शुभंकर जोत्स्ना सुभेदार या गीता धर्म मंडळाच्या 'संपूर्ण गीता कंठस्थ परीक्षे'त ९३.९ % गुण मिळवून तिसऱ्या आल्या.वयाच्या ७८ व्या वर्षी त्यांनी हे यश मिळवले हे प्रेरणादायी आहे.कोणतीही गोष्ट शिकण्यासाठी वयाचा अडसर येत नाही हे त्यांनी दाखवून दिले. त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन! १३/१४ साली ते व त्यांचे पती गीता संथा वर्गात दाखल झाले.जन्मभूमी, कर्मभूमी मध्यप्रदेश असलेल्या जोत्स्नाताईना संस्कृतची किंवा गीता पठणाची कोणतीही पार्श्वभूमी नव्हती.नुकतीच पार्किन्सन्स मित्रमंडळाची सहल गेली होती त्यावेळी त्यांनी म्हटलेल्या गीतेच्या पंधराव्या अध्यायाने सभेची सुरुवात झाली होती.त्यांना श्रीसूक्त व इतर अनेक गोष्टी अजून शिकायची इच्छा आहे.त्यांच्या इच्छा फलद्रूप होण्यासाठी शुभेच्छा!
Tuesday, 21 November 2017
Saturday, 28 October 2017
शुभार्थीची दिवाळी
दिवाळी संपली आत्ता काय फराळाची,रांगोळीची पोस्ट असे वाटले ना? फराळाच्या भारंभार पोस्ट मध्ये याकडे कदाचित लक्ष जाणार नाही म्हणून मुद्दामच उशिरा टाकत आहे. येथे फराळ महत्वाचा नाही तर तो करणारी व्यक्ती महत्वाची आहे.उमेश सलगर या आमच्या शुभार्थिनी हे सर्व केले आहे. फराळ करण्यामागची त्यांची भावना, आजारावर मात करत हे करण्याची जिद्द हे शुभार्थींनाच नाही तर सर्वांनाच प्रेरणादायी असेल.
उमेश सलगर यांना मी दिवाळी पूर्वी फोन केला तर म्हणाले आत्ताच बेसन भाजून झाले पहा.लाडू वळायला घेणार.ते स्वत: आपले अनुभव लिहिणार असल्याने मी येथे जास्त लिहित नाही.त्यांची पत्नी निवर्तल्यावर मुलाला तिची कमी वाटू नये म्हणून ते धडपडत असतात.या धडपडी पुढे पार्किन्सन्सनी हात टेकलेत.त्यांची नोकरी आणि त्यासाठी करावी लागणारी भटकंतीही चालू असते.खर तर मी दिवाळीत सर्व फराळ विकत आणणार होते.अन्लाही पण सलगर यांचे फोटो पाहून मलाच एकदोन गोष्टी तरी घरी कराव्या असे वाटले.एकाच रांगोळी काढून पाच दिवस ठेवणार होते ती रांगोळी बदलावी असे वाटले.शरीरापेक्षा बऱ्याचवेळा आपले मनच दमलेले असते,वृद्ध होते.सलगर यांच्या कृतिने माझ्या पंक्चर झालेल्या मनाच पंक्चर काढून हवा भरली.सलगर तुम्हाला सलाम.

Saturday, 7 October 2017
Hello Mr. Parkinson
प्रभाताई शंकर सह्स्त्रभोजने या माझ्या आत्येनणंद. नागपूरच्या भिडे कन्याशाळेत इंग्रजी विषयाच्या शिक्षिका होत्या.वयाच्या पासष्टीनंतर त्यांना पार्किन्सन्सची सुरुवात झाली.२०११ मध्ये त्या ८७ वर्षाच्या होऊन वारल्या.शेवटची काही वर्षे अंथरुणावर होत्या.तरी विनोदबुद्धी,कविमन जागृत होते.त्यांनी स्वत:च्या दुखण्यावर केलेली ही कविता.
ज्योती चापेकर
Hello Mr.Parkinson,
how do you do?
Old friend of old man
I welcome you.
I thank you heartily
for coming so late.
Why? is not the question
you know best
when I was young
you did not turn
my limbs were steady
and all happiness I earned
Now you are my visitor
why should I care?
God is on my side
and I will pray forever.
Prabhatai Sahstrabhojane
ज्योती चापेकर
Hello Mr.Parkinson,
how do you do?
Old friend of old man
I welcome you.
