जागतिक पार्किन्सन्स दिनानिमित्त प्रकाशित होणाऱ्या २०१६ च्या
स्मरणिकेचे काम चालू होते.मोकळ्या जागांवर घालायला फिलर निवडून ठेवले
होते.एका ठिकाणी अर्धे पान शिल्लक होते.तिथ काय टाकायचं असा विचार चालला
होता.तर आमचे प्रिंटर विनय दिक्षितनी तिथ स्वत:ची जाहिरात घालून
टाकली.स्मरणिकेचे काम करता करता तो आमच्या कामात गुंतत गेला. पुढच्या
सभेपासून स्वयंसेवक म्हणून येणार असल्याचे त्यांनी सांगितले.असेच मदतीचे
हात ज्यांची नोंद होतच नाही.त्यांच्याबद्दल भावना व्यक्त करण्यासाठी हे
लेखन.कृतज्ञता,आभार असे शब्द या कोणाला आवडणार नाहीत. त्यांच्या दृष्टीने
त्यांनी फार काही केलेलं नसते.आमचे काम मात्र यामुळे खूप पुढे गेलेले
असते.काही सातत्याने आमच्याबरोबर नसतात पण त्यात्यावेळी त्यानी निभावलेली
भूमिका आमच्यासाठी मोलाची असते.
शरच्चंद्र
पटवर्धन यांनी २००० मध्ये पहिली सभा घेतली तेंव्हा 'हा जगन्नाथाचा रथ
आहे,सार्यांनी मिळून
ओढायचा आहे.गोवर्धन पर्वत आहे,सार्यांनी मिळून उचलायचा आहे.'असे म्हटले
होते.आजही ते तितकेच खरे आहे.आपणहून सहकार्याचे हात पुढे होत आहेत.
मंडळाची स्वत:ची जागा नाही.पार्किन्सन्स
मित्रमंडळाचे बॅकबोन असलेल्या रामचंद्र करमरकर यांच्या घरात कुणालाही
पार्किन्सन्स नाही श्री.मधुसूदन शेंडे यांचे ते
मित्र.त्यांच्या विनंतीवरून आले. आणि मंडळाचे सर्वे सर्वा झाले.त्यांची
पत्नी, मुलगी, जावई सर्वच वेगवेगळ्या पातळ्यावर मदत करतात.
त्याचं घर मध्यवर्ती असल्याने संपर्कासाठी त्यांचाच पत्ता आहे.पुण्यातले,
परगावचे लोक सतत पुस्तके घेण्यासाठी, माहिती विचारण्यासाठी त्यांच्याकडे
जातात .ते आणि त्यांची पत्नी सर्वांच हसतमुखाने स्वागत करतात.त्यामुळे
मित्रमंडळ परिवाराशी शुभार्थी जोडले जातात.आमच्या शुभार्थींच्यात
आत्मविश्वास जागवून त्यांच्याकडून कार्यक्रमासाठी प्रार्थना बसवून घेणे
त्यासाठी पेटी वाजवणे हेही त्या आनंदाने करतात.
अश्विनी हॉटेलचे अरुण देवस्थळी, २००८
पासून आम्हाला विना मोबदला सभेसाठी जागा उपलब्ध करून देतात. तेथेच आम्ही कार्यकारिणीच्या मिटिंग
घेतो.मित्रमंडळ हॉल,गांधीभवन,पुणे,दिनानाथ हॉस्पिटल यांनीही गरजेनुसार विना मोबदला जागा दिली.
मंडळ
कोणतेही शुल्क घेत नाही.कामाचा पसारा वाढवायचा तर जागोजागी पैसे
हवेतच.सभेच्या ठिकाणी दान पेटी ठेवली जाते.याशिवाय आपणहून आर्थिक मदत
देणारे अनेक आहेत.अमेरिकास्थित सुधा कुलकर्णी या आर्थिक बाबीत फार मोठ्या
आधारस्तंभ आहेत. आमची सर्व प्रकाशने त्यांचा आर्थिक मदतीमुळेच शक्य झाली.
मुक्तांगणचा'
अनिता अवचट संघर्ष सन्मान 'पुरस्कार सैलानी परिवाराचा पुरस्कार यातून
आर्थिक मदत तर झालीच शिवाय काम करण्याचा उत्साह आणि जबाबदारीही वाढली.
स्मरणीकेसाठी
जाहिरात देणारेही आहेत.यांची नावे स्मरणिकेत दिली जातात.स्वत:च्याच
खर्चाने सभेच्या ठिकाणी येणारे,उलट आमच्या दानपेटीतच पैसे टाकणारे तज्ज्ञ
व्याख्याते, स्मरणिकेसाठी लेखन देणारे,नावे तरी किती घ्यायची?
वेबसाईट विना मोबदला करून देणारे अतुल ठाकूर,गेली आठ वर्षे नृत्योपचार चालवणारे हृषीकेश पवार याना तर सलाम.
मंडळाचा
लोगो विनामुल्य करून देणाऱ्या अश्विनी करमरकर आणि युट्युबवर आमचे व्हिडीओ
टाकून देणारे दिलीप नारखेडे यांची तर आमची प्रत्यक्ष भेटही झालेली नाही
सारा मामला फोनवर ,मेलवर संपर्क साधूनच.
ज्यांची नावे सर्वांसमोर कधीच येत नाहीत असे पडद्यामागचे अनेक आहेत त्यांच्यामुळे आम्ही कामाचा व्याप वाढवण्याचे धाडस करत आहोत.
हा सर्व आटापिटा पीडीग्रस्त शुभार्थींसाठी आणि त्यांचे शुभंकर यांच्यासाठी.आपण ही मदत करू शकता.
आम्हाला आपले हात हवेत विविध पातळ्यांवर हवेत
- आर्थिक -
आपण देणगी देऊ शकता.
एखाद्या कार्यक्रमाचे,उपक्रमाचे प्रायोजक होऊ शकता.
आमच्या स्मरणिकेत जाहिरात देऊ शकता.
- सेवा स्वरूपात.
आमच्या विविध कार्यक्रमाना स्वयंसेवक म्हणून मदत करू शकता.
शुभार्थीना कार्यक्रमास येताना सोबत करु शकता.
घर भेटीसाठी मदत करू शकता.
शुभार्थीबरोबर कॅरम, पत्ते खेळणे,गप्पा मारणे करू शकता.
सभेसाठी फोन करण्यात हातभार लाऊ शकता.
सभेसाठी फोन करण्यात हातभार लाऊ शकता.
- तांत्रिक स्वरूपात.
संगणक,इंटरनेट वापरासाठी विविध स्वरूपाची मदत
दृक्श्राव्य फिती तयार करण्यात मदत.
नियमित कार्यक्रमाचे फोटो,व्हिडीओ शुटींग,
काही शुभार्थींच्या घरी जाऊन त्यांच्या कलाकृतींचे फोटो काढणे.
मराठी,इंग्रजी मजकुराचे मुद्रितशोधन,डीटीपी.इत्यादी.
- जागा स्वरूपात
नियमित कार्यक्रमासाठी पुण्यातील विविध भागात जागा उपलब्ध करून देणे.
- तज्ज्ञत्व
शारीरिक, मानसिक आरोग्य, व्यायाम, विविध उपचार इत्यादीसाठी मार्गदर्शन

No comments:
Post a Comment