जागतिक पार्किन्सन्स दिनानिमित्त मेळावा २०११
२००९ मंडळाची पहिली सहल.
अरुण जोग यांना त्यांच्या घरी आम्ही भेटायला गेलो त्या आधी सभामधून भेटी झाल्या होत्या.मितभाषी, सौम्य,ऋजू व्यक्तिमत्व. चेहऱ्यावर हसरा भाव अशी प्रतिमा होती.घरभेटीत ते अधिक उलगडले.पार्किन्सन्सलाही त्यांनी हसत हसत स्वीकारल्याच लक्षात आले.त्यांच्या पत्नी सुमनताई यांनाच हा खेळाडू, सशक्त माणूस याला पीडी कसा झाला म्हणून वाईट वाटले.पत्नीच्या अनेक आजारपणात ते शुभंकर म्हणून भक्कमपणे त्यांच्या पाठीशी उभे राहिले होते.आता सुमनताई शुभंकर बनून त्यांच्या पाठीशी उभ्या होत्या.आमच्या गप्पात त्यांचा कुठेही तक्रारीचा स्वर, कुरकुर नव्हती.खर तर बोलण्याचे काम मी आणि सुमनताईच करत होतो आणि आमच्या दोघांचे नवरे.मधून मधून अत्यावश्यक तेवढेच बोलत होते.
B.E. Electrical आणि M.E.Mechanical असलेले जोग पुना इंजिनिअरींग कॉलेजमधून मेकॅनिकल विभागाचे हेड ऑफ द डिपार्टमेंट म्हणून निवृत्त झाले.मंडळात मात्र ते आमच्यापैकीच एक असत.नृत्योपाचारातील सहभागींसाठी तर अरुण काका म्हणजे जवळचे मित्रच.
मित्रमंडळाची सभा असो,मेळावा असो की सहल असो ते आवर्जून उपस्थित असत.सुमनताइंचे नी रिप्लेसमेंटचे ऑपरेशन झाले त्यावेळी काही दिवस त्या सभांना येऊ शकल्या नाहीत,पण जोग मात्र सोबत शोधून सभांना उपस्थीत राहिले.
त्यांच्या निधनापूर्वी १० जानेवारीला अनिल अवचट यांच्या ओरिगामी कार्यक्रमात ते उपस्थीत राहिले होते. १३ सालच्या जागतिक पार्किन्सन्स मेळाव्यात नृत्याचा कार्यक्रम होणार होता त्यात ते सहभागी होणार होते तालमींला सुरुवात झाली होती.त्यांचा नृत्य शिक्षक हृषीकेशने सांगितले.'अरुण काका तुम्ही या सर्वांचे लीडर बर का?' पण नियतीला ते मान्य नव्हते.लीडरशिवायचं कार्यक्रम झाला.लीडर हसत हसत मृत्यूला सामोरे गेला होता.
' मदत घ्या मदत करा.' हे मित्रमंडळाचे ब्रीदवाक्य.पार्किन्सन्स मित्रमंडळामुळे आमच्या आयुष्यात आनंद निर्माण केला असे ते नेहमी म्हणत.डॉक्टर नमिता जोशी यांच्या स्पीच थेरपीच्या व्याख्यानानंतर भारती विद्यापीठात मोफत उपचार असणार होते. जोगना बोलण्याची समस्या होती गिळताना ठसका लागायचा.नमिता जोशींनी गिळायचे कसे बोलायचे कसे हे शिकवले.स्पीच थेरपी सुरु झाली.त्यांचा त्रास खूप कमी झाला.नृत्योपचारामुळे त्यांच्या दैनंदिन जीवनाची गुणवत्ता वाढली होती.हे सर्व मित्रमंडळामुळे असे त्यांना वाटत होते.असे असले तरी मदत घेण्यापेक्षा,मदत करा हेच त्यांनी जास्त पाळले.अमेरिकन पार्किन्सन्स सपोर्ट ग्रुपची त्यांना मिळालेली सर्व पुस्तके व सीडी त्यांनी मंडळाला दिल्याच,शिवाय सभांसाठी लाऊडस्पीकरची गरज लक्षात घेऊन तोही दिला.देणगी मिळवून देण्यातही ते पुढे असत. हृषीकेश पवार यांना मोफत नृत्योपचार करण्याची इछ्या होती पण जागेचा प्रश्न होता.जोग पती पत्नींनी आपली जागा देवू केली.जोग स्वत:ही नृत्य वर्गात सामील झाले.त्याचा त्यांना फायदा होत होता म्हणून ते खुश होते. अरुण जोग यांच्या निधना नंतर कोणालाच नृत्यासाठी तेथे जावे वाटत नव्हते.पण सुमनताईनी सर्वाना फोन करून येण्याविषयी सांगितले.सुमनताईना धीर देण्याऐवजी त्याच या सर्वांचे अश्रू पुसत होत्या.नृत्य वर्ग पुन्हा तेथेच चालू राहिला.त्यांच्या अरुण काकानाही तेच आवडले असते.सुमनताई काही काळ अमेरिकेला गेल्या तरी हॉलची चावी देवून गेल्या होत्या.
सुमनताई मेळाव्याला उपस्थित राहतात.त्यांच्याबरोबर आमच्यासाठी आठवणींच्या रुपात जोगही असतात.