I thank you heartily
for coming so late.
Why? is not the question
you know best
when I was young
you did not turn
my limbs were steady
and all happiness I earned
Now you are my visitor
why should I care?
God is on my side
and I will pray forever.
Prabhatai Sahstrabhojane
Wednesday, 27 September 2017
आठवणीतील शुभार्थी - अनिल कुलकर्णी - १
पार्किन्सन्स मित्रमंडळ संस्था रजिस्टर झाली.अनिल कुलकर्णी, तुमची प्रकर्षाने आठवण येते.ते मंडळात जॉईन झाल्यावर अगदी पहिल्या दिवसापासून संस्था रजिस्टर करू असा त्यांचा आग्रह होता.त्यादृष्टीने त्यांनी हालचालीही सुरु केल्या होत्या.शेंडे साहेब,करमरकर हेही याबाबत आग्रही होते.संस्था नुकतीच मूळ धरू लागली होती.इतरांना इतकी घाई नव्हती.अनिल कुलकर्णी केपीआयटी मधून व्हाईस प्रेसिडेंट म्हणून निवृत्त झाले होते.त्यांची व्हिजन मोठ्ठी होती.त्यांना संस्थेचे भवितव्य दिसत होते.त्यासाठी संस्था रजिस्टर करण्याला पर्याय नव्हता.अनिल कुलकर्णी यांनी सुरुवातीलाच स्वमदतगट म्हणजे काय नाही येथून सुरवात करून स्वमदत गट म्हणजे काय? पार्किन्सन्स मित्रमंडळाची उद्दिष्ट्ये, त्याची कार्यवाही करण्यासाठी कोणते उपक्रम असतील असा विस्तृत आरखडा तयार केला होता..
त्यांच्या पार्किन्सनस विषयाच्या ज्ञानाबद्दल,विद्वत्तेबद्दल,तर्कशुद्ध,वस्तुनिष्ठ विचार करण्याबद्दल, सर्वांनाच आदर . यामुळेच रेडिओवरील भाषण असो,अनिता अवचट संघर्ष सन्मान पुरस्काराची मुलाखत असो सर्वानुमते त्यांची निवड झाली होती.संस्था रजिस्टर करायची असे निश्चित झाल्यावर अध्यक्ष म्हणून त्यांचेच नाव पुढे आले.त्यांनी ते स्वीकारलेही.पण त्याच दिवशी घरी गेल्यावर कार्यकारिणीच्या सर्वाना त्यांची मेल आली.
"First of all, thank you for
electing me for the post of President of Parkinson’s Mitramandal which I
accepted, in the heat of the moment. I have had some second thoughts and I would
like to decline the offer for the following
reasons.
It is the case of, as they
say, ‘the spirit is willing but the flesh is weak’. I would have really liked to
accept your offer. However, looking at the present state of my health, I will
not be able to do justice to this important position. My ‘off’’ periods are
getting longer and more severe. I suffer bouts of freezing and pain. In the last
few months, I have had several
falls, at home and outside, including one on a staircase. I have a problem in
going out in the sun as the eyes take a long time in adjusting to the sun. I
have a problem in getting into dark places as well. As a result, I am mostly
confined to the house. As you witnessed at the felicitation function, by Dr.
Avchat Pratishthan, I suffered a total break down of speech. I have stopped
going to crowded places and also unfamiliar places unless accompanied by a close
family member. Adjusting my age for Parkinson’s, I am over 75. Unfortunately, my
condition is going to be only worse and not better
All this means that I will
not be able to fulfill my commitments to the organization as the role demands
mobility and physical and mental fitness.
I request you to elect some
other person for this role.
Needless to say, I will be
available to play roles that require less formal
commitments"
त्यांच्या शेवटच्या वाक्याला शेवटचा श्वास घेई पर्यंत ते जागले.ते जाण्या आधी दोन तीन दिवस शरच्चंद्र पटवर्धन त्यांना भेटायला गेले होते.'मी स्मरणिकेसाठी माझ्या सर्व आजाराच्या अनुभवावर लेख लिहित आहे " अस ते सांगत होते. त्यांच्या खुसखुशीत शैलीतला आजारावरही विनोद करणारा लेख पूर्ण व्हायचा राहूनच गेला.जाताना ते ५०००० रु.ची देणगी मंडळासाठी ठेवून गेले.
