास वाढतो आणि इतरांना प्रेरणा मिळते.अशी आनंदाची लागण होणे हेच तर स्वमदत गटाचे काम आहे ना?
( 'संपूर्ण' दिवाळी डीजीटल अंक २०१८ मध्ये प्रकाशित )

No comments:
Post a Comment