त्यांची ही मेल आम्हा सर्वांच्याच भावना हेलावणारी होती.तसेच त्यांच्याबद्दलचा आदर दुणावणारी होती.त्यांचा वावर इतका सकारात्मक होता की आजारांनी इतक्या साऱ्या वेदना त्यांना सोसाव्या लागतात आहेत हे लक्षातच आले नव्हते.शुभार्थिनी स्वत:च्या आजाराकडे इतके तटस्थपणे पाहून त्याचे स्वरूप समजून घेणे,त्याला स्वीकारणे आणि ते सर्वांच्यासमोर मांडणे सोपे नव्हते.
अशी अनिल कुलकर्णी यांच्या व्यक्तिमत्वावर प्रकाश टाकणारी अनेक मेल माझ्या मेल बॉक्समध्ये आहेत आणि ती डिलीट करावीत असे मला वाटत नाही.मुळात संगणकाचा मंडळाच्या कामत वापर करायला त्यांनीच आम्हाला शिकवले.त्यांच्या उमद्या स्वभावाबद्दल,मंडळासाठीच्या योगदानाबद्दल बरेच काही लिहायचे आहे.सध्या इतकेच.

Saturday, 16 September 2017
Saturday, 5 August 2017
पगारी शुभंकर ( काळजीवाहक )
शुभंकर म्हणजे केअरटेकर.पक्षाघात,वयामुळे येणारे परावलंबीत्व,अपघातामुळे येणारे तात्पुरते परावलंबीत्व अशावेळी पगारी शुभंकर ठेवण्याची गरज लागते. पगारी शुभंकर हा शब्दच खर तर' वदतो व्याधात 'असा आहे. शुभंकर शब्दात अनौपचारिकता,जिव्हाळा आहे तर पगारी मध्ये व्यवहार औपचारिक सबंध आहेत.असे असले तरी पार्किन्सन्स मित्र मंडळाचे काम करताना अनेक पगारी शुभंकर कुटुंबीय घेणार नाहीत तेवढी काळजी घेताना आढळले. पगारी शुभंकरांच्या विविध तऱ्हा पहावयास मिळाल्या.पगारी व्यक्ती ठेवणे सर्वांना आर्थिक दृष्ट्या परवडणारे नसते.ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे असे काही सकाळी आणि रात्री साठी वेगवेगळे काळजीवाहक ठेवून इतिकर्तव्य झाले समजत स्वत:च्या मनाप्रमाणे वागायला मोकळे होताना दिसले.तर काहींनी काळजीवाह्काना घरातले सदस्यच मानले.बऱ्याच शुभार्थिना घरात अशी बाहेरची व्यक्ती असणे असुरक्षिततेचे वाटते.विश्वासार्ह वाटत नाही.पगारी काळजीवाहकाबद्दल अपवादात्मक म्हणून काही घटना घडत असतीलही पण यामुळे घाबरून न जाता गरज असल्यास पगारी शुभंकर असणे केंव्हाही चांगले असे माझे वैयक्तिक मत आहे.येथे शुभंकर शब्दाला पूर्णपणे न्याय देणाऱ्या पगारी काळजीवाहकाबद्दल लिहून याबाबतचा सकारात्मक दृष्टीकोन निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.
शुभार्थी डॉक्टर प्रभाकर देशपांडे वय वर्षे ९० आणि त्यांच्या शय्याग्रस्त डॉक्टर पत्नी.देशपांडे यांनी एक जोडपेच घरी ठेवले. कुलकर्णी पती पत्नी त्यांच्यासाठी घरातले सदस्यच वाटायचे.हे जोडपेही त्यांना आई वडिलच मानायचे.देशपांडे म्हणजे माझ्यासाठी देवच असे कुलकर्णी म्हणायचे. दुसऱ्या मजल्यावर राहायचे लिफ्ट नव्हती.दोन जिने उतरून डॉक्टरना खाली आणायचे म्हणजे कठीण काम होते. पण कुलकर्णी रोज त्यांना खाली फिरायला आणायचे मंडळाच्या सर्व सभांना सहलींनाही ते घेऊन यायचे.पीडीबद्दल सर्व माहिती करून घ्यायचे.देशपांडे एक कलंदर व्यक्तिमत्व.प्रचंड उत्साही कधी मनात आले की आमच्यापैकी कोणाकडेही त्यांना जायचे असायचे.कुलकर्णी न कंटाळता आणायचे.ते त्रासदायक होत म्हणून आम्हीच त्यांच्याकडे अनेकदा भेटी साठी जायचो.देशपांडे यांची पत्नी निवर्तल्यावर मुलांनी त्यांना वृद्धाश्रमात ठेवले.त्यांना जवळून ओळखणाऱ्या कुलकर्णीनी आपला फोन नंबर देऊन सांगितले गरज पडल्यास मी आहे.कलंदर देशपांडेना वृद्धाश्रमाच्या नियमात,यांत्रिक व्यवस्थेत बांधून राहणे कठीण होते.ते सारखे पळून जाऊ लागले.वृद्धाश्रमचालकांनी त्यांना घेऊन जायला सांगितले आणि पुन्हा कुलकर्णीना पाचारण करण्यात आले.देशपांडेंच्या शेवटच्या श्वासापर्यंत कुलकर्णीनी त्यांची सेवा केली.
अनिल कुलकर्णी आणि शिला कुलकर्णी या दोघानाही पीडी असल्याने पगारी शुभंकर असायचाच.सुरुवातीला त्यांचा ड्रायव्हरच दोघांचा सहाय्यक होता.दोघांच्या पिडीची लक्षणे वाढत गेल्यावर दोघांना स्वतंत्र शुभंकरांची गरज निर्माण झाली.अनिल कुलकर्णी पडल्यामुळे त्यांना शस्त्रक्रिया करावी लागली.त्यानंतर सकाळचा रात्रीचा वेगळा सहाय्यक,शीलाताइंची सहाय्यक, वरकामाची बाई,स्वयंपाकाची बाई,हरकाम्या ड्रायव्हर असे विस्तारित कुटुंबच तयार झाले.याशिवाय ते शनिवार रविवार त्यांच्या फॉर्म हाउसवर जातात.तो लवाजमा वेगळाच.सभेला येताना दोघांचे सहाय्यक आणि ड्रायव्हर असे सर्व येत..अनिता तर शिला ताईंच्या बरोबर नृत्योपचारात सामील होऊन नृत्य शिकायची त्यामुळे आम्हा सर्वांच्या परिचयाची आहे.शीलाताई विणकाम करतात.आम्ही त्यांच्याकडे गेलेल्यावेळी त्यांनी अनितासाठी स्वेटर करायला घेतला होता..कुलकर्णी यांच्या निधनानंतर ड्रायव्हर आणि सहाय्यकासह शीलाताई सभाना येतात
अग्निहोत्री पती पत्नी दोघानाही पीडी आहे.रामचंद्र अग्निहोत्री शय्याग्रस्त. त्यांची पत्नी थोडी चालती फिरती.त्यांच्याकडेही दोघांसाठी स्वतंत्र सहाय्यक.एकदा मी थोडी अवेळीच त्यांच्याकडे गेले तर सहाय्यक झोपलेली. अग्निहोत्री म्हणाल्या मीच तिला म्हणते जरा दुपारी झोपत जा.मध्यंतरी बरेच दिवस अग्निहोत्रींचा फोन लागत नव्हता.माझ्याकडे त्यांच्या सहाय्यकाचा ही फोन आहे हे लक्षात आले आणि चौकशीसाठी फोन केला तर घराला रंगकाम चालू असल्याने काही काळापुरते ते तळजाईला शिफ्ट झाले होते अर्थात ही सहाय्यिका तिथेच होती.तुम्ही दिलेल्या पुस्तकातील व्यायाम मी आजोबांकडून करून घेते असे ती सांगत होती.असे परस्पर संबध जिव्हाळ्याचे होणे तुम्ही त्यांच्याशी कसे वागता यावरही अवलंबून आहे.
देविदास शिरवईकर यांच्याकडे एका खेड्यातून नर्सिग शिकायला आलेला विद्यार्थी राहायला होता. दिवसभर एक बाई होत्या.संध्याकाळी कॉलेज संपवून तो येई.रात्रीची ड्युटी त्याची असे.त्याचा राहायचा प्रश्न सुटला होता आणि यानाही प्रेमानी काम करणारा सहाय्यक मिळाला होता.तो त्यांच्या घरचाच झाला होता.
दिवाणे यांनी संध्याकाळी फिरायला जाण्यासाठी विद्यार्थी सहाय्यक समितीमधला एक विद्यार्थी ठेवला होता.
कुंदा प्रधान या स्वत:च्या कवितेचे वाचन,संत साहित्य निरुपण असे कार्यक्रम करायच्या.प्रधान यांच्यासाठी सहाय्यक ठेवण्याची वेळ आली तेंव्हा त्यांनी ठेवलेल्या सहाय्यीकेला चांगलेच ट्रेंड केले.स्वत:चे कार्यक्रम चालूच ठेवले आणि घरात असलेल्या वेळी प्रधानाना क्वालिटी टाईम देणे सुरु केले. त्यांच्याकडे आम्ही भेटायला गेलो तर हे पती पत्नी आणि सह्य्यिका यांच्यातील सुसंवाद पाहून आम्हाला खूप छान वाटले.
सर्वांनाच आर्थिक दृष्ट्या दिवसभरासाठी माणूस ठेवणे परवडणारे नसते.पण यावरही बिल्डींगचा वॉचमन,घरात इतर काम करणारी बाई यांचा काही वेळासाठी विशेषत: सकाळचे सर्व विधी उरकताना आधार घेतला जातो या सर्वांबरोबर प्रथमपासून चांगले संबध असले तर हे लोकही आनंदाने मदत करतात.
हे सर्व खरे असले तरी अनेकांना असे सहय्यक ठेवणे परवडणारे नसल्याने कामधंदा सोडून शुभार्थीच्या मागे लागावे लागते.शब्बीर सय्यद यांच्याबाबत असेच होते.त्यांच्या पत्नीवर घर चालणार होते दीर औषधाचा खर्च करायचा.मग त्यांच्या पत्नीने घरीच ब्युटी पार्लर सुरु केले. जेंव्हा ती काम करत असे तेंव्हा दहावी शिकणारा मुलाला अभ्यास सोडून त्यांच्याकडे लक्ष द्यावे लागे.दिवसभर त्यांना ठेवता येईल असे विरंगुळा केंद्र तिने शोधले पण तसे मिळाले नाही.
हे सर्व पाहिले की पार्किन्सन्स मंडळासाठी किती काम आहे याची जाणीव होते.आता संस्था रजिस्टर होत असताना उद्दिष्टामध्ये असे विरंगुळा केंद्र आर्थिक दृष्ट्या दुर्बलांसाठी विविध तरतुदी केलेल्या आहेत.शेंडे ,पटवर्धन द्वयीनी बागेत सभा घेत कधीकधी दोघांचीच सभा घेत हे बीज रुजवले. आत्तापर्यंत अनेकांच्या मदतीवर व्याप वाढला. अशीच इतर स्वप्नेही आमच्या हयातीत नसली तरी भविष्यात नक्की पुरी होतील.

Monday, 17 July 2017
प्रज्ञा जोशी
आमच्या सर्वांची लाडकी शुभार्थी प्रज्ञा जोशी हिला पार्किन्सन्स मित्रमंडळाकडून वाढदिवसाच्या खूपखूप शुभेच्छा!.
मागच्या वर्षी तिचा वाढदिवस कार्यकारिणीच्या सर्वांनी मिळून दीपाच्या घरी साजरा केला होता.ती नुकतीच आजारातून उठली होती आणि सर्वाना घरी या असा आग्रह करत होती.तिला काहीतरी निमित्त काढून गुजराथी पद्धतीच्या पाककृती करून खायला घालायला खूप आवडते.मिटिंग सहल यावेळी मोठ्या डब्यातून काहीतरी आणेल,डान्स क्लासमध्ये काहीतरी करून नेईल,देणे समजाचे प्रदर्शन तर तिच्या घरासमोर.त्यामुळे रोजच चहा आणि काहीतरी खायला घेऊन यायची. तिला किती नको म्हटल तरी ती ऐकत नाही.नृत्योपाचारावर हृषीकेशनी फिल्म बनवली तिचे चित्रण हिच्या घरी दिवसभर झाले होते.त्या सर्वांचाही हाच अनुभव होता.हे विस्ताराने सांगायचे कारण तिला पार्किन्सन्समुळे अनैच्छिक हालचालींचा त्रास होतो.तिच्याकडे पाहिल्यावर तिला स्वत:चा ३५ किलो वजनाचा जीव सांभाळता आला तरी खूप झाले असे वाटते.यावेळी मात्र आम्ही सर्वांनी वेगळा घाट घातला.तिचे पती नलीन आणि ती दीपाकडे आले होते.एकूण प्रकाराने ती खूपच भारावून गेली.मला मिठी मारून खूप रडली.
तिच्या पहिल्या भेटीत ती अशीच मिठी मारून रडली होती. पण या दोन्ही स्पर्शात आणि रडण्यात जमीन अस्मानाचा फरक होता.ती अनेक वेळा मला मिठी मारून रडली आहे प्रत्येक वेळचा अर्थ वेगवेगळा असतो कधी खूपखूप प्रेम, कधी कृतार्थता,कधी कृतज्ञता,कधी उगाच लाडात येणे,कधी खूप दिवसांनी भेटल्याचा आनंद,पण आता पहिल्या वेळचे नैराश्य मात्र कधीच नसते.
प्रज्ञाला ४५ व्या वर्षी पीडीचे निदान झाले.तिच्या भावालाही पीडी होता.त्याची खूपच वाईट अवस्था तिने पाहिली होती.आपले ही असेच होईल या कल्पनेने ती घाबरली होती. जीव द्यावा असे वाटत होते.मंडळात सामील झाल्यावर मात्र चित्र बदलले.कोथरूड विभागाची ती समन्वयक बनली.प्रज्ञा म्हणजे सळसळता उत्साह असे समीकरण झाले.मित्रमंडळाच्या सर्व कामात तिचा हिरिरीने सहभाग असतो.मेळाव्यातील अनुभव कथन,प्रार्थना आणि नृत्यात सहभाग,स्मरणिकेत लेखन. असे सर्व काही तिने केले आहे.हल्ली तिला सभासदांना फोन करायचे काम देत नाही तर तिला राग येतो.
नृत्योपाचारातील ती पहिल्या पासूनची सदस्य आहे.तिने आपल्या लेखात आपले अनुभव सांगितले.ती ,"नृत्योपचार उपक्रमामुळे माझ्या आयुष्यात आमुलाग्र बदल झाला.हालचाल ,बोलणे, चालणे अशा प्रत्येक गोष्टीत गुणात्मक फरक झाला.शरीराचा ताठरपणा कमी कमी होत गेला.घरकामात, स्वयंपाकात व्यवस्थितपणा आला.तिसर्या मजल्यावरील माझ्या फ्लॅटमध्ये मी सामान घेउन एकटी चढु -उतरु लागले.पुण्याच्या गर्दीच्या रस्त्यात बसमधे एकटी जाऊ लागले.मानसिकतेत सकारात्मक बदल झाला सर्वच शुभार्थीना सांगितलेल्या हालचाली लगेच जमतात असे नाही.पण मैथीली आणि ऋषीकेश न चिडता न कंटाळता पुनःपुन्हा हालचाली दाखवून करुन घेतात.असे तरुण हसतमुख प्रेमळ .नृत्य शिक्षक मिळाले आम्ही भाग्यवान आहोत."हृषिकेशने तयार केलेल्या फिल्ममध्ये हे अनुभव प्रत्यक्ष पाहताही येतील.
एकदा मी फोन केला असता तिचे पती नलीन म्हणाले अधिक महिन्यासाठी भागवतला गेली आहे. मी विचारले ऐकायला का? तर ते म्हणाले नाही तिच वाचून दाखवते.तासभर असे वाचन करायची ताकद हिच्यात कुठून येते याचे मला आश्चर्य वाटते.पीडी पेशंटना साडी नेसणे म्हणजे कसरतच पण ही रोज साडी नेसून जायची याबद्दल नलीन तक्रार करत होते.मी म्हटले चांगले आहे की? त्यावर ते म्हणाले,'हो पण तिला घडी कुठे करता येते ती मलाच करावी लागते'.भागवत वाचताना ड्रेस घालणे तिला मान्य नसावे कधी कधी तीच्या धर्मिकतेत कर्मकांडाचा अतिरेक होतो यात खाण्यापिंयची बंधने जाचक असतात.यासाठी मात्र आम्ही तिला रागावतो. आधीच तोळा मासा तब्येतीवर याचा परिणाम होतो.
तिच्या प्रकृतीत सारखे चढ उतार असतात.चिमणीने प्रयत्नाने घरटे बांधावे आणि क्रूरपणे कोणी ते पाडावे .तिने पुन्हा बांधावे असे तिच्या तब्येतीबद्दल चालते.तिच्या चिकाटीला पीडीसह आनंदी राहण्याच्या प्रयत्नाला सलाम करावासा वाटतो.
प्रज्ञा तुझ सर्व काही चांगले आहे पण ती कडक बंधने मात्र कमी कर.तुला पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा!
Subscribe to:
Posts (Atom)